Home > मॅक्स ब्लॉग्ज > टेक्नॉलॉजी मधील बदल समजून घेताना दिसणारी डाव्यांची बुद्धी मंदता

टेक्नॉलॉजी मधील बदल समजून घेताना दिसणारी डाव्यांची बुद्धी मंदता

नवीन Technology कोणती? तिचा उपयोग समाजवाद आणण्यासाठी कसा करता येईल, डिस्ट्रिब्यूटिव जस्टीस कसा साध्य करता येईल, त्यासाठी विचारांची चौकट कोणती, पायाभूत रचना कशा उभाराव्या लागतील, कायदेकानून कसे हवेत, याचा डावे कधी विचार करणार का? वाचा सुनिल तांबे यांचं सडेतोड विश्लेषण | Why leftists not accept new technology analysis by Sunil Tambe

टेक्नॉलॉजी मधील बदल समजून घेताना दिसणारी डाव्यांची बुद्धी मंदता
X

शेतमालाचं पणन म्हणजे मार्केटिंगचं क्षेत्र खाजगी व परदेशी गुंतवणुकीसाठी खुलं करण्याची प्रक्रिया १९९५ पासून सुरु आहे.

विश्व बँकेचे अहवाल, शिफारसी, विविध राज्यात या बँकेच्या निधीद्वारे राबवण्यात आलेले कार्यक्रम, केंद्र सरकार, तसेच या सरकारने पुरस्क्रुत केलेल्या विविध संस्था, त्यांनी केलेले विविध अभ्यास, बिग बझार आणि तत्सम देशी और्गनाइज्ड रिटेल चेन्स, कंपनी कायद्यातील बदल, विविध धोरणांत होत गेलेले बदल, इत्यादींची दिशा निश्चित आहे.

डावे पक्ष व बुद्धिवंत यांची व्यूहरचना एवढीच की या बदलांची गती कमी करावी, या बदलांमुळे बाधित होणारे वर्ग वा समूह यांना न्याय मिळावा.

जागतिकीकरण ही युद्धभूमी आहे, ते सैन्य नाही. ही जाण डाव्या बुद्धिवंतांमध्ये नहीं के बराबर आहे.

नवीन टेक्नौलौजी कोणती? तिचा उपयोग समाजवाद आणण्यासाठी कसा करता येईल, डिस्ट्रिब्यूटिव जस्टीस कसा साध्य करता येईल, त्यासाठी विचारांची चौकट कोणती, पायाभूत रचना कशा उभाराव्या लागतील, कायदेकानून कसे हवेत, इत्यादी विषय चर्चिलेच जात नाहीत.

कामगार युनियन असेल तर येत्या दहा वर्षांनी तिचं स्वरुप काय असेल? सभासद संख्या, नवीन यंत्रं-तंत्रं, डिस्ट्रिब्युटीव जस्टीस म्हणजे सामाजिक न्याय, आपण कसा साध्य करणार? आपल्या सर्व मर्यादा ध्यानी घेऊन त्यामध्ये कितपत यशस्वी होऊ?

या प्रकारचा कोणताही विचार वा विवेचन मी इकॉनोमिक अँण्ड पोलिटीकल विकली वा अन्य कोणत्याही नियतकालीकांत वाचलेलं नाही. भविष्य काय आहे, ते कसं घडवायचं, याचा वेध द इकॉनौमिस्ट मध्ये असतो. वा वित्त भांडवलशाहीत.

समाजवादी, मार्क्सवादी, आंबेडकरवादी इतिहासाचा व भूतकाळाचा वेध घेतात. वर्तमानाबद्दल तक्रार करत असतात.

चंडीप्रसाद भट, राजेंद्र सिंग यांच्यासारखे काही कार्यकर्ते नवे आयाम देतात, भविष्यात डोकावतात पण त्याचं सार्विकरण आपल्याला करता येत नाही.

यशवंत सुमन वगळता भविष्याचा वेध घेणारा आणि त्यानुसार कार्यक्रम सुचवणारा अभ्यासक अपवाद आहे.

औद्योगिक क्रांतीनंतरची टेक्नौलौजी हा बहुतांश पुरोगाम्यांना भांडवलशाहीचा कट वाटतो.

Updated : 30 Sep 2020 11:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top