चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणासाठी एवढं कराच !

680
Nisarga cyclone in Kokan region of Maharashtra

चक्रीवादळामुळे उध्वस्त झालेल्या कोकणवासीयांसाठी सरकारने मदतीची घोषणा केली आहे. पण इथं तातडीने ज्याची गरज आहे ते पोहोचवण्यासाठी पावलं उचलली पाहिजेत.

तातडीने एकूण 200 ते 300 खेड्यांना ठोस मदत हवी आहे. #सरकार , सामाजिक संस्था काय करू शकतात?

  1. कौलं किंवा पत्रे प्रत्येक गावी अल्प किमतीत किंवा भेट स्वरूपात पाठवू शकता.
    ताडपत्री आणि प्लास्टिक शिट्स पाठवल्या जाऊ शकतात
  2. सरकार ने माड आणि पोफळी ,आंबा आणि काजू ,च्या पिकांची फळ देण्याची वयोमान शक्यता गृहीत धरून, आर्थिक मदत आणि सोबत नवीन उत्तम रोपे, कलमं लोकांना मोफत उपलब करून द्यावीत. कोकणात अनेक नर्सरी आहेत, त्यांच्या सोबतीने गाव दत्तक आणि लागवडीसाठी निधी घेऊन वाटप करावे
  3. खावटीसाठी वृद्ध आणि गरजू कुटुंबांना किमान 3 महिन्यांसाठीचा शिधा ,जिन्नस आणि नवीन पांघरूणांची व्यवस्था करून द्यावी. आणि या सोबत किमान 10 हजार रुपये आर्थिक मदत द्यावी.
  4. मुळात या बाबी खरंतर सरकारला देणं सोप्या आहेत, पण आता पंचनामे टाइमपास करतील, त्यात राजकारण होईल, कोण कुणाचा असं पाहिलं जाईल आणि या वर प्रशासकीय उदासीनता मोठी असेल. काही करायचं असल्यास पुढील 10 दिवसात एक एक गाव शोधून आपापला वाटा उचलूयात. वेळास, बाणकोट, मंडणगड , माणगाव पट्ट्यात 300 गावांत मोठी हानी आहे ,तर पहिल्यांदा तिथे लक्ष द्यायला हवं आहे.
  5. पुढील 10 दिवस मदत पुनर्वसन मंत्री ,कोकणात मुक्कामी हलवावेत आणि विशेष GR काढून त्यांना मंत्रालयाशी हॉटलाईन जोडून, सेक्रेटरी पातळीवरच्या अधिकाऱ्याची , विभागीय उपायुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या शिर्षस्थ अधिकार द्यावेत.

जुने मापदंड मोडून नवे प्रघात पथदर्शी पाडावेत, बागायती साठी पुढील काळात कोकणात याचा उपयोग होईल असे काम करायची संधी म्हणून सरकारने याकडे पहावे