Home > मॅक्स ब्लॉग्ज > लोकसभा निवडणुकीच्या वातावरणात काही अराजकीय गोष्टी - रविशकुमार

लोकसभा निवडणुकीच्या वातावरणात काही अराजकीय गोष्टी - रविशकुमार

लोकसभा निवडणुकीच्या वातावरणात काही अराजकीय गोष्टी - रविशकुमार
X

आज मला अराजकीय बाबींवर बोलावंस वाटतयं. मी राजकरणावर बोलू इच्छित नाही. राजकीय बाबींचा मला कंटाळा आला आहे. त्यामुळे थोडसं अराजकीय बाबींवर बोललं बरं. म्हणून असं काही केलं जावं. ज्यात राजकारण येणार ऩाही. निवडणूकांचा कालावधी खूप मोठा झाला आहे. पत्रकार देखील थकले आहेत. काही पत्रकारांनी बाहेरुन कानोसा घेतला. मात्र, मोदी-मोदींच्या घोषणा ऐकायला आल्या नाहीत. संपादकानी हिशोब मागितला तर, पत्रकार खाली माना घालून उभा राहिले. त्यानंतर दुसरे पत्रकार पाठवले. त्याने जनतेचा कौल समजून घेतला. तेव्हा लक्षात आले की, २०१९ ला लाटेच्या जागेवर अंडरकरन्ट आला आहे. वारे वरुन वाहत असून अंडरकरन्ट जमिनीवरुन जात आहे. तेव्हा विचार केला की, निवडणूकांच्या काळातच राजकारण होत नसेल तर राजकारणापासून थोडसं दूर व्हायला हवं. थोडसं वेगळे काहीतरी करायला हवं. तर आंबे खाऊया. पण आंबे कसे खातात ? दशहरी आणि चौसा हे आंबे तर चोखूनच खावे लागतात. मात्र, मालदा खाण्यासाठी चमचाच लागेल. जर काहीच कळत नसेल तर सफेदाच खा… मॅगो शेकही चालेल. पण मला सफेदा आवडत नसला तरी काय करणार आंबा आहे. खराब लागू शकतो.

राजाच्या समोर त्याला कधीच असं म्हणू नये की तो मला आवडत नाही. तो म्हणजे सफेदा आंबा. मॅंगो शेकमध्ये काय कळतं आतमध्ये कोणत्या आंब्याचा रस आहे. दूध साखर आणि चेरीची चव रेंगाळत राहते. जर जास्त प्रमाणात चेरी टाकल्या तर मॅंगो शेकची चव जाते. अशा वेळेस तुम्ही मॅगो लस्सी घेऊ शकता. आंब्याला तुमच्या समोर चौहोबाजूंनी दाखवल्यानंतर तुमचा विश्वास बसू शकतो की हा आंबाच आहे. त्यानंतर सालं काढून कापताच तोंडाला पाणी येतं. मग, काय ? मिक्सरमध्ये दही टाकलं, आंबा टाकला आणि गरका मारला तर लस्सी तयार. हो, पण ती पिण्याची एक पद्धत आहे. आता तुम्ही खाण्याच्या पद्धतीचच बघा. कसं ही खा पण या लोकांसारखं खाऊ नका. पण मजा तर असंच खाण्यात येते. असं वाटतं की खूप दिवसांनी आंबा खायला मिळाला. पिळूनच काढला बिचाऱ्या आंब्याला. वाटतच नाही की, आंबा माणूस खातोय, वाटतंय मिक्सरच खातोय. ऋतू पण मध्ये निघून जातात आणि इतक्या काळानंतर खायला मिळालाय म्हणजे खायची इच्छा होणारच ना?

काय मग, तुम्हाला बरं वाटतंय ना ? की आपण अराजकीय गोष्टींवर चर्चा करतोय. यामुळे कोणी नाराज पण होत नाही. म्हणतात ना ‘आम का आम दाम के दाम’ तुम्हाला वाटत असेल तर की मी असं का बोलतो आहे. अरे देशाचे पंतप्रधान जर अराजकीय बोलत असतील तर आमचं काय ? पंतप्रधानांना लोक म्हणाले तुम्ही कुमारला मुलाखत द्या त्यांनी अक्षय कुमारला दिली. त्यामुळेच निवडणूकीच्या वातावरणात आंब्यावर चर्चा करता येते. एकदा अकबर इलाहबादी यांनी लाहोरला आंब्याचे पार्सल पाठवले. इकबालने ते सुखरुप मिळाल्याचे कळवताच इलाहाबादी यांनी आश्चर्य व्यक्त करत एक शेर लिहिला…

‘’असर ये तेरे अन्फ़ास-ए-मसीहाई का है

‘अकबर’ इलाहाबाद से लंगड़ा चला लाहौर तक पहुंचा’’

पण या आंब्याच्या प्रश्नानं प्रसुन जोशींच्या त्या प्रश्नांना चांगलीच टक्कर दिली. जोशी यांनी विचारले होते ही फकिरी येते कुठून ? पण अक्षयकुमारला माहित होते. आपण फकिराची नाही तर पंतप्रधानांची मुलाखत घेत आहोत. तरी पण, प्रसुन जोशी आणि अक्षय कुमार यांच्या प्रश्नांकडे पाहिले पाहिजे, की कोणाचे प्रश्न जास्त राजकीय आणि अध्यात्मिक आहेत. जोशी यांना त्यांच्यात फकिर दिसला तर अक्षयला एक सैनिक आणि संन्यासी दिसला.

आज काल जर कोणी मुलाखत घेत असेल तर त्या मुलाखतीचं विश्लेषण केले जाते. त्या मुलाखतीची चिरफाड केली जाते. काय अक्षयकुमारकडून एखादा प्रश्न राहिला का ? आपण जेव्हा मुलाखत घ्यायला जातो. तेव्हा दहा प्रश्न घेऊन जातो. त्यातील दोन चार प्रश्न राहून जातात.

२०१४ मध्ये बाळ नरेंद्र नावाचं लहान मुलांसाठी एक कॉमिक्स आलं होतं. माझ्या मते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. ज्यांनी निवडणूका लढवताना कॉमिक्सच्या माध्यमातून आपली कथा सांगितली होती. त्यानंतर किरण बेदीने त्याची कॉपी केली होती. मोदी जेव्हा लहान होते. तेव्हा ते वडनगर शर्मिष्ठा तलावाकडे खेळायला जात होते. तेव्हा बाळ नरेंद्र घाबरत नव्हते. तेव्हा मोदी उडी मारुन बॉल परत घेऊन येत असत. असंच एकदा ते खेळत असताना त्यांना मगरीचं एक पिल्लू आढळत तेव्हा ते त्याला घरी घेऊन येतात. तेव्हा त्यांची आई त्यांना सांगते. पिल्लाला त्याच्या आईपासून वेगळं करु नको. त्याच्या आईला दु:ख होते. त्यानंतर मोदी त्या पिल्लाला तलावात नेऊन सोडतात. (वैधानिक इशारा - अशा प्रकारचे कृत्य करण्याचे प्रयत्न करु नका)

माझ्या मते अक्षयकुमार ने याबाबतचे प्रश्न सोडले नाही तर आणखी माहिती मिळू शकली असती. की, तो किस्सा काय होता ? ज्या तलावाच्या किनारी मोदी रोज जात होते त्या तलावात मगर होती हे त्यांना माहित कसं नाही पडलं. मगरीला उचलल्यानंतर त्यांना भीती कशी नाही वाटली. हे ही अक्षयकडून विचारायचे राहून गेले. पण एवढं काही नाही आमच्याकडून पण असं होतं. निवेदकांना तर प्रश्नच आठवत नाही, समोर गेल्यावर. तुम्ही झोपता कधी हे विचारून निघून येतात. मस्करीची गोष्ट वेगळी आहे. अराजकीय मुलाखतीसाठी धन्यवाद ! मोठ-मोठ्या मुद्यांपासून वाचलो. तसचं बाळ नरेंद्रची कथा वाचा… यामध्ये सदऱ्याचा उल्लेख आहे. जो की अक्षय ने ही विचारलेल्या प्रश्ना संदर्भात आहे. अक्षय ने विचारलेल्या अनेक प्रश्नांचा उल्लेख या विनोदी कथेत आहे. जसं की कपडे स्वतःच इस्त्री करायचे, इस्त्री नव्हती तर भांड्यामध्ये कोळसा टाकून प्रेस करायचे.

राजकारणाच्या या युद्धात अराजकीय काय असतं. ते उमेदवार आहेत. त्यांची पार्टी निवडणुकीच्या रिंगणात आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अराजकीय होतील. यामुळे चर्चा तरी झाली. त्यांचं भाषण असो किंवा मुलाखत अप्रतिमचं दाखवली जाते. विरोधी नेतेही आंबे खातात तेही सांगू शकतात. जर कोणत्या चॅनलने नाही दाखवलं तर यूट्यूब वर टाकू शकता. म्हणजेच अक्षयकुमारच्या या मुलाखतीसाठी काय त्रास आहे. जर विरोधी नेत्यांचा हलका फुलकी जुनी एखादी मुलाखत पंतप्रधानांनी ट्विटर वर टाकली तर…

खरं हेच आहे की, या निवडणुकांमध्ये मुद्द्यांनी नमस्कार केलाय. मुद्दे शिमल्याला गेलेत. यासाठी आम्ही प्रयत्न केला की, राजकारणाला सोडून काहीतरी नवीन करावं. ती तर त्या निवडणुकीची गोष्ट आहे. ज्यामध्ये मुद्द्यांवर लक्ष दिलं जायचं. गरिबी, उपासमार, बेरोजगारी, भिंतीवर प्रचाराची जाहिरात केली जायची. ‘सबको काम, सबका नाम. आता अचानक प्रत्येक मुद्दा मोकळेपणा जाणवायला लागलाय. वादळं येतात, वाघ येतो. पण मुद्देच येत नाहीत. इतकं राजकारण नको झालंय की आता राजकारण सोडून नवीन काही तरी करावास वाटतंय. कुणालाच राजकारण नको वाटतंय. विम्याचे पैसे मिळत नाही. नकोयेत पण...हमीभाव मिळत नाहीये, नकोय. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. शाळेची फी महाग झाली आहे, देऊ ! शाळेवाले आणखी मागतायत देऊन टाकू. नोकरी नकोय. आम्ही बेरोजगार राहू. पण आम्हाला बोलायला मुद्दा देऊ नका. मतदारांसाठी मुद्द्यापेक्षा मोठा देश आहे. मुद्दा देशापेक्षा छोटा आहे. आम्ही छोट्या गोष्टींबद्दल बोलत नाही. मोठया गोष्टी करू यासाठी राजकारण सोडून काहीतरी हटके करा. पाच वर्षे काम करा आणि नंतर अचानक विजेंद्र आणि गौतम गंभीरचे स्वागत स्वागत करा. मागच्यावेळी ज्यांना हरवलं. आता त्यांचंच स्वागत करा. आता नेता पण राजकारणाला कंटाळलाय. त्यांचं कधी स्वागत कराचय. कधी विरोध करायचा खूप अवघड प्रश्न आहे. यासाठीच राजकारण सोडून दुसरं काही करा.

Updated : 27 April 2019 4:03 PM GMT
Next Story
Share it
Top