Home > मॅक्स ब्लॉग्ज > 'इंस्टाग्राम'बद्दल हे तुम्ही वाचलात का?

'इंस्टाग्राम'बद्दल हे तुम्ही वाचलात का?

इंस्टाग्रामबद्दल हे तुम्ही वाचलात का?
X

Social मीडिया हे मुळात communicationचं, संवादाचं माध्यम. दूर राहणारे नातेवाईक, संपर्कात नसणारी मित्रमंडळी या सगळ्यांना बांधून ठेवायला हे इंटरनेटचं जाळ कामी येणार असं वाटून सुरू झालेले हे संवादाचे प्रयत्न! आणि यांनी संवादाची भाषाच बदलली. तरुणाईची परिभाषा बदलली सध्या याच सोशल मीडियाचा वापर खूप होत आहे. फेसबुक, ट्टिवटर आणि इंस्टाग्रामने तरुणाईला भुरळ पाडली असून जसं साखरेला मुंग्या लागतात तसं सोशल मीडियाला लाखो लोक जो़डले गेले आहे. सोशल मीिडयाचा एक भाग इन्स्टाग्राम देखील आहे

मुळात इंस्टाग्राम हा चार-पाच प्रकारात मोडतो. एक तर फूड ब्लॉगिंग, ट्रॅव्हल ब्लॉग, फोटोग्राफर, सेलिब्रिटी आणि राजकारणी असे काही प्रकार आहेत.

इंस्टाग्राम आणि फेसबुकमध्ये फार काही बदल नाही परंतु युजर्सनी फेसबुक पेक्षा आता इंस्टाग्रामला जास्त पसंती दिली आहे. सेलिब्रेटी, तरुणमंडळींचा आणि काही प्रमाणात राजकारणी मंडळीचा यावर धुमाकूळ सुरु असतो. विशेष म्हणजे काही फोटो आणि व्हिडीओ जर अपलोड करायचे असेल तर सगळ्यात महत्वाचं असत ते म्हणजे # हॅशटॅग. फोटोशी निगडित हॅशटॅग तुम्ही टाकला तर त्याचा तुम्हाला फायदा होतो. तुमचे फॉलोवर्स वाढत असतात..

इंस्टाग्राम बद्दल जर बोलायचे झालं तर मला फेसबुकपेक्षा इन्स्टाग्राम सोपे वाटते आणि त्यात फेसबुकसारखा विसंगतीपणा नसून सरळ, सोप्या आणि सहजरित्या युज करणारं हे इंस्टाग्राम आहे.

- जैताली नाटे, (नेटिझन्स)

का तरुणमंडळी आकर्षित होतेय 'इंस्टाग्राम'कडे?

सोशल मीडियाशी जोडल्या गेलेल्या तरुणमंडळींना नेहमी काही तरी नवीन हवं असतं ज्या प्रकारे फेसबुक नेहमी आपल्या नवीन वर्झनने नेटिझन्सला आकर्षित करत असतो. परंतु सतत फेसबुक युज करणारी मंडळी आता इंस्टाग्रामकडे वळलेली आपल्या पाहायला मिळतेय. कारण इंस्टाग्राममध्ये फोटो किंवा व्हिडीओ अपलोड करायचा असेल तर ते लवकर आणि अगदी सोप्यापद्धतीने अपलोड होते. तसेच यावर सेलेब्रिटीच्या िकंवा मनोरंजनाविषयक घडामो़़डींची अपडेट लवकर मिळत असते. युर्जसने सोप्या आणि प्रायव्हसी असलेल्या सोशल नेटवर्किंगवर म्हणजेच इंस्टाग्रामवर राहण्यास जास्त पसंती दिली आहे. फेसबुकवर युर्जस ज्या गोष्टी शेअर करू शकत नाहीत त्या इंस्टाग्राम अकाउं़टला प्रायव्हसी असल्याने सहजपणे शेअर करु शकतात. इथे नातेवाईक कोणी नजर ठेवेल अशी भीती तरुणाईच्या मनात नसते. फोटो अपलोड व्हायला फेसबुकसारखा जास्त वेळ लागत नसल्याने इंस्टाग्राम वापरण्यास सोपे वाटते. सोशल मीडियावर नेहमी नेटिझन्सला काहींना काही नवीन देत असते त्यामुळे अनेक युर्जस याला जोडले जातात.

Updated : 14 Feb 2018 1:22 PM GMT
Next Story
Share it
Top