Home > मॅक्स कल्चर > ‘तू हात नको लाऊ’ रिलीज

‘तू हात नको लाऊ’ रिलीज

‘तू हात नको लाऊ’ रिलीज
X

राजकला मूवीज अँड बाबा मोशन पिक्चर्स प्रा. लि. निर्मित मराठी चित्रपट ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ मधील पहिलं गाणं 'तु हात नको लाऊ' रिलीज करण्यात आलं आहे. अभिनेता प्रियदर्शन जाधव आणि मीरा जोशी यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे.

यूट्यूबवर या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव, भाग्यश्री मोटे, अंशुमन विचारे, भारत गणेशपुरे, प्रिया गमरे, पदम सिंह, सुरेश पिल्लाई, अनुपमा ताकमोघे, स्वाती पानसरे यांच्या मुख्य भूमिका आहेत. राजीव रुईया यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट २३ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Updated : 22 Oct 2018 4:53 AM GMT
Next Story
Share it
Top