Home > मॅक्स किसान > जयाजी सूर्यवंशीच्या घरासमोर मराठा संघटनांचे निदर्शने

जयाजी सूर्यवंशीच्या घरासमोर मराठा संघटनांचे निदर्शने

जयाजी सूर्यवंशीच्या घरासमोर मराठा संघटनांचे निदर्शने
X

शेतकरी संपानंतर जयाजी सूर्यवंशी यांच्यावर संप मागे घेण्याकरिता सेटलमेंट केल्याचं आरोप होत आहेत. महाराष्ट्रभर त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. आज (दि.४ मे) सकाळी आपल्या घरी पत्रकार परिषद घेऊन शेतकरी संपाबाबत पुढील वाटचाल ठरवणार असल्याचं जयाजी सूर्यवंशी यांनी काल सांगितलं होतं. मात्र, आज सकाळपासून जयाजी सूर्यवंशी अज्ञात स्थळी गेले आहेत.

दुसरीकडे आज त्यांच्या घरासमोर मराठा संघटनांनी निदर्शने केली. संभाजी ब्रिगेड, शिवक्रांति युवा सेना, छावा, मराठा मावळा संघटनांनी सूर्यवंशी यांच्या घरावर कांदे आणि टोमेटो फेकण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि कार्यकर्ते यांच्यात झटापटसुद्धा झाली.

Updated : 4 Jun 2017 7:35 AM GMT
Next Story
Share it
Top