Home > News Update > खिशात येणारा प्रत्येक पैसा त्याच्या संस्कृतीचं आक्रमण करतो !!

खिशात येणारा प्रत्येक पैसा त्याच्या संस्कृतीचं आक्रमण करतो !!

खिशात येणारा प्रत्येक पैसा त्याच्या संस्कृतीचं आक्रमण करतो !!
X

एका बाजूला मुलाबाळांसाठी इंग्रजीचं आकर्षण आणि दुसऱ्या बाजूला मातृभाषेचा अभिमान या दांभिकतेने मराठी भाषेवर वरवंटा फिरवला असल्याचं मत लोकशाहीर संभाजी भगत यांनी मॅक्समहाराष्ट्र : सकळ मराठी, प्रबळ मराठी या उपक्रमात मांडलं आहे. मराठी भाषेवर काम करू पाहणाऱ्यांसाठी हा एक वेगळा दृष्टिकोन ठरू शकेल.

मराठीच्या संदर्भामध्ये खूप दिवसांपासून ही चर्चा चालू आहे, मराठीची जी काही दडपणूक सुरू आहे, ती अंतर्गत बाब आहे.‌ आपला संपूर्ण समाज ज्या पद्धतीने विभागलेला आहे, इतर मराठी, प्रमाण मराठी आणि बाकीची मराठी, पुणे मराठी याच्यामध्ये दडपून आहेच, परंतु मराठीचा जो समूळ नायनाट आता होतो आहे, किंवा त्यावर जो वरवंटा फिरवलाय संपूर्ण.. तो संपूर्ण आंतरराष्ट्रीय भांडवलाची कमाल आहे आणि आंतरराष्ट्रीय भांडवल कधीही एकटं येत नाही.

कोणतंही भांडवल एकटं येत नाही, तुमच्या खिशामध्ये येणारा एक नवा पैसा, हा एकटा येत नाही, तो त्याची संस्कृती सोबत घेऊन येतो, तो त्याची भाषा सोबत घेऊन येतो. आज बहुराष्ट्रीय कंपन्यांचं जे संपूर्ण वर्चस्व आहे, त्या देशावर आणि आता काल ट्रम्प भारतामध्ये आले होते, त्यांच्याबरोबर पण डील होणार आहे. ही संपूर्ण जी डील आहे, ती एकतर अमेरिकन साम्राज्यवाद, युरोपियन साम्राज्यावाद्द, जापनीज साम्राज्यवाद, चीनी साम्राज्यवाद या ज्या महासत्ता आहेत, त्यांच्याबरोबर होत्या.

चीनने सुद्धा इंग्रजीचं धोरण अवलंबलेलं आहे. त्यांच्या तिथल्यासुद्धा भाषा संपत आहेत. तर हे जे संकट आहे ते भांडवलाने आणलेले संकट आहे, आणि ते फक्त एकट्या मराठीवर आलेलं नाही. ते गुजराती, किंवा भारतामधल्या इतर भाषा आहे, बोलीभाषा, कन्नडा, मल्याळी या सगळ्या भाषा क्रमाक्रमाने मरत आहेत. मुंबई ही महाराष्ट्रामध्ये, ते भांडवलाच केंद्र असल्याने ही प्रक्रिया वेगाने होताना दिसते. एवढाच फरक आहे.

आता इथल्या गरिबांसाठी ज्या काही शाळा आहेत, त्या प्रामुख्याने मराठी शाळा आहेत आणि मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंतांच्या शाळा ज्या आहेत, त्या सगळ्या पब्लिक स्कूल, आणि त्या ज्या काही वेगवेगळ्या शाळा आहेत, त्या सगळ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत आणि आपल्या देशात आता हे पक्क ठरलंय, लोकांच्या डोक्यात एक असतं, की माझा मुलगा किंवा मुलगी जर इंग्रजी माध्यमात नसेल तर तीचं करियरच होण्याची शक्यता नसते, त्यामुळे आता काय झालंय कि सामान्य ज्या घरामध्ये आई भांडी घासते, म्हणजे जिच्या घरामध्ये भांडी घासते तिचा मुलगा एका पब्लिक स्कूल मध्ये आणि ही भांडी घासणारी बाई पण, एका फडतूस इंग्रजी मीडियमच्या शाळा निघालेल्या आहे, तिथे मुलांना शिकवत असते. तिथे इंग्रजी माध्यम असतं आणि हिंदीमध्ये शिकवलं जातं आणि सर्व हिंदी मध्ये बोलतात, पण ती शाळा इंग्लिश मिडीयमची असते.

उदाहरणार्थ मी ज्या शाळेमध्ये शिकवत होतो, त्या शाळेमध्ये एकाही शिक्षकाला इंग्रजी बोलता येत नव्हतं आणि तरी ते इंग्रजी माध्यमामध्ये शिकवत होते, तर अश्या थर्ड ग्रेड इंग्रजी माध्यमाच्या शाळा निघालेल्या आहेत, तिथे ही दलित, मुसलमानांची आदिवासींची मुले सो कोल्ड इंग्रजी माध्यमात जातात आणि ज्यांचं काहीच नाहीये, vernacular languaage, मराठी माध्यम आहेत ज्यात ते जात नाहीत.

आता ही जी काही सगळी प्रतवारी किंवा ही जी उच्चस्तर, निच्चस्तर हा जो समाजामध्ये निर्माण झालेला आहे, त्याची त्या त्या वर्गाची जाणीव आहे आणि त्या जाणीवेनुसार ते ते भाषेची निवड करतायेत. तो जो मध्यम वर्ग जो आहे तो पूर्णपणे कच्छपी लागलेला आहे, आणि वंचित क्लास नष्ट झाल्यामुळे त्यातूनसुद्धा एक भ्रष्ट मध्यमवर्ग निर्माण झाल्यामुळे तो अधिक भ्रष्ट्पणे भाषेकडे बघतो आहे, भाषेच्या संवर्धनाकडे बघत आहे. अश्या लोकांनी तर गद्दारी केलेलीच आहे, हा तर काही मुद्दाच नाही, परंतु जिथे दलित, आदिवासी, भटके विमुक्त हे जे नुकतेच स्थिरावलेले वर्ग आहे, शहरामध्ये आणि इतर तर त्यानाही वाटतं की ही त्यांची भाषा नाही, त्यांनाही वाटत की इंग्रजीमध्ये टाकावं.

आता इंग्रजी माध्यमात टाकण यात काही चूक नाही, पण या सर्वात गोंधळ असा झालेला आहे, की आठवीपर्यंत मुले अशीच पास होतात, आणि त्याला स्वतःच नाव देखील इंग्रजीमध्ये लिहिता येत नाही. अशा अवस्थेमधून ती मुलं जातात, त्यामुळे याचा तडाखा जो आपल्याला बसलेला आहे, हा जो गोंधळ आहे हा ब्राह्मण्यवाद्यांनी फार स्पष्टपणे भांडवलशाहीबरोबर केलेली युती आहे, त्यातून हा सांस्कृतिक गोंधळ निर्माण झालेला आहे. त्यांच्या शाळा इंग्रजी आहेत, परंतु ते संस्काराने हिंदू आहेत, ब्राम्हणी आहेत, म्हणजे या शाळा उच्चवर्णीय आहेत, उच्चवर्गीय आहेत त्यातून सरस्वतीची प्रार्थना होते, आणि इंग्रजी माध्यमामधून शिकवलं जातं.

एका बाजूला कडक हिंदुत्ववादाची पेरणी आणि दुसऱ्या बाजूला साम्राज्यवाद्यांच्या भाषेची स्वीकृती, अश्या पद्धतीने ते सगळं चाललेलं आहे. आता या काळामध्ये मराठी वाचवण्याचे आपण प्रयत्न केले पाहिजेत, तर आता आपण काय प्रयत्न करू शकतो ?

आम्ही मराठीमध्ये लिहिणारी माणसे आहोत, आम्ही इतर भाषांमध्ये लिहित नाही, मराठी जास्तीत जास्त सेटवर, मराठी जास्तीत जास्त प्रसारित करणं एवढंच करू शकतो, बाकी काय करू शकतो आपण..? हे जे सरकार आहे ना, हे सरकारच मूळत: या सगळ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आणि कॉर्पोरेटशाहीच्या दबावाखाली दबलेले आहे, त्याचं nexus तेच आहे. त्याचं nexus आहे. मग आपलं काहीतरी टोकनवजा मराठी, जय जय महाराष्ट्र माझा, वगैरे भगवे फेटे घालून, ते काहीतरी नाटकं करणं आणि त्यातून त्यांना काहीतरी वाटतं की आम्ही मराठी, मी मराठी गाणे लावणं वगैरे वगैरे......आणि ते स्वतः इंग्रजी माध्यमातून आलेले असतात...असे सगळे दांभिक लोक आहेत. या दंभाचा स्फोट केला पाहिजे.

Updated : 27 Feb 2020 3:29 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top