Home > मॅक्स ब्लॉग्ज > अर्थज्ञान : भांडवल मरते म्हणजे नक्की काय होते?

अर्थज्ञान : भांडवल मरते म्हणजे नक्की काय होते?

अर्थज्ञान : भांडवल मरते म्हणजे नक्की काय होते?
X

सतत वाढत राहणे, हा भांडवलाचा गुणधर्म म्हणून सांगितलं जातो; पण वित्त भांडवलाने (जे औद्योगिक भांडवलापेक्षा वेगळे निपजले आहे) आपल्यात आत्मघातकी प्रवृत्ती देखील आहेत हे सिद्ध केले आहे.

(अ ) बँका थकलेली हजारो कोटी रुपयांची कर्जे “राईट ऑफ” करतात.

उदाहरणार्थ : ५ लाख कोटींच्या लोनबुकमधून ५०,००० कोटी रुपयांची कर्जे राईट ऑफ. म्हणजे बँकेचे लोन बुक आता ४.५ लाख कोटींचे झाले. मग ५०,००० कोटी गेले कोठे?

अशा अनेक बँका कर्जे आपल्या पुस्तकातून गायब करीत आहेत.

(ब ) कंपनीचे शेअर गडगडतात

उदाहरणार्थ : एका कंपनीचे ५०० रुपये एक प्रमाणे २० शेअर्स १ लाख रुपये देऊन घेतले; अनेक कारणांमुळे आज त्या कंपनीचा शेअर ३०० रुपयांवर आला आहे. म्हणजे तुमची संपत्ती १ लाखांवरून ६०,००० झाली; मग ते ४०,००० रुपये गेले कोठे ?

अशा अनेक कंपन्या आहेत आणि प्रत्येक कंपनीचे लाखो गुंतवणूकदार आहेत.

(क) म्युच्युअल फंडाची एएनएव्ही कमी होते

उदाहरणार्थ : तुमचा म्युच्युअल फंड १० रुपये दर्शनी मूल्याच्या युनिटची नेट ऍसेट व्हॅल्यू (एनएव्ही) एनएव्ही ८ रुपये झाली असे जाहीर करतो. तुम्ही १ लाख रुपये गुंतवून १०,००० युनिट्स घेतले असतील तर त्यांचे मूल्य ८०,००० झाले आहे. मग ते २०,००० रुपये गेले कोठे ?

असे अनेक म्युच्युअल फंड आहेत आणि प्रत्येक म्युच्युअल फंडात लाखो नागरिकांनी बचती गुंतवल्या आहेत.

ही काही जुजबी उदाहरणे. अशी अनेक देता येतील! बँकेतील ठेवी, बॉंडमधील गुंतवणुकी, कमोडिटीचे डेरिव्हेटीव्ह, आणि रिअल इस्टेट इत्यादी (आपण चिट फंड, सहकारी पतपेढी, पॉन्झी स्कीम वगैरे बद्दल बोलतच नाही आहोत) भांडवलशाहीचे प्रवक्ते नेहमीचं पुस्तकी उत्तर देतील: की जे खाली जाते ते वर देखील येते. पण काही कायमचे / परमनंटली खाली जाते. यासाठी त्यांच्याकडे उत्तर नाही.

गुंतवलेल्या भांडवलाचे मूल्य वर्तमानापेक्षा भविष्यात कायमचे कमी झाले की, भांडवलाचा ऱ्हास झाला असे म्हणता येते. कॉर्पोरेट वित्त भांडवलशाहीच्या प्रणालीत नक्की किती भांडवलाचा कायमचा ऱ्हास होतो? याचे साऱ्या जगातील आकडे एकत्र केले की डोळे विस्फारतील !

वित्त भांडवल स्वतःहून मेले तर मी दुःख करणार नाही. पण ती समाजाच्या लाखो कोटी रुपयांच्या ठेवी खाऊन मरते. म्हणून समाजाने त्याचा अभ्यास केला पाहिजे.

Updated : 5 Jan 2020 8:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top