Home > मॅक्स कल्चर > टीव्ही ‘प्राईम टाईम’ रिपोर्ट

टीव्ही ‘प्राईम टाईम’ रिपोर्ट

टीव्ही ‘प्राईम टाईम’ रिपोर्ट
X

झी २४ तास ( रोखठोक )

झी २४ तासच्या रोखठोकमध्ये गुरूवारी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दावने यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल असं वाटत नाही असं वक्तव्य त्यांनी केलं. तसंच राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार नाही, हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं. राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात सुरू असलेल्या भांडणावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं. भाजपचा त्याच्याशी काही संबंध नाही असं त्यांनी सांगतिलंय. तसंच भाजपवर मित्र पक्ष संपवत असल्याचा होणारा आरोपही त्यांनी खोडून काढला. मुंबई आणि पुणे महापालिका भाजपच जिंकेल असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला.

टीव्ही नाईन मराठी ( बोल महाराष्ट्र )

टीव्ही नाईनच्या बोल महाराष्ट्रा या टॉक शोमध्ये गुरूवारी गणित झेडपीचं या विषयावर चर्चा झाली. झेडपीच्या निवडणुकीत कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरतील? सत्ताधा-यांना त्याचा फटका बसेल का? यावर पॅनलमधील पाहुण्यांनी त्यांची मतं मांडली. यावेळी भाजप नेते आनंदराव राऊत यांनी राज्य सरकार चांगलं काम करत असल्यानं भाजपचाच विजय होईल असा दावा केला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक धात्रक यांनी शेतकऱ्यांच्या पिकांना भाव नाही. सरकार अपयशी ठरलंय. त्यामुळे भाजपला फटका बसेल असा दावा केला. तर शेतकरी आणि सामान्य यंदा शिवसेनेला साथ देतील असा दावा प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी केला. या चर्चेत भारतकुमार राऊत, प्रमोद चुंचुवार आणि हेमंत देसाई हे तीन राजकीय विश्लेषक सहभागी झाले होते. राऊत यांनी राज्यातल्या पुढच्या राजकारणासाठी या निवडणुकीचे निकाल महत्त्वाचे असतील असं म्हंटलंय. नोटाबंदी आणि शेतक-यांची नाराजी निर्णायक ठरेल असं चुंचुवार यांनी सांगितलं. हेमंत देसाई यांनी ग्रामीण भागाचा कल कोणाकडे आहे, हेच निकालातून स्पष्ट होईल असं म्हंटलं.

साम टीव्ही ( आवाज महाराष्ट्राचा )

साम टीव्हीच्या आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमात संपादक संजय आवटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मुलाखत घेतली. राज्यातलं राजकीय वातावरण, बदलती स्थिती आणि राष्ट्रवादीची प्रतिमा यावर तटकरे यांनी त्यांची मतं माडंली. या सर्व स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कणखर होण्याचा प्रयत्न करतोय. तसंच येत्या काळात राज्यात राष्ट्रवादीच महत्त्वाचा पक्ष असेल असंही त्यांनी म्हंटलंय.

Updated : 16 Feb 2017 6:22 PM GMT
Next Story
Share it
Top