Home > मॅक्स कल्चर > धार्मिक स्वातंत्र्य चळवळीचे नवे रुप भाग - ४

धार्मिक स्वातंत्र्य चळवळीचे नवे रुप भाग - ४

धार्मिक स्वातंत्र्य चळवळीचे नवे रुप भाग - ४
X

बॉम्बे प्रेसिडेंट गॅझेट खं़़ड २४ वा कोल्हापूर संस्थान प्रथा, संस्कृती आणि मराठा समाज याविषयी महत्वपूर्ण माहिती मिळते. शासकीय केंद्रीय प्रेसमध्ये १८८६ मध्ये हे गॅझेट प्रसिद्ध झाले. त्यावर दोन चितपावन ब्राह्मण व तीन ब्रिटीश लेखक होते. ब्राह्मणापैकी एक महादेव वासूदेव बर्वे यांनी गौतम बुद्धांच्या आस्थे-रक्षी असणारा पवित्र स्तूप उखडून टाकला ( हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. कारण बुद्ध चातुवर्ण्य मानीत नव्हता व तो क्षत्रिय राजपूत होता ) याच बर्वेंनी संस्थानाचा ब्रिटीश नियुक्त कारभारी म्हणून सत्तेत आल्यानंतर ७२ चितपावन ब्राह्मणांना करवीर संस्थानात अधिकारी म्हणून नेमले. हा काळ छ. शाहू महाराज गादीवर येण्यापूर्वीचा आहे. शिवाय करवीरचे छ. चौथे शिवाजी यांना वेडा ठरवून अहमदनगरच्या किल्ल्यात ब्रिटीशाकरवी मारले. याच बर्वेंनी य३ गॅझेटमध्ये महालक्ष्मी हा शब्द एकदा घुसडला. मात्र, इतर सर्व ठिकाणी करवीर निवासिनी अंबाबाई असाच उल्लेख आहे.

गॅझेटच्या पान नं ३०९ वर लिहीले आहे की अंबाबाई हे शहरातले सर्वात मोठे नि प्रचिन मंदीर दोन मजली आहे. जैन संप्रदाय ते पद्मावतीेचे मंदीर आहे असे म्हणतात आणि त्यावरील तीर्थकारांच्या कोरीव मूर्त्या या प्रमाण मानतात. मंदीराचे वास्तुशास्त्र हे फार पूर्वी जैनांचे असू शकेल असे १२ व्या शतकातल्या कर्नाटक आणि बॉम्बे प्रांतातील जैन मंदीर वाटते.

गॅझेटमध्ये पान ३११ वर म्हंटले आहे की ''Ambabai has three great days in the year’’. चैत्रपौर्णिमेला - मार्च एप्रिलमध्ये देवी आंबाबाईची पितळी मूर्ती मिरवणुकीने नगर प्रदक्षिणा काढते. अश्विन पंचमी - सप्टेंबर ऑक्टोंबरला ३ मैलावरील टेंबलाई या पूर्वेकडील देवीच्या बहिणीला भेटायला जाते. अश्विन महिन्यात सप्टेंबर ऑक्टोंबर नवरात्रीत आंबाबाई दीपोत्सव साजरा होतो.

प्रत्येक तिसऱ्या वर्षी रेड्याचा बळी दिला जातो. १८८१ ला कॉलराची साथ आली. अशा प्रसंगी देवीचा कोप जावा म्हणून बळी दिला जात. नव्या बुधवारात क्षुद्र हिंदू लोकांसाठी महाकाली देवता पुजतात. तेथे शेळीचा, बकऱ्याचा बळी दिला जात. तेथेही पूर्वी रेडा बळी दिला जायचा. मंगळवार, बुधवार पेठेमध्ये फिरंगाई देवी आहे. तिही ब्रह्मणेतर कनिष्ठ जातीची देवता. तेथेही मांसाहाराचा प्रसाद. अंबाबाईच्या या सर्व उपदेवतांना बळी देणे, मांसाहार प्रसाद याचा अर्थच असा की अंबाबाई ही मराठ्यांची युद्धदेवता आहे. ती महालक्ष्मी विष्णुपत्नी म्हणणे हा खोडसाळपणा आहे.

खंडोबा आणि कार्तिकस्वामीच्या तळघरातील मंदिरांचा उद्देश आणि नदीजवळ राजघराण्यातील संभाजी, शिवाजी तिसरे, आबासाहेब, बाबासाहेब यांच्या समाधीमंदीराचाही उद्देश सदर गॅझेटीअरमध्ये आहे.

५ दलित दाम्पत्यांनी अंबाबाईची केली पूजा

रविवार १६ जुलै १९७९ रोजी निळकंठ बापू लोंढे, पर्वती निळकंठ लोंढे, तुकाराम चौगुले, वेणू चौगुले, कृष्णात वायदंडे, हारुबाई वायदंडे, बापू लोंढे, गौरा लौंढे, भगवान गोडे आणि रुक्मिणी गोडे या ५ दलित दाम्पत्यांनी मंदिर गाभाऱ्यात जाऊन अंबाबाईची पुजाऱ्याशिवाय स्वहस्ताने पूजा व अभिषेक केला. ही फार मोठी सामाजिक क्रांती कोल्हापूरात स्वांतंत्र्योत्तर काळात घडली आहे. या घटनेला ३९ वर्षे पूर्ण झाली. दै. पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव यांनी धार्मिक स्वांतंत्र्याचा लढा यशस्वी केला. त्यावेळी प्रा. अशोक रावराणे यांनी शाहूसेना स्थापन केली. त्यास प्रतापसिंह जाधव यांनी प्रेरणा दिली.

त्यांच्यानंतर प्रा. अशोक रावराणे आणि प्रतापसिंह जाधव यांनीही गाभाऱ्यात जाऊन पूजा केली. करवीरच्या इतिहासात धार्मिक क्रांतीच होती. यावेळी पुजारी मुनिश्वर यांंनी यापुढे कोणालाही अशी पूजा करता येईल असे सांिगतले. आजपर्यंत अशी प्रथा नसल्याने आम्ही कोणालाही गाभाऱ्यात सोडत नव्हतो, आता मात्र, कोणाला अडवणार नाही. जात, पंथ, भेद न मानता या असे जाहीर आश्वासन दिले.

देवस्थानचे समिती सचिव पंदारे यांनी जाहीर केले की, समितीकडे पैसे भरुन समितीच्या सचिवाबरोबर गाभाऱ्यात जाऊन कोणालाही पूजा करण्याचा अधिकार आहे. १९५६ च्या बॉम्बे अँक्टनुसार त्यापासून कोणी रोखले तर संबंधितांवर गुन्हा दाखल करता होईल.

या कायदेशीर आश्वसनाचा पुजाऱ्यांना आणि देवस्थान समितीला विसर पडलेला दिसतो. त्याला स्मरुण तृप्ती देसाईंना मारहाण करणाऱ्या, विनयभंग करणाऱ्या पुरोहित नि त्यांच्या भाडोत्री गुंडांवर देवस्थान कमिटीच्या पदाधिकाऱ्यांवर प्रशासनाने गुन्हे दाखल का केले नाहीत? निदान आजतरी करणार आहेत का? लाखो अंबाबाई भक्तांना सलणारा हा प्रश्न आहे.

नोट – वरील लेखातील मुद्दे हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत. ‘मॅक्स महाराष्ट्र’ लेखकाच्या मतांशी पुर्णतः सहमत असेलच असे नाही.

Updated : 20 July 2017 7:04 PM GMT
Next Story
Share it
Top