Home > मॅक्स किसान > कधी मिळणार परभणीला सोयाबीन खरेदी केंद्र?

कधी मिळणार परभणीला सोयाबीन खरेदी केंद्र?

कधी मिळणार परभणीला सोयाबीन खरेदी केंद्र?
X

केंद्र शासनाकडून किमान आधारभूत दराने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केल्याचे जाहीर होऊन आज 10 दिवस झाले आहेत. मात्र अजूनही परभणी जिल्ह्यात एक ही केंद्र सुरू न झाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आपले सोयाबीन खुल्या बाजारात कमी भावाने विक्री करावं लागतं आहे, त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.

केंद्र शासनाने मूग, सोयाबीनचे हमी भाव जाहीर केले, हमीभावाप्रमाणे खरेदी-विक्री संघाकडे ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे, मात्र अद्यापही सोयाबीन केंद्र सूरु न झाल्याची माहिती समोर आली आहे. शासनाच्या वतीने हमी भावाप्रणाने खरेदी करण्याची आश्वासन दिलं जात आहे, मात्र खरेदी केंद्रावर अनेक जाचक अटी, निकष लावण्यात आल्यानं शेतकरी अडचणीत आला आहे.

सध्या दिवाळी असल्याने शेतकऱ्यांना खर्च करण्यासाठी सोयाबीन खुल्या बाजारात कमी दराने विकावं लागत आहे. शासनाच्या या जाचक अटीला कंटाळून शेतकऱ्याला खुल्या बाजारात सोयाबीन विक्री करावी लागत आहे. गेल्या 10 वर्षाचा विचार केल्यास शेती पासून मिळणारा उत्त्पन्न खर्चा पेक्षा किती तरी पट्टीनं कमी आहे, म्हणून शेती व्यवसाय सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे तोट्यात आला आहे का? असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातं आहे.

Updated : 27 Oct 2017 9:27 AM GMT
Next Story
Share it
Top