Home > मॅक्स ब्लॉग्ज > साहिर: स्त्रीमुक्तीचं पुरूषभान लाभलेला शायर...

साहिर: स्त्रीमुक्तीचं पुरूषभान लाभलेला शायर...

साहिर: स्त्रीमुक्तीचं पुरूषभान लाभलेला शायर...
X

साहिरने चित्रपटांसाठी गाणी लिहिली त्यातही संधी मिळेल तिथे त्याने माणुसकीचा संदेश दिला आहे. अनेक कविता, गाण्यांतून तर त्याने स्त्रीयांचं बंडच रेखाटलं आहे. आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि साहिरचा जन्मदिवस. हा तर दुग्धशर्करा योग ! आजपासून साहिरचं जन्मशताब्दी वर्ष ! हळवा, संवेदनशील तितकाच बंडखोर स्वभाव असलेल्या साहिरला उलगडून सांगतायंत, प्रसिद्ध निवेदक व सिनेसंगीताच्या अभ्यासक डाॅ. चारूमित्रा माखिजानी-रानडे

अब्दुल हयी उर्फ साहीर लुधियानवी आज ८ मार्च साहिर यांचा जन्म, फिल्मी आणि शायरीच्या दुनियेत शब्दांची जादू घेऊन आलेला हा शायर व गीतकार.. कारण साहिर शब्दाचा अर्थ म्हणजेच जादू...आयुष्याच्या विविध टप्प्यावर आपल्याला भेटतो आणि आपल्या भावनांना अचूक अभिव्यक्ती देऊन जातो.

तसव्वूर में कोई बसता नहीं हम क्या करें, ये दिल तुम बिन लगता नहीं हम क्या करें.....(फिल्म.. इज्जत, रफी- लता)

तारुण्याची पहिली चाहूल ह्या पेक्षा जास्त काय रोमँटिक होऊ शकते??

दूर रहकर न करो बात करीब अा जाओ, याद रह जायेगी ये रात करीब आ जाओ (फिल्म.. अमानत, रफी)

प्रेमाचा पुढचा व परिपक्व टप्पा म्हणजेच समर्पणाची भावना, साहिरच हे पुढील गाणं या भावनेचा कळस आहे.....

तुम अपना रंजो- गम अपनी परेशानी मुझे दे दो...(फिल्म शगुन, जगजीत कौर).

तिला माहित आहे तो तिचा होऊ शकत नाही, जिचा झालाय तिच्याशी पण बिनसलेलं आहे, पण त्याला दुःखी बघून हिला जो त्रास होत आहे, तरी पण ती कुठली ही अपेक्षा न ठेवता समर्पित होऊन त्याला त्याच्या दुःखातून बाहेर काढायचा जो काही आटापिटा करत आहे तो साहिर च्या काव्यामुळे व्यक्त झालाय. प्रेमाला, त्या पात्राला आणि समर्पणाला एका उंचीवर घेऊन गेलाय.

वो दिल जो मैने मांगा था मगर गैरो ने पाया था, बडी शय है अगर...उसकी पशेमानी मुझे दे दो.

तु माझा नाही झालास, इतर कोणाला दिल दिलास, आता तुला लाजिरवाण(पशेमानी) वाटत असेल तर हेही भावना पण मला देऊन टाक...मोकळा हो.

मैं देखू तो सही दुनिया तुम्हे कैसे सताती हैं... कोई दिन के लिए अपनी निगेहबानी मुझे दे दो...!!

मी पण बघते न आता कि दुनिया तुला कशी छळते, काय बिशाद कोणाची?? पण काही दिवसांसाठी तुझी काळजी (निगेहबनी) घेण्याचा हक्क तरी मला दे, माझा कायम चा होऊ नकोस....काय ताकद आहे

बघा शब्दांची..अप्रतिम!!

हे असं कोण लिहितं सांगा मला?? आणि ते पण फिल्मी गीत??? आपल्या भावनांच्या किती खोल आणि किती किती उंचावर घेऊन जातो हा शायर, गीतकार...अगदी त्याच्या निसर्ग गीतासारखा..

झूला धनक सा धीरे धीरे हम झूलें

अंबर तो कया है तीरों के भी लब छू लें (,house. no. 44)

धनक=इंद्रधनु चा झोपाळा करून आकाश आणि ताऱ्यांपर्यंत जाण्याची निरागस स्वप्ने.....!!!

निसर्गचित्रांमध्ये त्याने कमाल केली आहे. Personification of Nature अशा तऱ्हेने साहिर करतो की आपण चकित होऊन जातो :

१.पेड़ों की शाखों पे सोयी सोयी चांदनी, तेरे खयालोंमें खोयी खोयी चांदनी, और थोड़ी देर में थक कर लौट जायेगी, रात ये करार की फिर कभी न आयेगी (फिल्म -जाल, हेमंत कुमार)

२. दूर वादी में दुधिया बादल झुक कर पर्बत को प्यार करते हैं, दिल में नाकाम हसरतें लेकर हम तेरा इंतज़ार करते है...

(फिल्म-रेल्वे प्लैटफार्म, लता)

निसर्गाच्या रंगामध्ये मानवी भावना मिसळून जातात. तसं तर त्या काळात सर्वच गीतकार उत्तमोत्तम गीत लेखन करत असत .....पण साहिर सिनेमात आला तो आपला एक आगळा वेगळा रंग घेऊनच. श्रोत्यांना मंत्र मुग्ध करून टाकलं. गीतांमधील नाजुक भावना आणि काव्य समजून घेण्यासाठी लोक उर्दूतले शब्दांचे अर्थ शोधायला लागले, आपली अभिरूची समृद्ध केली त्याने.

असं म्हणतात की शायराची लेखणी जर अश्रुंच्या शाईमध्ये बुडालेली असली की त्याच्या शायरीमध्ये रस येतो. साहिरचं तर पूर्ण बालपण व तारुण्य संघर्षमय होते. आपल्या आईवर त्याचे जीवापाड प्रेम होते. जमिनदार घराण्यातला असूनदेखील सतत पैशाची चणचण होती. कारण आईने वडिलांपासुन फारकत घेऊन आत्मसम्मान निवडला होता आणि साहिर ने निवडलं आईबरोबर राहणं. आपल्या आई विषयी तो अतिशय हळवा व possesive होता इतका की त्याने लग्नच केले नाही. तो संपूर्ण स्त्री जातीबद्दल शोषित व पीड़ितांबद्दल खूप संवेदनशील होता. त्याची चकले नावाची कविता प्रसिद्ध आहे. " ये कूचे ये नीलामघर जिंदगी के.............(फ़िल्म प्यासा, रफी)

स्त्रियांच्या हक्कासाठी त्यांनी कुठलीही झंडा उठाओ वाली चळवळ केली नव्हती , कारण त्यांची कलम स्वत: एक क्रांति होती. हा एक योगायोगच आहे की त्यांचा वाढदिवस ८ मार्च, आंतरराष्ट्रीय महिला दिनालाच आहे. आजपासून साहिरचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होतंय.

"तुलती हैं कही दीनारों में,

बिकती हैं कहीं बाजारों में,

ये वो बे-इज्जत चीज हैं जो,

बँट जाती है इज्जतदारोंमें .........

स्त्री मुक्ति आणि त्यांच्या हक्कांबद्दल तो अतिशय नाजुक-सूक्शम पण सशक्त शब्दांमध्ये विचार मांडत राहिला.

" रिवाजोंकी परवाह ना रस्मों का डर हैं, तेरी आंख के फैसले पे नजर है !!!!

( फ़िल्म. धूल का फूल, म. कपूर)

"कौन केहता हैं कि चाहत पे सभी का हक है, तू जिसे चाहे तेरा प्यार उसीका हक है, मुझसे कह दे , मैं तेरा हाथ किसे पेश करूँ??

(फ़िल्म. गझल, रफ़ी )

हे गीत ज्या काळात लिहिले गेले तेव्हा तर काय पण अजुनही असे स्वातंत्र्य किती स्त्रियांना मिळालेले आहे? अशा पुरोगामी विचारवंत आशावादी, संवेदनशील, शायराला आमचा सलाम !

नैया पुरानी तूफान पुराने हैं,

अपने लबोंपे मगर आज भी तराने हैं

-डॉ. चारुमित्रा रानडे, गोवा

(लेखिका आयुर्वेदाच्या डाॅक्टर असून उत्तम निवेदक व सिनेसंगीताच्या अभ्यासक आहेत.)

Updated : 8 March 2020 3:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top