Home > मॅक्स ब्लॉग्ज > हॅलो मी डॉ. तात्याराव लहाने बोलतोय...

हॅलो मी डॉ. तात्याराव लहाने बोलतोय...

हॅलो मी डॉ. तात्याराव लहाने बोलतोय...
X

पत्रकार अशोक शिंदे यांचा अचानक फोन आला. तुझे आणि आपल्या सर्वांचे आयकॉन पद्मश्री तथा वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक आदरणीय डॉ. तात्याराव लहाने साहेब तुला बोलत आहे. आणि अचानक आवाज कानी पडला, मुन्ना काळजी करु नकोस, कोरोना पेक्षा तुझी हिम्मत मोठी आहे. असे वाक्य त्यांच्या तोंडून ऐकुन खरंच एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली आहे. आणि हीच ऊर्जा मला कोरोनाला पराभव करण्यास मदत करणार आहे.....

कोरोनाची भीती खूप मोठी आहे. त्यामुळे सहाजिकच आहे. मला सुध्दा भिती वाटत होती. परंतु हिम्मत करुन स्वॅब टेस्ट दिली. मात्र, नियतीला वेगळेच मान्य होते. अचानक कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. आणि पायाखालची जमीन सरकली. काय बोलावे, कोणाला काय सांगावे? हा रोग भयानक आहे काय़ आपल्या कुटुंबाचे काय होणार? या विचाराने मनात गोंधळ उडाला होता. तो ८ ऑगस्ट रोजी चा माझ्या आयुष्यातील काळा दिवस ठरला.

त्या रात्री उशीरा पर्यंत झोप आली नाही. डोळ्यात अश्रू येत होते. पूर्ण तुटुन गेलो होतो. मनोधैर्य खचले होते. अनेकांनी त्या रात्री धीर देण्याचा प्रयत्न केला होता. पण चित्त विचलित झाले होते. दुसऱ्या दिवशी सुध्दा सकाळी पासुन अनेकांनी फोन केले मात्र, डोक्यातील गोंधळ कमी होत नव्हता.

अचानक सकाळी १०.२८ वाजता अशोक शिंदे यांचा फोन आला. आयकॉन पद्मश्री तथा वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक आदरणीय डॉ. तात्याराव लहाने साहेब तुला बोलत आहेत. हे म्हणताच अचानक आवाज आला, हॅलो मी डॉ. तात्याराव लहाने बोलतोय...

मुन्ना तुला काही होणार नाही. कोरोना पेक्षा तुझी हिम्मत खूप मोठी आहे. काळजी करु नकोस. मुन्ना कोरोना मोठा नाही. हे लक्षात राहु दे. आपल्याला आणखीन खूप काही करायचे आहे. त्यामुळे हा कोरोना आपल्याला काही करणार नाही. आपली पुण्याई खुप मोठी आहे. म्हणत तू काळजी घे... तुला कोणते डॉक्टर पाहतात? अशी विचारपुस करत हे बघ तु बिलकुल घाबरून जायचं नाही...

कळंबकर अशोकराव तुम्ही सुध्दा स्वतः ची मुन्नाची काळजी घ्या. असे सांगितले. तो फोन मला ऊर्जा देणारा होता. ज्या व्यक्तीला आपण आयकॉन समजतो, ज्या व्यक्तीला भेटण्याचे आपले स्वप्न आहे. त्याच आयकॉन व्यक्तीने मला धीर दिला, तो क्षण माझ्या करीता अविस्मरणीय आहे हे नक्की....

शितलकुमार दुर्गा शिवशंकर घोंगडे

Updated : 11 Aug 2020 7:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top