Home > मॅक्स ब्लॉग्ज > एक होतो...एक राहूयात

एक होतो...एक राहूयात

एक होतो...एक राहूयात
X

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली असून या पोस्टमध्ये कोरेगाव भीमा येथे झालेल्या लढाईचा इतिहास सांगितला आहे.

महाराष्ट्राच्या अस्मितेचा इतिहास हा महाराजांच्या जन्मानंतर सुरु झाला. त्यांनी १८ पग्गड जातींना एकत्र करत रयतेच राज्य निर्माण केलं. काळ जस-जसा पुढे जात गेला तस-तशी परिस्थिती बदलत गेली. आणि राज्य पेशवेंच्या हातात गेलं. चातुर्यवर्णाच्या वरवंट्याखाली समाज पिसला जाऊ लागला. महाराजांनी १८ पग्गड जातींना सैन्यात स्थान दिल होत. जीवा महाला बहिरजी नाईक, मदारी मेहतर अशी अनेक उदाहरणे देता येतील. पण पेशवेंच्या राज्यामध्ये या बहुसंख्य जातींना प्रवेश नाकारण्यात आला होता. अस्पृश्यतेला स्वत: पेशव्यांनी जन्म दिला. अत्यंत हीन दर्जाची वागणूक शूद्रांना देण्यात आली. मनगटात ताकत असून देखील त्याचा उपयोगच करायचा नाही अस फर्मान पाठवण्यात आल. कसायला जमीन नाही, हाताला काम नाही, त्यामुळे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. अनेकवेळा विनंती करूनही तोंडावरच मडक आणि पार्श्वभागावरचा झाडू काढायला पेशवे तयार नव्हते. पर्यायाच उरला नव्हता. पण, अखेरीस ब्रिटीशांच्या सैन्यात आत्मसन्मानाची वागणूक आणि 'मान' धन मिळते बघून त्यात अनेक शुद्र सामील झाले.

३१ जानेवारी १७१७ रोजी सेनापती सरदार बापू गोखले यांनी खडकीवर हल्ला करायचा ठरवला. हि गोष्ट गुप्तहेराने ब्रिटीश अधिकारी Staunton ला कळवली. Staunton च्या हाताखाली असलेल्या ७०० सैनिकांनी भीमा-कोरेगावकडे कूच केली. त्यामध्ये सगळ्याच जाती-जमातींचे सैनिक होते. पण, संख्येने जास्त मात्र शुद्र होते. हि लढाई भीमा-कोरेगावमध्ये झाली. आणि त्यात पेशवेंचा दारुण पराभव झाला. हि लढाई आपल्या सीमा वाढविण्यासाठी होती. भौगोलिक ताबा घेण्यासाठी होती. यामध्ये राज्य-राष्ट्र नावाची संकल्पनाच नव्हती. किंबहुना त्याकाळी राज्य-राष्ट्र ही संकल्पना कोणाच्या ध्यानी-मनीच नव्हतीच लढाई ही राजांसाठी लढली जायची. आणि त्यामुळे जे सैनिक पेशवेंसाठी लढत होते ते पेशवे राजे म्हणून लढत होते. आणि ब्रिटीशांच्या सैन्यात असलेले सैनिक ब्रिटीशांसाठी लढत होते. ते कुठल्याही राज्य-राष्ट्राची निशाणी घेऊन लढत नव्हते. हाच खरा भीमा-कोरेगावचा इतिहास आहे. पण, त्याची सुरुवात शूद्रांना मिळालेल्या हीन दर्जाच्या वागणुकीमुळे झाली हे कधीही कोणी विसरू नये. आणि तो विजय लोकांच्या स्मरणात राहावा म्हणून ब्रिटीशांनी तिथे ६५ फुटी स्तंभ उभारला. त्यात सर्व जाती धर्माच्या सैनिकांची नावे कोरली. ते सैनिक होते. जातीने काय होते हे महत्वाचे नव्हतेच. एक मोठ्या फौजेचा पराभव केला म्हणून त्यांचा सन्मान व्हावा हे ब्रिटीशांच्या मनात होते. आत्मसन्मानासाठी जर शुद्र ब्रिटीशांच्या सैन्यात सामील झाले तर ती चूक कोणाची होती. ते कोणाच्या चुकीमुळे तिथे गेले. या इतिहासाचाही अभ्यास व्हायला हवा.

१ जानेवारी १९२७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा भीमा कोरेगाव येथील शौर्य स्तंभाला भेट देऊन त्या सैनिकांना आदरांजली वाहिली. त्याचाच आदर्श घेऊनआजही त्यांचे हजारो अनुयायी प्रत्येक वर्षी १ जानेवारीला कोरेगावला जाऊन ‘विजयस्तंभा’ला आदरांजली वाहतात.

भीमा-कोरेगावचे भांडवल करून लोकांची माथी भडकवणारे काही किडे हे आजही महाराष्ट्रात आहेत. त्यांची वैचारिक विषवल्ली जोपर्यंत आपण ठेचत नाही. तोपर्यंत आपली जाती-पातींवरची भांडण कधीच मिटणार नाहीत. ज्यांनी सावित्रीबाई फुले, ज्योतीबा फुले यांना दगडे मारली. ज्यांनी शाहू महाराजांना बदनाम केल. ज्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शाळेतही बसू दिल नाही. त्या मनुवाद्यानीच भीमा-कोरेगावच्या माध्यमातून परत एकदा चाल खेळली.आणि आपण बळी पडलो.

शाहू, फुले,आंबेडकरांचे पाईक आहोत आपण. मनुवादी आपल्यांत दुहीची बीजे पेरतायत.

Divide and and rule पुन्हा आणू पाहतायत...सावध होऊयात...

एक होतो... एक राहूयात.

जय शिवराय !

जय भिमराय !

Updated : 30 Dec 2018 9:40 AM GMT
Next Story
Share it
Top