Home > मॅक्स किसान > आधारभूत किमतीचं गौडबंगाल….

आधारभूत किमतीचं गौडबंगाल….

आधारभूत किमतीचं गौडबंगाल….
X

मिनीमन सपोर्ट प्राईस म्हणजेच किमान आधारभूत किंमत. बाजारात शेतमालाचे भाव पडले तर शेतकऱ्यांना ‘आधार’ आणि संरक्षण मिळायलं हवं, म्हणून दरवर्षी केंद्रीय कृषी मुल्य आयोगाकडून किमान आधारभूत किंमत ठरवली जाते. आता एमएसपी ठरवताना आधी उत्पादन खर्च काढला जातो, पण हा उत्पादन खर्च काढताना जी पद्धत वापरली जाते, ती कधीच कालबाह्य झालीय. बियाणं-खतांचे दर, शेतीचा मक्ता, मजुरीत झालेली वाढ, शेतकऱ्यांचे श्रम आणि बैलजोडीचा व्यवस्थापन खर्च... यासारख्या घटकांचा विचार करुन एमएसपी काढली जाते. पण कालबाह्य झालेल्या ही पद्धीत आजही सुरु आहे.

आज शेतात काम करण्यासाठी २५० ते ३०० रुपये मजूरी द्यावी लागते, पण कृषी मूल्य आयोगाकडून मजुराची मजुरी १०० रुपयांपेक्षाही कमी लावली जाते. अशा अजब कारभारामुळे एमएसपीच्या दुष्टचक्रात आपला शेतकरी अडकला आहे. नेमकं एमएसएपीचं गौडबंगाल काय आहे, हे सांगतायत कृषी अभ्यासक अविनाश काकडे...

https://youtu.be/PlAWQyFEtu0

Updated : 10 Oct 2017 9:34 AM GMT
Next Story
Share it
Top