‘बार्टी’तर्फे MPSC परीक्षेसाठी ऑनलाईन कोचिंग क्लास

Government starts online coaching bf or mpsc students
Courtesy: Social Media

कोरोनाच्या संकटामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. म्हणून
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आता ऑनलाईन पर्याय उपलब्ध करून दिले जात आहेत.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी ) मार्फत महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांसाठी एम.पी.एस.सी. परीक्षेसाठी ऑनलाईन कोचिंग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

एम. पी.एस.सी. इच्छुक उमेदवारांकडून यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्यासाठी बार्टी, पुणे या www.barti.in या वेबसाइटवरील नोटीस बोर्ड वरील “एम.पी.एस.सी. परीक्षा मार्गदर्शन वर्गासाठी प्रवेश अर्ज ” या लिंक वर क्लिक करावे.

हे ही वाचा..!

ऑनलाईन कोचिंगचे बार्टीचे फेसबुक पेज व चुट्यूब चॅनलवरून लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी आजपासून नोंदणी सुरू करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

पुढील आठवड्यात हे क्लासेस सुरू होतील अशा दृष्टीने नियोजन करावे अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. तर सर्व तयारी करून पुढील आठवड्यात याचे उदघाटन करण्यात येणार असल्याचे बार्टीचे महासंचालक कैलास कणसे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here