Home > मॅक्स कल्चर > ग्रामीण साहित्याला उभारी देणारा प्रकाशन सोहळा

ग्रामीण साहित्याला उभारी देणारा प्रकाशन सोहळा

ग्रामीण साहित्याला उभारी देणारा प्रकाशन सोहळा
X

शेतकरी आहे म्हणूनच भारतातल्या प्रत्येकाच्या पोटाला अन्न मिळतं, पण गाव आज निराशेच्या वाटेवर आहे, अन्न पिकविणारा शेतकरी आज पोटाची खळगी भरू शकत नाही, ही परिस्थिती गावागावात आहे. शहरातील उंच उंच इमारती माणूसकी विसरत चालल्या आहेत. अशा परिस्थितीत वर्धा जिल्ह्यातील धनोडी बहादरपूर या गावी दोन दिवसांचा एक आगळा वेगळा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम पार पडला, गावातल्या तरुणांनी ४ वर्षांपूर्वी समर्पण सेवाभावी संस्था ही सामाजिक संस्था स्थापन केली होती, त्याच संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला गेला, तो म्हणजे त्याच गावावर लिहिलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचा !

२२ ऑक्टोबरला सुप्रसिद्ध चित्रकार, लेखक विजयराज बोधनकर यांनी गावातील समृद्ध आठवणींवर 'गागरा' नावाचे पुस्तक लिहिले आहे. मुंबईच्या डिंपल प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले असून या पुस्तकाचे प्रकाशन सुप्रसिद्ध लेखक, व्याख्याते दाजी पणशीकर, यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आर्वीचे प्रसिद्ध वकील अॅड. दिलीपराव उर्फ भैयासाहेब काळे हे देखील उपस्थित होते.

दरम्यान याच प्रकाशन सोहळ्यात धनोडी माजी उपआयुक्त ग्रामवासी अशोक गिरी यांनी सम्पादित केलेली 'ग्रामदैवत' नावाची स्मरनिका देखील प्रकाशित करण्यात आली. ज्यात धनोडीच्याच ४० ग्रामवाशियांनी आपले अनुभव लेखाच्या माध्यमातून व्यक्त केले आहेत, या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला, तसेचं मोठया संख्येने पुस्तक विक्री देखील झाली.

यावेळी धनोडी गावावर चित्रकार विजयराज बोधनकर यांनी अर्धा तासाची धनोडीवरची शॉर्टफिल्म धनोडिकरांना दाखवून ग्रामवाशियांना सुखद अनुभव दिला. पुस्तक प्रकाशनानंतर दाजी पणशीकर यांचे व्याख्यान झाले, या प्रकाशन सोहळ्यात एक आगळा वेगळा अनुभव ग्रामवाशियांनी आला, या कार्यक्रमा दरम्यान गावात परतलेल्यानी लहानपणीचे सर्व खेळ खेळून लहानपणीचे दिवसही अनुभवले, पाश्चिमात्य जीवन शैलीत गावातला तरुणही आज अडकत चाललाय, म्हणून अशा कार्यक्रमाचं आयोजन आयोजकांनी केलं होते.

नवी तरुणाई आरोग्याने सुदृढ राहावी या निमित्ताने मंदार अभयनकर यांनी आपल्या वडील विजय अभयनकर यांच्या स्मरणार्थ एक व्यायाम शाळा सुरु करुन तरुणांना एक नवी दिशा दिली, समर्पण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. दीपक काळे व अनेक कार्यकर्त्यांनी असे विविध कार्यक्रम आमची संस्था यापुढे ही राबवणार असल्याचे म्हटले आहेत.

Updated : 28 Oct 2017 11:56 AM GMT
Next Story
Share it
Top