Home > मॅक्स ब्लॉग्ज > बेरोजगारी : त्यांचा स्पर्धक फॅक्टरीच्या गेटवर उभा आहे...

बेरोजगारी : त्यांचा स्पर्धक फॅक्टरीच्या गेटवर उभा आहे...

बेरोजगारी : त्यांचा स्पर्धक फॅक्टरीच्या गेटवर उभा आहे...
X

बेरोजगारी, बेरोजगार व्यक्तीचीच शोकांतिका नव्हे तर बरेच काही बेरोजगार व ज्यांना रोजगार आहे. त्यांच्यात एक प्रकारचा शत्रू भाव तयार होतो. व्यक्तिगत पातळीवर नाही तर “मॅक्रो” पातळीवर हा शत्रू भाव निर्माण होत असतो.

समाजात बेरोजगारी मोठ्याप्रमाणावर असेल तर ज्यांना रोजगार आहेत. त्यांचे वेतन दबलत राहते. बाजारातील श्रमाचे मूल्य घटते.

अर्थव्यस्वस्थेतील किमान वेतनाची पातळी कमी राहते. मग सरकारने किमान वेतन कितीही ठरवलेले असु दे. रोजगार मिळणाऱ्या व्यक्ती देऊ केलेल्या वेतनाला हो म्हणतात. ‘कारण त्यांना माहित असते कr फॅक्टरी गेटच्या, वाड्याच्या, मळ्याच्या बाहेर त्याचा स्पर्धक त्याच वा त्यापेक्षा कमी वेतनावर तेच काम करायला तयार आहे.

अर्थव्यस्वस्थेतील एकूणच वेतनाची पातळी कमी राहिल्यामुळे कुटुंबांची क्रयशक्ती कमी राहते. त्याचा परिणाम उपभोगाच्या पातळीवर, वस्तुमालrच्या उठावावर व देशाच्या जीडीपीवर होत असतो. बेरोजगारी मुळे रोजगार असणारे देखील एक प्रकारच्या आर्थिक अनिश्चिततेत जगतात.

साहजिकच मिळणारे सर्वांच्या सर्व वेतन उपभोगावर खर्च न करता, अत्यावश्यक खर्च करणे, व बाकीचे उत्पन्न अडीनडीला लागेल म्हणून बाजूला ठेवण्याची प्रवृत्ती राहते.

वस्तुमालाच्या दबलेल्या मागणीमुळे नवीन उत्पादन क्षमता कमी प्रमाणात तयार होणे, कमी गुंतवणुक, कमी रोजगार असे दुष्टचक्र तयार होत असते.

Updated : 19 Nov 2019 5:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top