Home > News Update > काय आहे कोरोनाची 'सेकंड वेव्ह'?

काय आहे कोरोनाची 'सेकंड वेव्ह'?

काय आहे कोरोनाची सेकंड वेव्ह?
X

लॉकडाउन ची अपरिहार्यता :-

कोरोना संसर्गाच्या पार्श्व्भूमीवर देशात लॉकडाऊन घेण्यात आला होता. महाराष्ट्रासह अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी तो वाढवण्यात यावा अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. त्यानंतर केंद्र सरकारकडून लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय अत्यंत अपरिहार्य आहे.

इंडियन कौन्सिल ऑफ़ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)च्या मते, २४ मार्च रोजी लागू केलेला २१ दिवसांचा लॉकडाऊनही अत्यंत सुयोग्य वेळी लागू केला होता. तो लागू करण्यास उशिर झाला असता किंवा केला गेला नसता तर भारतात कोरोनाच्या रूग्णांची संख्या काही लाखांच्या घरात गेली असती. लॉकडाऊन जाहीर करुन ही परिस्थिती येण्याचे संकट टाळण्यात आपल्याला यश आले आहे. युरोपबरोबर तुलना करता भारतात कोरोना संक्रमणाचा वेग अत्यंत संथ असल्याचे दिसून येते. मुख्य म्हणजे, कोरोनाचा रिप्रॉडक्टिव्ह रेट एक टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्यात आपल्याला यश आलेले आहे. हा दर यापेक्षा कमी म्हणजे ० टक्क्यांवर आणायचा असेल तर लॉकडाऊन वाढवणे अत्यंत गरजेचे होते.

अनेक देशांकडून लॉकडाऊनचा प्रयोग :-

जगाच्या दृष्टीकोनातून विचार केला तर देशातील लॉकडाऊन हे जगातील प्रवाहाला गृहित धरूनच आहे. मुळात, युरोप, अमेरिका यांच्या तुलनेत भारताने खूप लवकर लॉकडाऊन घोषित केला होता. त्यामुळेच या देशांसारखी महाभयंकर स्थिती आपल्याकडे दिसली नाही. आजघडीला जवळपास १८ देशांनी संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामध्ये इटली, स्पेन, ऑस्ट्रेलिया, इस्राईल, जॉर्डन अशा देशांचा समावेश होतो. यातील कोणत्याही देशांनी लॉकडाऊन थांबवलेला नाही; उलट मुदतवाढच दिली आहे. ऑस्ट्रेलियाने तर लॉकडाऊनला सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.

भारतापुढील आव्हाने :-

भारताला प्रामुख्याने दोन गोष्टींत समतोल साधायचा आहे. यातील पहिली गोष्ट म्हणजे कोरोना विषाणूचा रिप्रॉडक्टिव्ह रेट कमी ठेवणे. याचा अर्थ असा की, एका कोरोनासंक्रमित व्यक्तीपासून साधारणतः २-३ लोकांना लागण होत असेल तर हा दर २ ते ३ टक्के मानला जातो. हा दर १ टक्क्यांपेक्षा खाली आणायचा आहे. दुसरीकडे, आज पूर्णपणे ठप्प झालेले आर्थिक व्यवहार पुन्हा कसे सुरू करता येतील यामध्ये समतोल साधण्याचे आव्हान हे जगातील प्रत्येक देशापुढे आहेच.

आज इंग्लंडचे उदाहरण घेतले तर तेथेही लॉकडाऊन वाढवायचे की नाही; पण याबाबत विचार सुरू आहे. युरोपिय देशांमध्ये लॉकडाऊनचे गंभीर आर्थिक परिणाम दिसू लागले आहेत. ब्रेक्झिटमुळे इंग्लंड युरोपियन युनियनच्या बाहेर पडला आहे. युरोपिय देशांना त्यांचे स्वतःचे व्यापारी अस्तित्व आर्थिक प्रगतीच्या माध्यमातून कायम ठेवायचे आहे. त्यामुळे तेथे लॉकडाऊन कायम ठेवण्यावरुन मतमतांतरे आहेत. इग्लंडमध्येही लॉकडाऊन काढण्याविषयी विचार सुरू होता. दरम्यानच्या काळात ऑक्सफर्ड विद्यापीठाचा एक अहवाल आला. त्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट नमूद केली होती की जोपर्यंत कोरोना विषाणूवर लस सापडत नाही तोपर्यंत लॉकडाऊन काढता येणे शक्य नाही; थोड्या ङ्गार प्रमाणात लॉकडाऊन ठेवावेच लागणार आहे. त्यासाठी विशिष्ट मुदत नाही. म्हणूनच इंग्लंडने लॉकडाऊनला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. याउलट ज्या देशांनी लॉकडाऊन जाहीर करण्यास उशिर केला अशा अमेरिका आणि इटली या दोन देशांची उदाहरणे आपल्यासमोर आहेत.

आज अमेरिकेची अवस्था अत्यंत गंभीर आहे. तथापि आता कुठे न्यूयॉर्कमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला. अजूनही संपूर्ण अमेरिकेत लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला नाही. तेथे संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ४ लाखांपर्यंत गेली आहे. मृत्युमुखी पडणार्यां ची संख्या जवळपास २० हजाराच्या पुढे गेली आहे. परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. अमेरिकेचे लष्करही त्यापासून वेगळे राहू शकलेले नाही. अमेरिकन लष्करातील ३ हजार लोक कोरोना विषाणूने बाधित आहेत. एवढेच नव्हे तर अमेरिकेच्या अण्वस्त्रांच्या सुरक्षिततेचा धोका निर्माण झालेली आहे.

चीन, दक्षिण कोरियात कोरोनाची सेकंड वेव्ह :-

अशा परिस्थितीत ज्या देशांनी लॉकडाऊन उठवले होते, ज्यांच्याकडे कोरोना विषाणूची परिस्थिती सर्वसामान्य झाली तेथून काही नकारात्मक बातम्या येत आहेत.

आज चीनमधून कोरोनावर पूर्णपणे नियंत्रण प्रस्थापित केले आहे अशा बातम्या, व्हिडिओ समोर येत आहेत. कोरोनाचे उगमस्थान असणार्याण वुहानमधील दैनंदिन व्यवहार सुरळित सुरु झाले आहेत. रेल्वे सुरू झाल्या आहेत, टुरिस्ट पॉईंट सुरू झाले आहेत. दक्षिण कोरिया, जपान, हॉंगकॉंग आणि तैवान याही देशांनी यावर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला होता. परंतू तेथे कोरोनाच्या केसेस नव्याने पुन्हा सापडत आहेत. याला कोरोनाची सेकंड व्हेव किंवा दुसरी लाट म्हटले जाते. यामुळे चीनचे धाबे दणाणले आहेत. अर्थात, चीन खरी आकडेवारी कधीच सांगणार नाही; परंतु चीनकडून अधिकृत जे वृत्त हाती आले आहे त्यानुसार तेथे ९५० नवे कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. हा आकडा लहान नाही. चीनच्या म्हणण्यानुसार जे चीनी नागरिक देशाबाहेर अडकलेले होते त्यांना आम्ही परत बोलवले तेव्हा ते कोरोनाग्रस्त आढळले आहेत. म्हणजेच नवे रूग्ण स्थानिक नागरिक नाहीत. त्यामुळे चीनने संपूर्ण लॉकडाऊन न करता काळजी घ्यायला सुरूवात केली आहे.

दक्षिण कोरियाने देखील ट्रेस, टेस्ट, ट्रीट ही त्रिसुत्री आणि डिजीटल ट्रॅकिंग सिस्टिमच्या माध्यमातून कमालीचे नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न केले होते. तेथे कोरोनाबाधितांची प्रतिदिन संख्या ३०-४० पर्यंत खाली आली होती; परंतु आता ती १०० ने वाढताना दिसत आहे. हाच प्रकार जपान, ङ्गिलीपिन्स, सिंगापूर, हॉँगकॉंग, तैवान मध्येही दिसून येतो आहे. जपान मध्ये बरे झालेल्या अनेक लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे पुन्हा दिसत आहेत. यावरून एक गोष्ट निश्चियत होते की कोरोनावर १०० टक्के नियंत्रण मिळवणे अवघड आहे.

ऑक्सङ्गर्ड विद्यापीठाच्या संशोधन अहवालात नमूद केल्याप्रमाणे जोपर्यंत कोरोनावर प्रभावी लस निर्माण होत नाही तोपर्यंत कोरोनावर १०० टक्के नियंत्रण मिळवणे अवघड आहे. या देशांनी कोरोनावर नियंत्रण प्राप्त केले म्हणून पाठीवर शाबासकीची थाप घेतली त्या देशांमध्ये पुन्हा एकदा याची लक्षणे दिसायला लागली आहेत. ही सेकंड वेव्ह असून ती धोक्याची घंटा आहे. त्यामुळे भारताने यातून धडा घेणे अत्यंत गरजेचे आहे.

आजघडीला भारतात दररोज रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे केवळ ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची मुदत वाढवून चालणार नाही तर रिप्रॉडक्शनचा दर १ टक्क्यापेक्षा खाली ठेवण्यासाठी आपल्याला सामाजिक अंतर राखण्याचा मुलभूत उपाय कठोरपणाने अमलात आणावा लागेल. तसेच दक्षिण कोरियाप्रमाणे आपल्याला पुन्हा ट्रेस, टेस्ट आणि ट्रीट तसेच डिजीटल ट्रॅकिंगसारखे मॉडेल वापरावे लागतील.

कोरोनावर औषध किंवा लस सापडली नसल्याने आम्ही पूर्णपणे कोरोना मुक्त झालो असे जाहीर करणे चुकीचे आहे. चीनने हे जाहीर करण्यामागे एक प्रकारचे राजकारण आहे. ज्या ठिकाणी एकाधिकारशाही असते, ज्यांना नेतृत्वाचे यश दाखवायचे असते, सत्तास्पर्धेत पुढे जायचे असते त्यासाठी कमीपण दाखवायचा नसतो; त्यातून या घोषणा केल्या जातात. चीनमध्ये ९५० रुग्ण पुन्हा सापडणे ही बाब निश्चिातच धोक्याची आहे. त्यामुळे लॉकडाऊनची मुदत ३० एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय अत्यंत योग्य आहे. कदाचित त्यापुढेही लॉकडाऊन वाढवावे लागू शकते.

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

Updated : 26 April 2020 2:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top