Home > मॅक्स ब्लॉग्ज > भारतीय अर्थव्यवस्था ढासळत आहे का? काय आहे सत्य?

भारतीय अर्थव्यवस्था ढासळत आहे का? काय आहे सत्य?

भारतीय अर्थव्यवस्था ढासळत आहे का? काय आहे सत्य?
X

सध्या भारतीय अर्थव्यवस्था (Economy of India) ढासळत आहे. या संदर्भात वारंवार वृत्तपत्रात तुम्ही बातम्या वाचत असाल. मात्र, अर्थव्यवस्था ढासळत आहे. म्हणजे नक्की काय होत आहे? या संदर्भात भारत सरकारचे माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम (Arvind Subramanian) यांची प्रणव रॉय (Prannoy Roy) यांनी एनडीटीव्ही वर मुलाखत घेतली. या मुलाखतीतील काही महत्वाचे मुद्दे आंतराराष्ट्रीय कीर्तीच्या, मेनस्ट्रीम मधील, भारत सरकारचे प्रमुख आर्थिक सल्लागार राहिलेल्या व्यक्तींनी सरकारच्या आर्थिक बाबींवर टीका केल्यास तिला अधिक वजन येतं.

काय म्हटलंय प्रणव रॉय यांनी

जीडीपी वाढ ४.५ % सांगितली जाते आहे, पण ती त्यापेक्षा बरीच कमी आहे; गेल्या ३० वर्षातील निच्चांकी व्याजदर, महागाई, परकीय चलनाची गंगाजळी, कर्जाची परतफेड करण्याची कुवत या खूप चांगल्या स्थितीत आहेत; ही जमेची बाजू. पण अर्थव्यस्वस्थेचे जवळपास प्रत्येक उत्पादन क्षेत्र वाईट अवस्थेत आहे: आयात (- ६%), निर्यात (-१%), औद्योगिक उत्पादन (-१० %), ग्राहकोपयोगी वस्तू (+१ %), अर्थव्यवस्था वाढत आहे की नाही याचा एक विश्वासार्ह निदर्शक म्हणजे विजेचा खप. गेली अनेक दशके भारतात वीज क्षेत्राने सातत्याने वाढ दाखवली आहे; मागच्या तिमाहीत फक्त १.८ % वाढ दाखवली; हा ३० वर्षातील नीचांक आहे. व्यापारी बँकांची कर्जे देण्याचे प्रमाण मागच्या वर्षी २२ लाख कोटी तर आता १ लाख कोटी रुपयांवर आलं आहे.

हे ही वाचा...

खेळता-खेळता शिका व शिकता-शिकता खेळा जळगावच्या अनुभूती स्कुलचा अभिनव उपक्रम…

मिसळी सोबत ब्रेड हवा की पाव ?

पोलिस नको, बंदुक परवाने द्या- लक्ष्मण पवार

प्रत्यक्ष कर संकलनात ( व्यक्तिगत तसेच कंपनी) शून्य टक्के वाढ आहे; जीएसटी करसंकलन वाढत नाहीये. कारण अर्थव्यवस्था वाढत नाहीये. म्हणून पायाभूत सुविधा कंपन्यांना कर्जे देण्यामुळे बँका गेल्या गाळात आहेत. रिअल इस्टेट कंपन्यांना अमाप कर्जे दिल्यामुळे एनबीएफसी कंपन्या गाळात आहेत. सर्व देशात दरवर्षी ८ लाख कोटींची घरे बांधून तशीच पडून राहत आहेत. (अनसॉल्ड इन्व्हेंटरी)

केंद्रीय अर्थसंकल्पातील तूट ३.५ टक्के सांगितली जात आहे. पण FCI, NHAI यांनी घेतलेली, केंद्रसरकराने गॅरंटी दिलेली कर्जे जमेस धरली तर तूट ५.५% होईल. राज्य सरकारांची तूट जमेस धरली तर तूट ८ ते ९ % जाईल.

Updated : 28 Dec 2019 3:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top