Home > मॅक्स ब्लॉग्ज > या जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही कोरोनाला ब्रेक

या जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही कोरोनाला ब्रेक

या जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही कोरोनाला ब्रेक
X

गोंदिया जिल्ह्यात विषाणू बाधित एकही रुग्ण सलग दुसऱ्याही दिवशी आढळून आलेला नाही.12 ते 17 जून दरम्यान सलग सहा दिवसात 33 रुग्ण आढळून आले त्यामुळे जिल्ह्यात चिंतेचे वातावरण होते.मात्र काल आणि आज या दोन्ही दिवशी एकही रुग्ण जिल्ह्यात आढळून न आल्यामुळे कोरोनाला ब्रेक लागला आहे.त्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे.

26 मार्चला एक रुग्ण,19 मे रोजी दोन रुग्ण,

21 मे रोजी सत्तावीस रुग्ण,

22 मे रोजी दहा रुग्ण, 24 मे रोजी चार रुग्ण,

25 मे रोजी चार रुग्ण, 26 मे रोजी एक रुग्ण,

27 मे रोजी एक रुग्ण, 28 मे रोजी नऊ रुग्ण,

29 मे तीन रुग्ण,

30 मे रोजी चार रुग्ण,

31 मे रोजी एक रुग्ण,

2 जून रोजी दोन रुग्ण,

12 जून रोजी एक रुग्ण ,

13 जून रोजी एक रुग्ण,

14 जून रोजी एक रुग्ण,

15 जून रोजी चौदा रुग्ण,

16 जून रोजी पंधरा रुग्ण

आणि 17 जून रोजी एक रुग्ण असे 102 कोरोना बाधित रुग्ण जिल्ह्यात आढळुन आले.

आतापर्यंत जिल्ह्यात आढळलेले 102 कोरोना बाधित रुग्ण हे अर्जुनी/मोरगाव तालुका - 31,सडक/अर्जुनी तालुका - 10, गोरेगाव तालुका - 4, आमगाव तालुका -1, सालेकसा तालुका - 2, गोंदिया तालुका - 22 आणि तिरोडा तालुक्यातील 32 रुग्ण आहे.

जिल्ह्यातील 69 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले तर 33 रुग्ण एक्टिव्ह आहेत. .

Updated : 20 Jun 2020 2:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top