II होबासकी II

II होबासकी II
X

" कस काय sms आजी ? कुठीसा चालली त एवळ्या भरदमकिनं (घाईने) हातात मोबाईल घेऊन?"

" कोण व्हय रे भाद्र्याखाणीचा?(चोंबडा) मले ज्या नायी त्या नावानं हाक मारते ! त्यात मले आता दिसतइ नाई क्लियरकट! सबण(सगळं) झवय झवय(अंधुक) दिसते दोयान.! त त्या ढेबऱ्या बुड्याचा नातू त नोय? डोया(डोळा) फिरोते तो अंबादास? "

" नाई आजी मी अंबादास नोय. मी होय तुया लाळका नातू होबास राव! "

'' होबासराव? त त लेका सुद्या मतीचा (सज्जन) म्हनून फेमस आहेस नबे साऱ्या गावात ! अन तरी या बुडीच्या (म्हातारीच्या ) चेन्ढायन्या (फिरकी ) करतं?"

"चेन्ढायन्या? "

"येरी त मंग? तुया मले SMSआजी म्हटलं की नाई?"

" हव म्हटलं!!

"त मंग ती माही खिज (चीड )हायना होबासा ! "

" खिज ? ते कशी काय SMS आजी?"

" तेपाय तेचतं खिज हाये माही! "

" पण हे अशी कशी खिज पळली तुले? "

" हे आपल्या गावातले लोक लय अज्जात हायेतना होबासा !

त्यातही आपल्या गावातल्याय बाया म्हन्ज्ये नीरा(अगदी) बद्मासखाणीच्या हायेत!

माया हातातल्या मोबाईलले जयतात (जळतात) त्या खरकट्या .. ... "

"सेन्सॉर आजी सेन्सॉर ! "

"कायच आले फतराच शनसार ? हायेतच त्या खरुजल्या खाणीच्या !

data-href="https://www.facebook.com/MaxMaharashtra/"

data-width="380"

data-hide-cover="false"

data-show-facepile="false"

data-show-posts="false">

त्या बाया माह्यावर बालंट घेतात की कोणाचीबी सोयरिक जुळत अशीन त मी SMS करून ते बूचकोतो !(फिस्कटवतो) पोराची जुळत अशीन त पोरीवाल्यायले अन पोरीची जुळत अशीन त पोरावाल्याले खोटेनाटे SMS धाळून (पाठवून) मी सोयरीकीत बिब्बा घालत अस्तो !

त त खरंखरं संग होबासा मी तुले तशी बाई वाटतो काय ? "

तरी बद्मास खाणीच्या मायावरच (माझ्यावरच) झट (बालंट) घेतात !

अन त्याइचे बायले नवरे, बायका जसं सांगतात तसच आईकतात !

त्याच्यान मले गावात फिरन मुश्कील झालं !

दोनतीन डाव (दोनतीनदा) त माया हातातला मोबाइल हिसकला भंटोल पोट्ट्याइनं !

जश्या बाया तशे त्याईचे पोट्टे ! मायनं लावून देल्या शिवाय कोणी मोबाईल हिसकीन काय पण मीबी लय खट (पक्की) हावो !

बांगडया फुटल्या पण म्या मोबाईल हातचा जाऊ देला नाई !

मंग मी म्हणजे गम्मत हावो का ? "

"S SMSSआजी ! तु म्हंत बुवा तुया तोंडानं असं !

पण म्या त आईकलं की त्या तीर्मख भाऊच्या पोरीचं लगन जुळलं होतं घुईखेडच्या पोराशी !

तिथ(तिथी ) बी निंगाली होती ! अन कपळा फाडाची (लग्नाचा बस्ता) तारीखबी ठरली होती !

इतल्यात(एवढ्यात) तुया (तुझा) SMS गेला पोराच्या मोबाईल वर की ' आय लाव यु तुया पाहेल पोरीशी'! त मंग तो SMSS वाचून त्या पोरांनं सोयरीकच तोळली फटालकन् त्या पोरीशी!

त्या भावरावच्या पोराच लगन ठरलं काटसूरच्या पोरीशी !

त तुया SMS गेला पोरीच्या मोबाईल वर की पोरानं गावातच येकजन ठेवेल हाये अन तिच्या पासून त्याले एक लेकरूबी हाये !

तवा मंग हेबी सोयरिक गेली बाराच्या भावात ! "

" अन म्हणून तुले खिज पळल्ली...

....ऑ ?

कुठी उपयली (पसार झाली) लेक हे SMSआजी आताच्या आत्ता?

कुठी गायप झाली म्हनावं बातनीच्याबात (लगेच्यालगेच )"

  • पुरूषोत्तम बोरकर

Updated : 6 Sep 2022 9:33 AM GMT
Next Story
Share it
Top