Home > मॅक्स कल्चर > होप एक्सप्रेस’ वाचकांच्या भेटीला

होप एक्सप्रेस’ वाचकांच्या भेटीला

होप एक्सप्रेस’ वाचकांच्या भेटीला
X

नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली बुक फेअरमध्ये लिफी प्रकाशनाच्या वतीने पत्रकार आणि माध्यमतज्ज्ञ केतन वैद्य यांचं होप एक्सप्रेस हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. नव्वदीनंतर बदलेल्या मुंबईतील मध्यमवर्गीयांच्या जीवनाचं चित्रण यात करण्यात आलं आहे. या पुस्तकाचं कथानक एका चाळीचा पुनर्विकास, एका मिल कामगाराच्या मुलाची पत्रकार बनण्याची आकांक्षा आणि नव्वदीतल्या मुंबईच्या स्थित्यंतरांचा नॉस्टाल्जिया असणा-या त्याच्या वडिलांच्या अवती भवती फिरतं. या पुस्तकाबाबत अनेक जाणकारांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि डीएनए वर्तमानपत्राचे उपसंपादक योगेश पवार यांच्या म्हणण्यानुसार , "हे पुस्तक मुंबईतल्या मुंबईपणाला सलामी देते. केतन वैद्य मुंबईची दृश्य, आवाज आणि वास ह्यांचा सुगावा घेत कथेचं चित्रण करतात त्यामुळे हे एक खास पु्स्तक बनते. देशाच्या आर्थिक राजधानीचा असा एक कवडसा हे पुस्तक दाखवतं जो आतापर्यंत दाखवला गेला नव्हता."

समीक्षक सुमेधा रायकर-म्हात्रे म्हणतात की " मुंबईच्या चाळी गायब होऊ लागल्यापासून मुंबईची एक मुलभूत ओळख मिटू लागली आहे. हे एक केवळ वरवरचं स्थित्यंतर नाही, तर एक महत्वाची ओळख गायब होते आहे. हे पुस्तक त्या गायब होण्याला अधोरेखित करुन त्याबाबत खंत व्यक्त करतं."

केतन वैद्य ह्यांच हे दुसरं पुस्तक आहे. त्यांच्या पहिल्या पुस्तकाला पद्मश्री नामदेव ढसाळांची प्रस्तावना लाभली होती. तसेच ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे आणि जागतिक किर्तीचे लेखक किरण नगरकर यांच्या हस्ते प्रकाशित झालं होतं. 'अत्त दिप भवाच्या दिशेने' असं त्या कवितासंग्रहाचं नाव होतं.

Updated : 15 Sep 2017 10:43 AM GMT
Next Story
Share it
Top