Home > मॅक्स ब्लॉग्ज > राजकारणासाठी किती घसरावं?

राजकारणासाठी किती घसरावं?

Everything is politics, but politics isn't everything journalist Tulsidas Bhoite ask questions to politicians सध्या देशात सुशांत सिंह राजपुत मृत्यू प्रकरणाबरोबरच कंगना चांगलीच चर्चेत आहे? त्यातच कंगनाला समर्थन आणि विरोध करताना राजकारण्यांनी स्वत:ची किती पातळी सोडली...? यावर आपण कधी बोलणार आहोत का? वाचा ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोइटे यांनी एका नेत्याचा घेतलेला समाचार

राजकारणासाठी किती घसरावं?
X

राजकारणी राजकारण करणारच. आपल्याकडे तर तो पूर्णवेळ व्यवसायच. त्यात गैर नाही. पण किमान काही संकेत पाळावेत.

कंगनाच्या वादग्रस्त विधानांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून समर्थन करायचं, तिनं काहीही म्हटलं तर चालवून घ्यायचं आणि मराठी कलाकारांनी तिचा अपमान न करता भूमिका मांडली तर त्यांच्याविरोधात गलिच्छ शेरेबाजी करायची, हे कसं योग्य?

एकानं कंगणाचे मानधन आणि मराठी कलाकारांचे मानधन यांची तुलना करत स्वत:ची लायकी दाखवली. त्यानंतर भाजपच्या अवधुत वाघांनी लगेच पुढचा तळ गाठला. काय तर म्हणे, "Scooty घेतली तर सेल्फी काढतात व डोंबिवली चर्चगेटचा फस्ट क्लासचा पास स्टेटस ठेवतात" हे सरळसरळ हिनवणं झालं.

अशा वेळी बजावून सांगावंच, होय, आम्हाला अभिमान मराठी कलाकारांचा! तुलनेनं खूप कमी मानधन, तरीही अभिनय, चित्रपट कल्पना, दर्जा हा शंभरपट जास्त मानधन घेणाऱ्या अनेक हिंदी कलाकार, कलाकृतींपेक्षाही चांगला असतो!

वाघसाहेब, खरं स्टेटस हे मर्सिडिज, बिझनेस क्लास एअर तिकिटाने नाही गुणवत्तेनं ठरतं! मेहनतीच्या पैशांवर जगणाऱ्या स्कुटी-पासवाल्यांना तुमच्यासारख्या शून्यातून उद्योगांचं विश्व उभारणाऱ्या मुंबईकरानं हिणवावं! राजकारणासाठी किती घसरावं?

https://t.co/0GbPSiA3PZ

Updated : 14 Sep 2020 6:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top