Home > मॅक्स किसान > कृषी विद्यापीठांचा 'पांढरा हत्ती' कधीपर्यंत पोसायचा?

कृषी विद्यापीठांचा 'पांढरा हत्ती' कधीपर्यंत पोसायचा?

कृषी विद्यापीठांचा पांढरा हत्ती कधीपर्यंत पोसायचा?
X

‘महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठं आहेत. तरी या राज्यात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. ही शोकांतिका असल्याचे मत शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी व्यक्त केले आहे. तोट्याची शेती फायद्याची होईल, बदलत्या हवामानात तग धरणाऱ्या बियाण्यांचं संशोधन होणे महत्वाचे आहे. नव्या शेती तंत्रज्ञानाचा विकास आणि या प्रगत तंत्रज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांना होईल. हा कृषी विद्यापीठाचा प्रमुख उद्देश आहे. पण गेल्या २० वर्षांत यासाठी कृषी विद्यापीठांकडून फारशे प्रयत्न झालेले दिसत नाही. त्यामुळे विद्यापीठांच्या गेल्या २०-२५ वर्षांच्या कामाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी जेष्ठ शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी केलीय.

राज्यातल्या चारंही कृषी विद्यापीठांचा शेतकऱ्यांना फारसा फायदा होत नाही, विद्यापीठाचं संशोधन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे राज्यातील चारंही कृषी विद्यापीठं पांढरा हत्ती झाले आहेत, असं मत विजय जावंधिया यांनी व्यक्त

केलं आहे.

यवतमाळसह विदर्भातल्या शेतकऱ्यांना आरोग्यदायी फवारणी पंप अकोला कृषी विद्यापीठानं विकसीत केले असते, आणि हे कृषी पंप शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले असते, तर कदाचीत विदर्भातल्या ४० शेतकरी – शेतमजुरांचे जीव वाचले असते. मात्र विद्यापीठं कधीच शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचली नाही, त्यामुळे शेतकरी हत्याकांडांत कृषी विद्यापीठांचीही जबाबदारी निश्चित करायला हवी, असंही मत विजय जावंधिया यांनी मॅक्स महाराष्ट्रशी व्यक्त केले आहे.

https://youtu.be/5A-n7WRbhm4

Updated : 10 Oct 2017 12:15 PM GMT
Next Story
Share it
Top