Home > मॅक्स एज्युकेशन > बारावीच्या निकालात 'ताई'गिरी

बारावीच्या निकालात 'ताई'गिरी

बारावीच्या निकालात ताईगिरी
X

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारीमध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दुपारी एक वाजता http://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहाता येईल. तर ९ जून रोजी दुपारी ३ वाजता महाविद्यालयात विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळणार आहेत.

यंदा राज्याचा एकूण निकाल ८९.५० टक्के लागला आहे. मागील वर्षापेक्षा निकालामध्ये २ टक्क्यांनी वाढ झाली आहे. निकालामध्ये यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. बारावीच्या निकालात ९३.०५ टक्के मुली, तर ८६.६५ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. यावर्षी कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९५.२० टक्के, तर ८८.२१ टक्के एवढा सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे. विज्ञान शाखेचा ९५.८५ टक्के, वाणिज्य शाखा ९०.५७ टक्के आणि कला शाखेचा ८१.९१ टक्के निकाल लागला आहे.

राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेला राज्यभरातून १५ लाख ५ हजार ३६५ विद्यार्थी बसले होते. त्यात ८ लाख ४८ हजार ९२९ मुलांचा, तर ६ लाख ५६ हजार ४३६ मुलींचा समावेश आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्फे ही परीक्षा घेण्यात आली होती.

विभागवार निकाल

कोकण ९५.८५ टक्के

कोल्हापूर ९१.४० टक्के

पुणे ९१.१६ टक्के

औरंगाबाद ८९.८३ टक्के

अमरावती ८९.१२ टक्के

नागपूर ८९.०५ टक्के

लातूर ८८.२२ टक्के

नाशिक ८८.२२ टक्के

मुंबई ८८.२१ टक्के

Updated : 30 May 2017 6:39 AM GMT
Next Story
Share it
Top