Home > मॅक्स किसान > धरणात किती आहे पाणी?

धरणात किती आहे पाणी?

धरणात किती आहे पाणी?
X

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून वरुण राजाने चांगलीच हजेरी लावलीय.. जोरदार सुरू असलेल्या पावसाने बळीराजाला दिलासा दिला असून नद्यांच्या, धरणांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. पावसामुळे नद्या दुथड्या भरुन वाहत आहेत.तर हवालदिल झालेल्या शेतक-यांच्या पिकाला वरूण राजाच्या दमदार आगमनाने दिलासा मिळाला असला तरी राज्यातील बहुतांश पाणीसाठ्यात म्हणावी अशी वाढ झालेली नाही..सध्या राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे सहा विभागातील ३ हजार २४९ धरणांमध्ये ५२.५८ टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे.गेल्यावर्षी याच कालावधीत ६२.१९ टक्के पाणीसाठा होता. अमरावती आणि नागपूर विभागातील धरणांमध्ये अद्यापही पाणी पातळीत घटच आहे. कोकण विभागात सर्वाधिक ९०.७७ टक्के तर विदर्भातील धरणात सर्वात कमी २१.७० टक्के पाणी साठा जमा झाला आहे. नाशिक विभागात ५९.१७ टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. तर गेल्यावर्षी याच कालावधीत ६०.५३ टक्के इतका पाणीसाठा होता. पुणे विभागातील प्रकल्प ७२.७६ टक्के भरल्याने शेतक-यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यातील ९५५ प्रकल्पामध्ये २४.६० टक्के पाणी साठा जमा झाला असून या प्रकल्पातील एकूण उपलब्ध ३ हजार ५३६ दलघनमीटर पाणीसाठ्यातील १ हजार ७८३ द.ल.घनमीटर पाणीच उपयुक्त असल्याने यंदाही मराठवाडा कोरडा राहण्याची शक्यता आहे.अशीच काहीशी परिस्थिती विदर्भाची देखील आहे.विदर्भातील एकूण ९५५ प्रकल्पात ३ हजार ५३६ दलघनमीटर पाणी जमा झाले असून यातील फक्त १ हजार ७८३ दलघनमीटर पाणीच उपयुक्त आहे.दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रकल्प अजूनही भरले नसल्याने यंदाही विदर्भ मराठवाड्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे..

Chat Conversation End

Updated : 20 Aug 2017 12:14 PM GMT
Next Story
Share it
Top