Covid – 19 : आर्थिक मंदीचा भारत आणि जग कसा सामना करणार?

Trade in the time of COVID-19: The economic impact of coronavirus on India and beyond
Courtesy : Social Medi

Covid – 19 ने जवळ जवळ संपूर्ण जग Lock Down झालं आहे. त्यामुळं अगोदरच आर्थिक मंदीत असणारं जग आता अधिक अडचणीत आलं आहे. अनेक देशांची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेवरही कोरोनाचा गंभीर परिणाम होईल. भारताचा 2020 मध्ये विकासदर 5.3 टक्के राहील, असं भाकीत ‘मूडीज’ या संस्थेनी केलं होतं. पण आता त्यांनी सांगितलं आहे, भारताचा विकासदर 2.5 टक्के इतका राहील. जर भारताचा विकास दर 2.5 टक्क्यावर आला तर नोटाबंदीच्या काळापेक्षाही अधिक लोकांच्या नोकऱ्या जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

त्यामुळं कोरोना व्हायरस मुळं अनेक लोकांना आपली नोकरी गमवावी लागण्याची शक्यता आहे. एक दिवस मुंबई बंद राहिली तर साधारण ५०० कोटींचं नुकसान होतं. आता मुंबई गेल्या कित्येक दिवस बंद आहें. फ़क़त मुंबईचं नाही तर जगातील मुंबई सारखी अनेक शहरही बंद आहेत. अशा स्थितीत जगाचं लाखो कोटी रुपयाचं नुकसान होत आहे. भारतासारख्या विकसनशिल देशात शेती उद्योग हा महत्वाचा आहे. मात्र, लॉकडाऊन मुळं शेती उद्योगाची साखळी तुटली. आहे. त्यामुळं शेतीमुळं विकास दरात अधिकच घसरण होण्याची शक्यता आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला ५ ट्रिलीयन इकानॉमीचं दाखवलेलं स्वप्न सत्यात येईल का? Covid 19 च्या संकटातून देश कसा बाहेर येणार? यासाठी सरकारला कोणते प्रयत्न करावे लागणार? पाहा अर्थविश्लेषक अजय वाळींबे यांचे विश्लेषण…