Home > मॅक्स कल्चर > राज ठाकरेंनी बिग बींना दिल्या अनोख्या शुभेच्छा

राज ठाकरेंनी बिग बींना दिल्या अनोख्या शुभेच्छा

राज ठाकरेंनी बिग बींना दिल्या अनोख्या शुभेच्छा
X

महानायक बीग-बी अमिताभ बच्चन हे आज अमृतमहोत्सवी वर्षात (७५) पदार्पण करत आहेत. बॉलिवूडमध्ये त्यांना बिग बी, शहंशाह अशा अनेक नावांनी ओळखलं जातं. वयाच्या 75 व्या वर्षीही रुपेरी पडद्यावर तितक्याच सशक्तपणे नायकाच्या भूमिकेत वावरणारा अभिनेता त्याच उत्सर्फुतीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज 75 वा वाढदिवस आहे. त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. राज ठाकरे यांनी अभिताभ बच्चन यांच्या जीवन पटातील १९७० ते २०१७ अशी ६ अप्रतीम चित्र रेखाटली आहेत. आज अमिताभ बच्चन यांच्यावर वाढदिवसाच्यानिमित्ताने जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राज ठाकरे यांनी सोशल मिडीयावरुन बीग बी यांना आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहे.

शतकातला श्रेष्ठ कलावंत हे वर्णन अभिमानानं मिरवण्याचा सर्वाधिकार अमिताभ बच्चन यांच्याकडे सुरक्षित आहे. १९७०च्या दशकात ते हिंदी सिनेमात आले आणि रुपेरी पडद्यानं कात टाकली. अभिनय, कथावस्तू, संगीत या सगळ्याच गोष्टी बदलल्या. बच्चन यांच्या सिनेमांनी पाच पिढ्यांवर गारुड टाकलं.

इतर अनेक कलावंत आले आणि निसर्गाच्या नियमानुसार मावळलेसुद्धा. अमिताभ बच्चन मात्र आजही या देशाच्या मातीत, इथल्या लोकसंस्कृतीत पाय घट्ट रोवून उभे आहेत. अन् तेवढ्याच तडफेनं आणि ऊर्जेनं काम करत आहेत. हे पाहिलं की, विजय तेंडुलकरांच्या पुस्तकाचं शीर्षक आठवतं : 'हे सर्व कोठून येतं?'

काही वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांच्याशी झालेल्या वादवर राज ठाकरे यांनी स्पष्टीकरण देत सांगितल की माझी भूमिका मराठी भाषेच्या संदर्भात होती. आजसुद्धा ती कायम आहे. त्यांच्या समक्ष मी ती मांडली आहे हेही आवर्जून सांगतो. पण मतभेद असले तरीही अमिताभ यांच्या वैभवशाली कलाकिर्दीबद्दल, श्रेष्ठत्वाबद्दल मनात शंका नव्हती, आजही नाही. अमिताभ बच्चन हे सिनेमा संस्कृतीचे राजदूत आहेत यावरून वाद होऊ शकत नाही.

गेल्या चाळीसएक वर्षात अमिताभ बच्चन यांनी कचकड्याच्या पडद्यावर अनेक रूपं चितारली. अगणित भूमिका सजीव केल्या. काळानुसार बदलत गेलेले त्यांचे अनेकविविध चेहरे इथे सादर केले आहेत.

एका एकमेवाद्वितीय कलावंताला माझ्यातल्या कलावंतानं दिलेली ही छोटीशी भेट.

अशा अनोख्या पद्धतीने राज ठाकरे यांनी सृष्टीच्या महानायक अमिताभ बच्चनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत..

Updated : 11 Oct 2017 4:17 AM GMT
Next Story
Share it
Top