Home > मॅक्स किसान > दिवाळीत सोयाबीन उत्पादकांवर उसनवारीची वेळ

दिवाळीत सोयाबीन उत्पादकांवर उसनवारीची वेळ

दिवाळीत सोयाबीन उत्पादकांवर उसनवारीची वेळ
X

राज्यात ठिकठिकाणी केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. मात्र त्या खरेदी केंद्रामध्ये सोयाबीन खरेदीसाठी आणताना त्याची आर्द्रता मॉश्चर १२ टक्के किंवा त्यापेक्षाही कमी असावी, प्रती एकरी ८ क्विंटलच सोयाबीन खरेदी केले जाईल यांसह अन्य जाचक अटी घातल्या आहेत. या जाचक अटीच्या जोखडात अडकवण्यात आल्याने ऐन सणामध्ये शेतकऱ्यांवर उसनवारी करुन सण साजरा करण्याची वेळ आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सोयबीन खरेदीची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी सात बारा उताऱ्याची मूळप्रत, आधारकार्ड मूळ व झेरॉक्स प्रत, बँक पासबुक झेरॉक्स, सातबारा उताऱ्यामध्ये एकापेक्षा जास्त खातेदार असल्यास शेतकरीनिहाय पीक पाण्याची नोंद किती आहे याची स्पष्ट नोंद गाव कामगार तलाठी यांच्याकडून करुन घ्यावी. सोयाबीन शेतमाल स्वच्छ चाळणी केलेला असावा. सोयाबीन शेतमाल खराब झालेला नसावा. सोयाबीनची आर्द्रता मॉश्चर १२ टक्केपेक्षा किंवा त्यापेक्षा कमी असावी, त्याचे प्रमाण जास्त असल्यास सोयाबीन खरेदी केंद्रावर स्वीकारला जाणार नाही. प्रती एकर ८ क्विंटल सोयाबीन खरेदी करता येईल या अटींचा समावेश आहे. या अटीमुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. यापूर्वी सुरु करण्यात आलेल्या केंद्रावर कधीही अशा अटी घालण्यात आल्या आहेत. सोयाबीनची आर्द्रता ही हवामानावरच अवलंबून असते. त्यामध्ये शेतकरी बदल करत नाही. त्यामुळे ती१२ टक्केच असेल असे नाही. त्यामुळे असेल त्या आर्द्रतेचे सोयाबीन खरेदी करणे आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सरकारच्या या जाचक अटींमुळे सणासुदीला शेतकऱ्यांवर उसनारीची वेळ आलीय...

Updated : 20 Oct 2017 12:42 PM GMT
Next Story
Share it
Top