Home > मॅक्स ब्लॉग्ज > ऋषी कपूर : द लास्ट रोमन

ऋषी कपूर : द लास्ट रोमन

ऋषी कपूर : द लास्ट रोमन
X

“उठाईगिरा !? ... ये क्या वर्ड है? मैने तो कभी नहीं सुना .. रायटर को बुलाओ यार !”........ ‘अग्निपथ’ च्या सेटवर ऋषी कपूर यांची चिड चिड सुरू झाली होती. रौफलाला कांचाला त्याच्या तोंडावर ‘उठाईगिरा’ असं संबोधून अपमानित करतो. असा संवाद मी लिहिला होता. दिग्दर्शक करण मल्होत्राने ऋषीजींना आपल्या परीने समजावण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकेनात. “रायटर को बुलालो” असं म्हणत राहिले. मी गेलो तर ऋषीजी मला शब्द बदलायला भाग पाडतील असे करण ला वाटले असावे. नक्की कारण माहित नाही. पण करण ने मला त्यांच्यापुढे न्यायला टाळलं.

माझं ऋषीजींसोबतच एनकाऊंटर होता होता राहिलं. ऋषीजींनी मी लिहिलेला तो ‘उठाईगिरा’ शब्द convincingly उच्चारला. उठाईगिरा म्हणजे शून्य किंमत असलेला लफंगा माणूस.

स्विच ऑन - स्विच ऑफ म्हणून अभिनयाची एक पद्धत आहे. ज्या अभिनेत्यांच्या व्यक्तीमत्वाचा खूप प्रभाव जनमानसावर असतो. असे स्टार अभिनेते सहसा अभिनयाची ही पद्धत वापरतात. यात भूमिकेचा गृहपाठ वगैरे करायचा नसतो. दिग्दर्शकाने ॲक्शन म्हणताच पूर्ण शक्तीनिशी कॅरेक्टर मधे स्वत:ला झोकुन द्यायचं. दिग्दर्शकाने कट म्हणताच पुन्हा कॅरेक्टर मधून बाहेर.

ऋषीकपूर असं spontaneous अभिनय करण्यात बाप माणूस होते. काम convincing level ला आणन्यासाठी खूप ताकद लागते, या प्रकारात. शिवाय व्यक्तीमत्वात एक Aura असावा लागतो. हे सर्व ऋषी कपूर यांच्याकडे होते.

रौफ लालाचे पात्र ही त्यांनी याच अंगभूत ताकदीच्या जोरावर लीलया पेलले. रौफ लाला प्रेक्षकांच्या मनाच्या एका कप्प्यात कायमचा स्विच ऑन राहिला. सिनेमा उद्योगात आलेल्या कॉर्पोरेट कल्चर बद्दल ऋषीजी नाराज असत. करारनाम्यातल्या ‘अभिनेत्याला promotion साठी उपलब्ध रहावे लागेल. ‘या अटीवर त्यांची चिडचिड होई. “अॅक्टिंग भी करो .. प्रमोशन को भी आवो .. ये क्या बात हुवी !” असं ते म्हणत.

हल्लीचे अभिनेते रात्रीपण गॉगल का लावतात? असा प्रश्न ही त्यांना पडे. रेडिओ शी मात्र त्यांची चांगली गट्टी जमली होती. कारण त्यात जुनी गाणी लागत. ते रेडिओ अॅडिक्ट होते. पत्नी नीतू बरोबर भांडण लागलं की ते हटकून इंग्रजीतला एखादा अनवट शब्द तिच्यावर फेकत. नीतू मग भांडण बाजुला ठेवून तो काय शब्द होता. याचा विचार करत बसे. नेमकं काय बोलला असेल नवरा? .. मग डिक्शनरी उघडली जायी .. शाब्दिक भांडण English vocabulary development कडे वळे.

ऋषी कपूर तिकडे निवांत रेडिओ ऐकत बसत. भांडणातला शब्द न कळण्याच्या नीतूजींच्या त्या त्रासाची एक झलक नियतीने माझ्यामार्फत ऋषी कपूर यांना दिली असावी. असं एक गमतीशीर सूत्र माझं मलाच जाणवलं.

अग्नीपथ च्या त्या प्रसंगाच्या वेळी “कपूरांच्या डिक्शनरीत तो शब्द नसावा“ असं करणं हताशपणे बोलला होता. ‘शून्य किंमत असलेला माणूस’ अशा अर्थाचा शब्द कपूरांच्या डिक्शनरीत असावा तरी का? कपूर या शब्दातच एक Production Value आहे. या कपूरांनी सिनेजगतात ज़्याला हात लावला त्याचे सोने केले. कामातून शंभर टक्के देणे. एवढंच त्यांना माहित. ऋषीजींच्या “रायटर को बुलाओ” या वाक्यात खरंतर लेखकावरचा विश्वास जास्त प्रतीत होतो.

ही Old School thinking लेखकाला केंद्रस्थानी मानते. लेखकाला काय म्हणायचंय? हे समजून घेण्यात यांना रस असतो. हेच त्यांचं एकमेव ‘मेथड’ असतं. टॅक्सी वाल्याचा रोल करायचाय म्हणून ते टॅक्सी चालवत बसत नाहित. भूमिकेसाठी सहा महिन्यात बॉडी बनवणंही त्यांना जमत नाही. आपल्या Aura सकट पात्रामधे धाड़ कन उड़ी घेणाऱ्याold school पीढीतले ऋषि कपूर हे ‘लास्ट रोमन’ असावेत. .......ज्या पीढीत अडचणीच्या प्रसंगी “रायटर को बुलाओ !” असं म्हणन्याची जुनी परंपरा होती.

Updated : 1 May 2020 1:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top