Home > मॅक्स किसान > कृषीमंत्र्यांच्या बंगल्यासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन

कृषीमंत्र्यांच्या बंगल्यासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन

कृषीमंत्र्यांच्या बंगल्यासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन
X

कापुस बोंड अळीच्या मुद्यावर कृषीमंत्र्यांनी तात्काळ भूमिका घेऊन 1 लाख रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापुरमधील शेतक-यांनी खामगाव इथं कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या बंगल्यासमोर आंदोलन केले. कृषीमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर शेतकरी कृषीमंत्र्यांची वाट पाहत होते, त्यांना कृषीमंत्र्यांना भेट द्यायची होती, पंरतु कृषीमंत्री मुंंबईमध्ये असल्याने पोलिसांनी त्यांना गेट समोर अडवले.

ज्या बोंडअळीने शेतकऱयांचे नुकसान केले त्या कापूस बोंड अळीची तसेच शासनाच्या जीआरची यावेळी शेतकऱयांनी होळी केली आणि ते तिथेच बसून राहिले. पोलीस प्रशासनाने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र शेतक-यांना कृषीमंत्र्यांना भेटायचे होते. त्यामुळे ते तिथंच बसून होते मात्र, नंतर तहसिलदारांनी मध्यस्थी केल्यानंतर शेतकऱ्यांनी तहसिलदारांना निवेदन देऊन आपले आंदोलन माघे घेतले.

Updated : 28 Nov 2017 4:30 PM GMT
Next Story
Share it
Top