Home > मॅक्स किसान > दिवाळीसाठी फुलशेती सज्ज !

दिवाळीसाठी फुलशेती सज्ज !

दिवाळीसाठी फुलशेती सज्ज !
X

धनोत्रयोदशी आणि लक्ष्मीपुजनासाठी झेंडूच्या फुलांना बाजारात मोठी मागणी असते, शिवाय दिवाळीच्या दिवसांत झेंडूच्या फुलांना चांगला दरंही मिळतोय. त्यामुळेच या दिवसांत जास्तीत जास्त फुलांचं उत्पादन निघेल, यासाठी शेतकरी फुलशेतीचं नियोजन करतात. नागपूर जिल्ह्यातील फुलशेतीतंही असंच चित्र पहायला मिळालं. ऐरवी बाजारात 20 ते 25 रुपये किलोनं विकले जाणारे झेंडूची फुलं दिवाळीच्या दिवसांत 50 ते 60 रुपये किलोनं विकले जातात, यामुळे दिवाळीच्या दिवसांत फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना चार पैसे जास्त मिळतात, याच उद्देशानं फुलशेती करणारा शेतकरी दिवाळीची बाजारपेठ डोळ्यासमोर ठेवून फुलांच्या शेतीचं नियोजन करतात.... पाहूया नागपूर जिल्ह्यातील झेंडूच्या फुलांची शेती.

Updated : 17 Oct 2017 11:11 AM GMT
Next Story
Share it
Top