Home > मॅक्स किसान > नागपूरात 'अॅग्रो व्हिजन' प्रदर्शनाला सुरुवात

नागपूरात 'अॅग्रो व्हिजन' प्रदर्शनाला सुरुवात

नागपूरात अॅग्रो व्हिजन प्रदर्शनाला सुरुवात
X

नागपूरात आजपासून मध्य भारतातील सर्वात मोठ्या ‘अॅग्रो व्हिजन’ कृषी प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. या प्रदर्शनात वेगवेगळ्या प्रकारचे ४०० पेक्षा जास्त स्टॉल्स आहेत, पण एकाच छताखाली यशवंत, गुणवंतसह १८ प्रकारच्या चारा पिकांचा स्टॉल विदर्भातील शेतकऱ्यांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरलं आहे. चारा पिकांबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठानं हा स्टॉल लावलाय. या एका छताखाली तब्बल १८ प्रकारच्या चारा पिकांच्या उत्पादनाची माहिती, शिवाय मातीशिवाय

हायड्रोफोनीक पद्धतीनं चाऱ्याचं उत्पादन कसं घ्यायचं, याची माहितीही शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. पाहा हा व्हिडीओ

Updated : 10 Nov 2017 12:28 PM GMT
Next Story
Share it
Top