Home > मॅक्स किसान > औरंगाबादमध्ये बळीराजा गौरव मिरवणूक

औरंगाबादमध्ये बळीराजा गौरव मिरवणूक

औरंगाबादमध्ये बळीराजा गौरव मिरवणूक
X

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्ह्यांसह राज्यात, विविध संघटनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनी आंदोलन केले आहेत. औरंगाबादमध्येही सिंधू संस्कृतीचा पुरस्कर्ता असलेल्या बळीराजाची आज बालप्रतिपदेनिम्मित लासुर स्टेशन येथे बैलगाडीतून गौरव मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीनंतर शासनाविरोधात शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार देण्यात आली.राज्यात शेतकरी देशोधडीला लागला आहे खिश्यात पैसे नाही जे आहे ते पेरणीसाठी लावली पण आधी पाऊस आलाच नाही थोडंफार पीक आलं तर परतीच्या पावसाने थैमान घातले. त्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे.

महाराष्ट्र राज्य किसान सभा, लालबावटा शेतकरी युनियन, समृद्धी महामार्ग विरोधी कृती समिती, शेतकरी संघटनांची सुकाणू समिती, जिल्हा धरणग्रस्त समिती आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने ही बळीराजा गौरव मिरवणूक काढण्यात आली. शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे बळी गेले. तसेच शासनानेच शेतकऱ्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असल्याने कलम 302 व 307 अन्वये शिल्लेगाव पोलीस ठाण्यात शासनाविरोधात तक्रार ही देण्यात आली आहे.

कर्जमाफी, समृद्धी महामार्ग दर, पीकविमा, विजजोडणी आणि वीजदर आदी बाबतीतही शासन सतत फसवणूक करीत आहे. त्यामुळे शासनाविरोधात ही तक्रार देण्यात आली आहे.

Updated : 20 Oct 2017 11:47 AM GMT
Next Story
Share it
Top