Home > मॅक्स ब्लॉग्ज > स्पेन डायरी – भाग 5

स्पेन डायरी – भाग 5

स्पेन डायरी – भाग 5
X

...तर 92 नंबरने आम्ही केवळ वीस मिनिटांत "पार्क गल" येथे पोहोचलो. हे आजचे आमचं पहिले इप्सीत स्थळ होतं. या विषयी बोलण्या आधी परत थोडं बार्सीलोनाकडे वळूया. हे शहर आपल्या वास्तुकला आणि स्थापत्यकलेसाठी युरोपियन राष्ट्रांत खूप नावाजलेले आहे. अंतोनियो गौडी हा एकोणिसाव्या शतकातील गाजलेला वास्तुशिल्पकार. त्याच्याच प्रेरीत बुद्धिने या शहराची बरीच वास्तु उभी राहिली. आणि आता ती समर्थ पणे गौडी शिल्पकला किंवा शिल्पशास्त्र म्हणून गणली जाते. स्पेनमध्ये मुख्यतः लोक गौडी वास्तुकला खास पहायला जातात तर असे हे "पार्क गल" कार्मेल टेकडीवर वसले आहे. उंच डोंगराळ ला सालुत, ग्रासीया जिल्ह्यात, बारसीलोनाच्या उत्तर भागात हे आहे.

एयुसेबी गल याने शहरीकरणाचा विकास ध्यानात ठेवून कतालानच्या विकासाचा चेहरा असणाऱ्या गौडीला 1900 ते 1914 मध्ये हे पार्क बांधण्यlसाठी दिलं. सदर पार्क हे लोकांसाठी 1924 ला खुले झाले आणि 1984 मध्ये युनेसको ने याला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा दिला. गम्मत अशी आहे की मुळात इथं इमारत बांधली जाणार होती ,ती फसली म्हणुनच मग गल ने गौडीला लोकांसाठी पार्क बनवण्यास मंजूरी दिली. लोकाना शांती आणि सुकून मिळण्यासाठी गौडीने मग स्वतःचा असा खास टच इथं दिला. वेगळ्या पद्धतची छते, नागमोडी आकाराची गच्ची, वैविध्यपूर्ण आकार आणि मुख्यतः लक्ष वेधून घेतो तो य पार्कचा प्रचंड मोठ्l विस्तार. याच्या टोकाशी गेलं की अखंड शहर नजरेच्या टप्प्यात येतं. या पार्कच्या निर्मितीत गौडी आणि गल य जोडगोळीने वेगवेगळी चिन्ह वापरुन "कतालीनीसम" ला प्राधान्य देण्याचा प्रयत्न सुरेख केलाय. हे पार्क नुसतंच प्रेक्षणीय नाही तर इथं जीववैविध्यता पण आढळते; खुप सारे पोपट, बुटक्या पायाचा गरुड इत्यादी इत्यादी. आम्ही जेव्हा पार्कमध्ये शिरलो तेंव्हा प्रथम कोण समोर आले तर आपल्या शेजारील असलेल्या आणि आपल्या देशांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या राष्टातील लोक! चक्क विक्रेते म्हणून दादर कीर्तिकर मार्केट सारखे ठेले लावून बसले होते; मनात म्हटलं कमाल आहे इथं पण घुसखोरी काय सोडत नाहीत. मला पाहून धावत आले. पण असले फाजील की मला लगेचच म्हटले आप भारत से होना? असो. नीट पहिले तर हे पार्क पहायला अर्धा दिवस पुरतो. माझ्या पायांत गोळे येइस्तोवर मी पार्क फिरले, जमेल तितके फोटो काढले आणि "सगरदा फमिलिया" हे पाहायला आकंताने बस स्टॉपवर धावली; तर काय तिकडं आधीच पन्नास जणं रांगेत होते. मी मूग गिळून स्वस्थ उभी राहिली.

डॉ. मनिषा कुलकर्णी

Updated : 31 March 2017 11:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top