Home > मॅक्स ब्लॉग्ज > OLX - ऑनलाईन लुटणारे X YZ

OLX - ऑनलाईन लुटणारे X YZ

OLX - ऑनलाईन लुटणारे X YZ
X

Covid 19 मुळे संक्रमणाचा वाढता धोका लक्षात घेता अशा संक्रमणाच्या नियंत्रणावर प्रशासन योग्य उपाययोजना करत असताना संपूर्ण यंत्रणा प्रचंड तणावाखाली आहे. करोना संदर्भात वाढत्या अफवा, त्यामुळे होणारे दुष्परिणाम रोखणे. त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलात आणणे. याबरोबर केंद्रसरकार कडून राज्य सरकारला मदतीपेक्षा सतत घेरण्याचा मनसुबा आखला जातो.

सत्ता कोणाची का असेना पण संकटाच्या काळात राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून सह्याद्री सारखे कणखर व्हायचे असते. अशा दिवसात महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेते यावेळी महाराष्ट्र धर्म विसरतात. हे आजच्या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे दुर्दैव.

कोरोना आणि लॉकडाऊन च्या दिवसांमध्ये लोकांना बाहेर पडता येत नाही. सामाजिक अंतर ( सोशल डिस्टंसिंग ) चे पालन आणि कोरोना चा संवेदन संपर्क यामुळे आपल्या कुटुंबाच्या काळजीमुळे अनेकांना मार्केट मध्ये जीवनावश्यक साहित्य खरेदी-विक्री करणे. या दिवसांमध्ये अवघड झाले आहे.

समाजाप्रती संवेदना जाग्या असणाऱ्या लोकांना कुटुंबाप्रमाणेच समाजिकभान सुद्धा काही वेळा निर्बंध आणते. गुन्हेगारी याच दिवसात वाढण्याच्या शक्यता आहेत. असे पोलीस प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न अनेक मार्गानी केल्याचे दिसत आहे. सराईत गुन्हेगार या दिवसात वेगवेगळ्या पद्धतीने गुन्हे करण्याचा धोका वाढला आहे.

पोलीस प्रशासन कोरोना आणि सामाजिक, वैद्यकीय सेवेत गुंतले असल्यामुळे पोलीस दलावर प्रचंड ताण असल्याचा फायदा क्राईम करणारे क्रिमिनल विविध मार्गांचा अवलंब करण्याच्या शक्यता नाकारता येत नाहीत.

लोक बाहेर पडत नसल्याने बँकांचे व्यवहार आणि खरेदी -विक्री साठी मोबाईल ऍप चा वापर वाढला आहे. काही App ची विश्वासार्हता अनेक सायबर तंज्ञानी त्या त्या देशांच्या तंत्रज्ञानावर प्रश्न उभे करून समाजासमोर आणली असताना असे App वापरताना काळजी घेण्याचा सल्ला वेळोवेळी या लोकांनी दिला आहे. निरनिराळ्या पद्धतीने बँकिंग App वापरताना तुमचे कस्टमर आयडी किंवा पासवर्ड मोबाईल मध्ये जतन ( सेव्ह ) करणे. नेहमी टाळत राहा किंवा शक्यतो अशा व्यवहारांच्या संदर्भातील गुप्त माहिती तुमच्या व्यतिरिक्त अगदी तुमच्या विश्वासातील व्यक्तीलासुद्धा सामायिक वाटणे. ( शेअर करणे ) शक्यतो टाळा.

प्रत्येक सायबर, मोबाईल App मधील व्यवहाराचे तपशील तुमच्या मेल वर जतन करण्याची सवय ठेवा. ज्यामुळे तुम्हाला तुमचे अंतिम व्यवहार दिनांक, क्रमांक लक्षात ठेवणे आणि सायबर गुन्ह्यातील तपास करण्यासाठी उपयोगी पडेल.

पेटीएम App हे सर्वत्र व्यवहारासाठी सध्या अनेक ठिकाणी ऑनलाईन व्यवहारासाठी वापरले जाते. चीन बनावटीचे हे App याची विश्वासार्हता यावर प्रश्नचिन्ह उभे करत गूगल पे किंवा अमेझॉन पे चा वापर अधिक जास्त सुरक्षित असल्याचे सांगताना त्याच्या तांत्रिक बाबींवर प्रश्न उभे करत अशा सर्व तंत्राचा अभ्यास असणारे इंजिनियर साईनाथ कोळी यांनी स्पष्ट केले.

वाढती सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी सायबर क्राईम पोलीस सतर्क आहेत. त्यामुळे कोरोनाच्या या दिवसांमध्ये नागरिकांनी सुद्धा जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. मोबाईल App मधील OLX सारखे App पोलिसांच्या सतत ट्रॅक वर आहे. सर्वात जास्त खरेदी-विक्री या App वरून करणे जास्त सोयीचे आणि सोपे असल्याने लोकांना पहिल्या पसंतीला हे नेहमी असते.

OLX वरून चोरीचे मोबाईल, वस्तू जुन्या असल्याचे सांगून देखील विकल्या जातात, घेणाऱ्यांना परवडतात. त्यामुळे काही जण अशा वस्तूंचा इतिहास, डॉक्युमेंटेशन, पेपर्स, बिल इत्यादीची विचारणा करत नाहीत. आणि मग एखाद्या गुन्ह्यातील वस्तू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्यावर ते अशा व्यवहारात अडकण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

नुकत्याच OLX वरून टाइम्स नाऊ चे Editor कृष्णा पांडे यांच्या पत्नीची घोर फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. सायबर गुन्हे करणारी ही संघटीत टोळी पर राज्यातील मोबाईल सिम कार्ड चा वापर करून तुम्हाला व्यवहाराचे आदान प्रदान होणारे चुकीचे मेसेज दाखवून तुमच्याकडून मोठ्या प्रमाणावर पैसे त्यांच्या कडे व्यवहारीत करून घेते. पण आपली चूक लक्षात येण्याआधी खूप उशीर झालेला असतो.

सायबर पोलीस आणि स्थानिक पोलीस या सर्व प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत आहेत. त्यामुळे OLX सारख्या App वरून व्यवहार करताना सावधानता बाळगण्यात यावी. पुण्याला विमानतळ पोलिसांनी चक्क मोठा कायमस्वरूपी फ्लेक्स लावून नागरिकांना OLX वरून होणाऱ्या व्यवहारांबाबत सावधानता बाळगण्यास सांगितले आहे. OLX चा वापर करत हे संघटीत सायबर गुन्हेगार आर्मी, एयर फोर्स, सीआयसीफ इत्यादी कर्मचारी असल्याचे गणवेशधारी ओळखपत्र दाखवून, विमानतळ येथे नोकरीस असल्याचे सांगून OLX वर मोटार सायकल, महागडे मोबाईल, चार चाकी वाहने विकण्यास आहेत.

अशी जाहिरात करत वाहन, मोबाईल खरेदी करण्यासाठी ऑनलाईन पेटीएम द्वारे पैसे भरण्यास सांगतात. आधी पैसे भरा वाहन चार दिवसांनी तुम्हाला तुमच्या पत्त्यावर पाठवतो. आवडले नाही तर पैसे परत मिळतील असे सांगण्यात येते. परंतु प्रत्यक्षात संघटीत सायबर गुन्हेगारांकडून आपली फसवणूक झाल्याचे काही दिवसांनी आपल्या लक्षात येते. त्यामुळे करोना आणि लॉकडाऊन च्या काळात अशा सायबर गुन्हेगारीला ऊत येण्याची शक्यता जास्त आहे.

त्यामुळे मोबाईल App वापरताना संपूर्ण खबरदारी हीच आपली सुरक्षितता असणार आहे. थोडक्यात ट्रोलिंग चे विष वृक्ष लावणारे जसे आज सत्तेबाहेर राहून विषाची फळे चाखत आहेत. तसेच एक दिवस सायबर गुन्हेगारी वाढविणाऱ्या गुन्हेगारांना व्याजासकट परिणाम भोगण्याचे दिवस पोलीस एक दिवस दाखवतीलच यात शंका नाही.

Updated : 6 May 2020 11:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top