Home > मॅक्स ब्लॉग्ज > खासदार तेजस्वी सुर्या यांना जर्मनीने नाकारली भाषणाची संधी...!

खासदार तेजस्वी सुर्या यांना जर्मनीने नाकारली भाषणाची संधी...!

खासदार तेजस्वी सुर्या यांना जर्मनीने नाकारली भाषणाची संधी...!
X

इयत्ता दहावीच्या इंग्रजी माध्यमाच्या इतिहासाच्या पुस्तकातल्या दुसऱ्या महायुद्धाच्या संबंधी असलेल्या धड्यात हे लिहिलेलं आहे.

  • हुकुमशाही राजवटी उदयाला येण्याची कारणे.
  • पराभूत आणि जेत्यांच्या अर्थव्यवस्था युद्धाच्या खर्चाने डबघाईला आलेल्या होत्या.
  • आर्थिक अराजकाने लोकांच्या मनात असमाधान आणि असंतोष होता.
  • पराभूत राष्ट्रांच्यावर लादलेल्या अवमानकारक अटीमुळे आणि आर्थिक निर्बंधानी असंतोष वाढलेला होता.
  • राजेशाही संपून आलेली लोकशाही सरकारे ह्या परिस्थितीत हतबल झालेली होती.
  • बेरोजगारी, महागाई प्रचंड वाढलेली होती.
  • अशावेळी आपणच फक्त तारणहार आहोत आणि आपल्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत असे हुकुमशहा सांगत.
  • त्यांनी सैन्याचे अतिरेकी उदात्तीकरण केले.
  • लष्करी सामर्थ्य वाढवणे हाच उपाय आहे हे ठसवले.
  • लष्करी बळावर सगळे प्रश्न सुटतील असे भासवले.
  • माध्यमांना हाताशी धरून नेत्याची प्रतिमा मसीहा असल्या सारखी बनवली गेली.
  • विरोधात असलेल्या लोकांना संपवण्यात आले किंवा त्यांना देशद्रोही ठरवण्यात आले.
  • एक विशिष्ट समाज किंवा वंश आपल्या ऱ्हासाला कारणीभूत आहे हे ठासून सांगण्यात आले.
  • त्या शत्रू समूहाला संपवून आपले गतवैभव मिळवता येईल असे सांगण्यात आले.
  • विरोधकांचे चारित्र्यहनन करण्यात आले.
  • लोकांना सगळे प्रश्न चुटकीसरशी सोडवणारा नेता आपला तारणहार वाटू लागला.
  • ज्यांना त्यातला फोलपणा समजला होता त्यांना दहशत ,धाक दाखवून गप्प करण्यात आले.
  • पुस्तकी धडा संपला.

काही काळासाठी सामान्य जर्मन जनता या अपप्रचाराला बळी पडली, त्याची किंमत दोन पिढ्याना मोजावी लागली,मात्र त्यानंतर इतिहासातून त्यांचा समाज धडा शिकला.

काय धडा शिकला ?

७ ऑक्टोबरला जर्मनीच्या हॅम्ब्युर्ग शहरात इंडो जर्मन समुदायाच्या वतीने एक कार्यक्रम आयोजित केलेला होता. ज्यामध्ये विविध वक्ते ज्यात काही भारतीय सुद्धा आहेत ते बोलणार होते.

त्यापैकी भाजप खासदार तेजस्वी सुर्या ( ज्याला प्रखर राष्ट्रवादी वगैरे म्हणून ४० पैशाचे सालगडी डोक्यावर घेतात ) याला "द्वेषपूर्ण आणि विद्वेषी भाषण करण्याच्या "कारणावरून भाषण करायला येऊ नका. म्हणून सांगितलेलं आहे.

भारतीय खासदाराला आमच्याकडे भाषण करायला येऊ नका हे सांगितलं जातं ही अतिशय लाजिरवाणी बाब आहेच.

मात्र द्वेषपूर्ण मानसिकता देशाला कुठे नेते या इतिहासातून शिकलेल्या धड्याने जर्मन शहाणे झालेत, आपण शहाणे कधी होणार ?

(आनंद शितोळे यांच्या फेसबुक भिंतीवरून)

Updated : 8 Oct 2020 6:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top