Home > मॅक्स ब्लॉग्ज > लव यू ज़िंदगी !

लव यू ज़िंदगी !

लव यू ज़िंदगी !
X

पाण्यावरील बुडबुडे म्हणजे यश नव्हे, ते निष्फळ ठरतात. ट्विटरवरचे लाखो आभासी चाहते, टिक टॉकचे करोडो प्रेक्षक, यूट्यूबवरच्या प्रशंसा किंवा सिनेमा हिट होणे म्हणजे यशस्वी होणे नाही. ज्यांना हे यश वाटते ते अगदी त्या वळूसारखे असतात, जो संस्कृतीच्या नावाखाली जीवनाला पायदळी तुडवून मृत्यूचा तांडव करतो. ज्यामध्ये चार पायांपासून दोन पायांचा जनावर बनलेला "मानव", आपल्या आत लपलेल्या हिंसक पशूला शांत करण्यासाठी चार पायांच्या प्राण्याशी लढतो. जीव गमावतो, परंतु त्या प्राण्याला हरवू इच्छितो, त्या प्राण्याला पराभूत करण्यात त्याचा विजय असतो. असा विजय त्याच्या आत एक अराजक हिंसक पशूला जन्म देतो आणि असे यश शेवटी मृत्यूच्या काठावर उभे राहते.

आयुष्यात कोणाला पराभूत करणे, जेव्हा यशस्वी होण्याचे मापदंड बनते तेव्हा विनाश निश्चित आहे. आज तुम्ही कोणा एकाला हरवाल, उद्या दुसरा कोणीतरी तुम्हाला हरवेल हे निश्चित आहे, त्यावेळी तुम्ही काय कराल... तिथेच मृत्यूचा उंबरठा तुमची वाट पहात असतो कारण विजयी होण्याचा किलिंग इंस्टिंक्ट तुम्हाला ठार करणार....

जागतिकीकरणाचा काळ निर्माणाचा नाही विध्वंसाचा काळ आहे. पूर्वजांची जमीन विकून तुम्ही श्रीमंत झालात. नोकरी विकून पॅकेजवर स्वावलंबी होणारे आहात तुम्ही. सरकार देशाला विकून जीडीपी वाढवत आहे, कमवत नाही.. तर तुम्ही ही कमवत नाही आहात, कर्जाखाली दबलेले आहात, म्हणजेच मृत्यूच्या दारात उभे आहात!

स्वत:ला मारून, म्हणजे दुसर्यााला पराभूत करून मिळवलेल्या यशाचे "ग्राहक" असतात, ते ग्राहक आहेत "मध्यमवर्ग". हा मध्यमवर्ग वैयक्तिक शोक बीभत्स रुपात साजरा करतो! मग ती हत्तीणीची जलसमाधी असो, किंवा व्यक्तीची आत्महत्या! व्यवस्थेच्या दडपशाहीला विरोध नाही करत, तेथे लाइव्ह रसगुल्लाचे आत्मचरित्र वाचतो !

या संप्रेषण तंत्राचा निर्दयी क्रूर विनोद पहा, मृत असलेल्या मध्यमवर्गीयांना हे दररोज लाइव्ह करत आहेत. त्यांच्यासाठी लोकशाही ही एक पूर्वजांनी दिलेली भेट आहे, ज्याला विकून हे विकासाच्या युगात लाइव्ह आहेत. या तंत्रज्ञानाचे निर्माता आणि व्यापारी देश असलेल्या अमेरिकेतील जनता, या कोरोनाच्या काळातही, आभासी नाही तर जाणीवपूर्वक लोकशाहीसाठी रस्त्यावर उतरली आहे. पण ग्राहक तर आभासी लाइव्ह आहेत.. नागरिक असते तर रस्त्यावर उतरले असते.

लक्षात ठेवा लोकप्रियता आपले यश नाही, बँक बॅलन्स आपले यश नाही, आपले यश आहे विकारांशी लढण्याची आपली योग्यता. विचारांना समर्पित जीवन.. कला तंत्राचा उपयोग करून कोणीही लोकप्रिय होऊ शकते, परंतु त्याला कलेचे मर्म माहीत असेल हे गरजेचे नाही ... कला माणसाला माणूस बनवते. जीवनाला उलगडते, कला आत्महत्येस उत्तेजन देत नाही.. जो असे करतो त्याला कलेचे मर्म माहित नाही, मग ती कितीही महान व्यक्ती असुदे... मग त्याने कितीही गायले असले "यह तख्तों.. यह ताजों की दुनिया".. शेवटी त्याने हे लक्षात ठेवायला हवे की आपण एक व्यक्ती आहोत ... आणि एका व्यक्तीला त्याच्या आयुष्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो .. जे जीवनासाठी परिस्थितीशी लढू शकत नाहीत त्यांची दुर्दशा निश्चित आहे ...

हीच दुर्दशा आपल्या लोकप्रिय नेत्याची ठरणार आहे, त्याने देशाला आत्महत्येच्या मार्गावर आणले आहे.. परंतु तो अगदी हिटलरसारखा लोकप्रिय आहे... मेंढऱ्यांचा सर्वात लोकप्रिय... मृत असलेल्या मध्यमवर्गाचा लाइव्ह आभासी नायक !

गोष्ट एवढीच आहे की आपल्या व्यक्तीला उलगडायचे आहे.. व्यक्ती जितकी स्थितप्रज्ञ राहून स्वतःला उमगत जाते तितकीच विकारांपासून दूर राहते... आणि कलेसारख्या, "व्यक्तीला माणूस बनवणाऱ्या साधने" ला कलंकित करू नका !

लाइव्ह आभासी होण्याऐवजी रस्त्यावर मार्गक्रमण करा.. कोट्यावधी ट्विटर चाहत्यांऐवजी, एक व्यक्ती आपली बनवा ज्याच्या जवळ रडू शकाल, हसू शकाल, शिवी देऊ शकाल, भांडू शकाल... ज्यांचे असे एकही मित्र नाही, त्यांची दुर्दशा निश्चित आहे ..

आयुष्यापेक्षा मोठं काहीच नाही ... व्यक्तीचे असणेच यात आहे की मृत्यूच्या कवेत ही जीवनाची बाग फुलवते.

लव्ह यू ज़िंदगी !

-मंजुल भारद्वाज

Updated : 1 July 2020 11:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top