Home > मॅक्स कल्चर > धार्मिक स्वातंत्रचळवळीचे नवे रुप

धार्मिक स्वातंत्रचळवळीचे नवे रुप

धार्मिक स्वातंत्रचळवळीचे नवे रुप
X

कोल्हापूरला मराठ्यांची युद्धदेवता म्हणून एक प्राचीन मंदिर आहे. त्यात श्री दूर्गामूर्ती प्रतिष्ठित आहे. ते साडेतीन पीठांपैकी एक आहे. भारतभर जी शक्तीपीठे आहेत ती बहुजनांच्या शीव-पार्वती या दैवतांची आहेत. चौसष्ठ योनीनी, श्रीयंत्र, सिंह हे वाहन ही सारी रचना कोल्हापूरात आहे. शिवमंदीर म्हणजे नजिकचे केदारलिंग किंंवा ज्योतीबा. जेथे शिव तेथे त्याचा सेनापती म्हणजे भैरव. रंकाळा तलावात रंकभैरवाचे मंदिर होते. मूळ प्रसिद्ध मंदिराला श्री अंबाबाई म्हणतात.

छत्रपती शिवाजी महाराजंानी राजकीय स्वातंत्र्य दिले तर छत्रपती शाहूंनी सामाजिक, धार्मिक स्वातंत्र्य दिले. पण हे सारे संघर्षांतूनच पार पडले. धार्मिक स्वातंत्र्यासाठी आणि जाती अंत्यासाठी या दोघांनीही लढा दिला. त्यामुळे श्री अंबाबाई मंदिरातील भ्रष्ट पुजाऱ्यांनी आमचे मंदिर, आमचे प्रतिक आमच्याकडे सोपवावे ही रास्त मागणी सुरु झाली. या संघर्षाला तीन-साडेतीनशे वर्षांचा इतिहास आहे. आमच्या दोघाही छत्रपतींना धर्म आणि वर्णवर्चस्वाच्या जोखडात अडकवण्याचा सनातनी धर्ममार्तंडांनी प्रयत्न केला.

छ. शाहू महाराजांपूर्वी पन्नास वर्षे आणि छ. राजाराम महाराजांनतर पन्नास वर्षे ही काळीकुट्ट कारकिर्द रयतेला सहन करावी लागली. याचकाळात बहुजन समाजाच्या अज्ञानाचा गैरफायदा उच्चवर्णीय समजणाऱ्यांनी उठवला. रिजन्सी कौन्सिल महादेव वासूदेव बर्वेंनी आपले ७१ जातभाई करवीर संस्थानात अधिकारी नेमले. छत्रपतींना वेडे ठरवून अहमदनगरच्या किल्ल्यात ब्रिटीशाकरवी ठार केले. गौतम बुद्धांच्या पवित्र अस्थी रक्षा असणारा स्तुप कोल्हापूरात उध्वस्त केला.

छ. शाहू महाराज, छ. राजाराम अल्पायुषी ठरले. चावरेकर घराण्यातील दत्तक छत्रपती अल्पायुषी ठरले. ( की त्यांच्यावर ब्राह्मणांनी वीषप्रयोग केला) कोल्हापूर संस्थानच्या दोन छत्रपतींच्या हत्येचे पाप करुन आजमितीस शैवसंप्रदायी बहुजनांचे वैष्णवीकरण करण्याचे कटकारस्थान हे सध्याच्या संघर्षांमागचे खरे कारण आहे. हा वर्णवर्चस्वाचा लढा आहे. Clash of Civiliansation. दोन संस्कृतींमधला संघर्ष आहे. ही नवी सत्यशोधक चळवळ म्हणा, किंवा जाती अंतासाठीच लढा म्हणा. किंवा फॅसिस्टविरुद्धचा लढा म्हणा. जगभर क्लॅश ऑफ सिव्हीलायझेशनमध्ये हिंसाचाराचा़ डोंब उसळला आहे. त्यामानाने भारतात, महाराष्ट्रात, कोल्हापूरात वाटचाल अजूनतरी अहिंसक आहे.

छ. शाहू महाराज राज्यावर आले. त्यानंतर सामाजिक क्रांती सुरु झाली. २६ जुलै १९०२ रोजी प्रशासनातील ५० टक्के जागा राखीव करण्याचा ऐतिहासिक जाहिरनामा प्रसिध्द केला. भारताच्या सामाजिक क्षेत्रातील ही पहिली ऐतिहासिक क्रांती म्हणावी लागेल.

असाच ऐतिहासिक वटहुकुम १४ मे १९१३ साली करवीर निवासीनी अंबाबाई देवस्थानविषयी काढला. ठ. नं. ८२१ यात म्हटले आहे की, श्रीपुजक हे सरकारी नोकर आहेत. दहा रुपयांच्या आतील माल पुजाऱ्यांनी घेणेचा आहे. तांबा, पितळ, सोने, रोख रक्कम, सरकारी जमा करणेचे आहे. कापड डागाबाबत, चिरड्या, लुगडी, खण, पुजाऱ्याला आणि महावस्त्रे, पैठण्या, कडे सरकार जमा. त्यावेळी पाच पुजारी होते. त्यांना वार वाटून दिले होते. त्यात बदल करायचा किंवा वारस नेमायचा अधिकार सरकारचा. पूर्वपरवानगीशिवाय गहाणखतक, दत्तकपत्र, दानपत्र, खरेदीपत्र करता येणार नाही. ( आज या पन्नास वर्षापूर्वीच्या पाच पुजाऱ्यांचे पन्नास कसे झाले?) सदरचा वटहूकुम मराठी, कानडी, गुजराती भाषेत लिहूऩ लोकांना समजेल असा लावावा. जर कोणी पुजारी सरकारी नोकराशी तक्रार करेल, विरुद्ध वागेल तर त्यास देवळात वहिवाटीस येणे एकदम बंद करावे. दंगा वगैरे झालेस पोलिसांची मदत घ्यावी.

या वटहुकुमाविरुद्ध पुजारी सुप्रिम कोर्टापर्यंत गेले. त्यांच्याविरुद्ध निकाल गेले. छत्रपती हे त्यावेळचे सुप्रिम कोर्टचं होते. त्यामुळे त्यांचे कायदे आजही वैध ठरले. छ. शाहू आणि छ. राजाराम महाराज यांची कारतकिर्द अल्प ठरली. त्यानंतर देवासचे राजे कोल्हापूरला दत्तक आले. त्यांनी नगरच्या भोसलेंना दत्तक घेतले. त्या दत्तक प्रकरणात जनक्षोम उसळला. छ. राजारामांचे नातू दत्तक घ्या असा तो आग्रह होता. या दोन्ही दत्तक प्रकरणात करवीर निवासिनी मंदिरातील पुजाऱ्यांनी पुरेपूर फायदा उठवला नि मंदिराच्या संपत्तीवर हे भुजंग छ. शाहूच्या रयतेवर विषारी वर्णवर्चस्वाचा फुत्कार टाकू लागले. नि भोळ्या जनतेला धार्मिक गुलामगिरीत ढकलले. सध्याच्या लढा हा छ. शाहूंच्या वटहुकुमाची अंमलबजावणी

आणि धार्मिक स्वातंत्र्याचा लढा आहे.

डॉ. सुभाष के. देसाई

पी.एचडी (धर्मविज्ञान)

www.subhashkdesai.com

नोट – वरील लेखातील मुद्दे हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत. 'मॅक्स महाराष्ट्र' लेखकाच्या मतांशी पुर्णतः सहमत असेलच असे नाही.

Updated : 30 Jun 2017 11:55 AM GMT
Next Story
Share it
Top