Home > मॅक्स ब्लॉग्ज > छाती ५६ इंच असो की १५६ इंच, त्या छातीत भय भरलेलं असतं

छाती ५६ इंच असो की १५६ इंच, त्या छातीत भय भरलेलं असतं

छाती ५६ इंच असो की १५६ इंच, त्या छातीत भय भरलेलं असतं
X

सत्ता बनतांना पाहिल्या आहेत, बिघडतांना पाहिल्या आहेत. पण सत्ता थरथर कापतांना पाहण्याचा योगही आपल्याला आला आहे. सुप्रीम कोर्टानं अलोक वर्मांना पुन्हा पदावर आणल्यानंतर ४८ तासांच्या आतच वर्मांना मोदी अध्यक्ष असलेल्या समितीनं काढून टाकलं! वर्मा नावाच्या अधिकाऱ्या समोर मोदी नावाचे महापुरूष अक्षरशः थरथर कापत आहेत. एका प्रामाणिक अधिका-र्यापुढे देशाचे सर्वशक्तीमान पंतप्रधान थरथर कापत आहेत. इतके की सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पंतप्रधानांनी पालन केलं पाहिजे. याचं त्यांचं भानही सुटलं आहे. कोणी असं म्हणेल की ही सत्तेची मस्ती असते. असेलंही, पण त्यापेक्षा जास्त आहे ती भीती! खरं तर अलोक वर्मा आजपासून वीस दिवसांत निवृत्त होणारच होते, मग केवळ वीस दिवसांसाठी पंतप्रधान का घाबरत आहेत?

एकच कारण दिसतं. मोदींना अशी भीती वाटत असावी की राफेल प्रकरणात एक एफआयआर जरी वर्मांनी दाखल केला असता तरी या सरकारचं वस्त्रहरण झालं असतं. एवढ्या एकाच कारणासाठी सुप्रीम कोर्टानं दिलेल्या 'समिती' नावाच्या एका फटीतून मोदीजींनी पलायन केलं.

नैसर्गिक न्यायाच्या तत्वातून वर्मांना उत्तर देण्याची, स्वतःची बाजू मांडण्याची संधी द्यायला हवी होती, ती ही न देण्याइतकी सत्ता घाबरलेली आहे.

मोदीजींच्या सत्तेचा दिवा विझण्यापूर्वी मोठा होत आहे. ते २०१९ मध्ये होईलंच. महत्वाचा मुद्दा आहे तो असा की एक प्रामाणिक अधिकारी सर्वसत्ताधिशाला भयकंपित करू शकतो हा संदेश भविष्यातील राज्यकर्ते लक्षात घेतील.

हुकूमशहांची छाती ५६ इंच असो की १५६ इंच, त्या छातीत भय भरलेलं असतं हेच खरं.

Updated : 11 Jan 2019 5:18 AM GMT
Next Story
Share it
Top