Home > मॅक्स ब्लॉग्ज > राम कदमविषयी बोलताय, मग यावर पण विचार करा..

राम कदमविषयी बोलताय, मग यावर पण विचार करा..

राम कदमविषयी बोलताय, मग यावर पण विचार करा..
X

‘रामा’चा नवा अवतार गेले दोन-तीन दिवस आपण परत परत पाहतोय. असा“राम”, छिंदम, गिरीश महाजन यांच्यावर आपण जाहीरपणे बोलतो, आक्षेप घेतो. पण आपल्या आजुबाजुला अशी बेताल व आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राम कदम आणि छिंदमांच काय? यांच्या वसवसलेल्या नजरा, छातीकडे बघून बोलण्याची सवय याचं काय? स्वत: खूप मॅच्युअर्ड मॅन असल्याची स्टाईल मारत प्रत्येक बाई, मुलगी, अभिनेत्री, राजकारणी, सहकारी महिला यांच्यावर प्रत्यक कमेंट त्यांचा माणूस म्हणून विचार न करता केवळ एक उपभोगाची वस्तू म्हणून करणाऱ्यांचं काय? बाईशी निगडीत प्रत्येक घटना, माहिती किंवा प्रसंग यावर द्विअर्थी कमेंट करुन स्वत:चं ‘बोगस श्रेष्ठत्व’ मिरवणाऱ्या आपल्या आजुबाजुच्या रामांचं, छिंदमांचं काय? हाजरजवाबीपणा दाखवण्याची कसरत करताना आपलं नग्नत्व पुन्हा-पुन्हा सिद्ध करणाऱ्या या ‘गयारामां’चं काय ?

कॉलेजातले ग्रुप, वॉटसअपवर वसवस व्यक्त करण्यासाठी तयार करण्यात आलेले ग्रुप्स, ट्रेनमधल्या गप्पा, ऑफिसमधली सो कॉल्ड ‘हसी-मजाक’ आणि अशा असंख्य ठिकाणे... एखाद्या घटनेत बाई पात्र असले की घटनेची पूर्ण माहिती न घेता लगेच त्याचे इतर अर्थ काढून त्यावर गप्पा कुटायच्या यात अनेकांना धन्यता मिळते. याचा अर्थ असा नाही की बाई, मुलगी चुकीची नसते. पण तो मुद्दाच नसतो. आमची माध्यमं तर यावर कहरचं...माध्यमांतील पुरुषांच्या(आणि काही महिलांच्याही) ऑफएअर गप्पा व हसीमजाक कळस आणि किळस.

अशी वक्तव्य करण्यात आनंद मिळवणे आणि अशी वक्तव्य केल्याने आपण आपली हुशारी, मॅच्युअर्डनेस सिद्ध करण्याचा गैरसमजात समाधान मानतच अशांचं आयुष्य जातं. मला कौतुक याचं वाटतं, हे सगळं जाहीरपणे होत असताना आजुबाजुच्या नातेवाईक महिला, सहकारी महिला किंवा इतर कुणी यावर आक्षेपही घेत नाहीत.

अशा धोंड्यांपुढेचं मग राम कदमांसारख्या बोगस माणसाला असे वक्तव्य करण्याची हुक्की येते, हिंमत येते.

त्यामुळे आपला परिसर स्वच्छ करा, मगच देश स्वच्छ होईल...

आजुबाजुचा असा’राम’ आणि छिंदमांचं काय?-

पत्रकार सोनाली शिंदे

Updated : 6 Sep 2018 5:56 AM GMT
Next Story
Share it
Top