Home > मॅक्स ब्लॉग्ज > नेहरूंसारखा मुत्सद्दी नेता होणे नाही!: जितेंद्र आव्हाड

नेहरूंसारखा मुत्सद्दी नेता होणे नाही!: जितेंद्र आव्हाड

नेहरूंसारखा मुत्सद्दी नेता होणे नाही!: जितेंद्र आव्हाड
X

दुसरं महायुद्ध संपल्यानंतर दोन वर्षांनी आपल्या देशाला स्वतंत्र मिळालं तेव्हा जग हे अमेरिका आणि रशिया या दोन गटात विभागाला गेलं होत. जगाला विभागणाऱ्या दोन मुख्य प्रवाहांपासून अलिप्त राहण्याच्या जवाहरलालांच्या धोरणामुळे नव्याने स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांच नेतृत्व भारताला मिळालं.हि राष्ट्र अलिप्तता चळवळीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना बळ देणारी शक्ती म्हणून पाहत होती .नेहरू व त्यांच्या सहकारी मुत्सद्द्यांकडे त्यांच्या भूमिका विकसित करण्याचं व त्या निःसंदिग्धपणे मांडण्याचं निःसंशय कौशल्य होत.त्यामुळे १९५० च्या संपूर्ण दशकात जागतिक स्तरावर भारताने आपली लष्करी व आर्थिक ताकद लक्षात घेता प्रमाणाबाहेर महत्व प्राप्त केलं होत.पंडित नेहरूंनी जागतिक मुत्सद्देगिरीवर घट्ट मांड ठोकली होती.चर्चिलसारख्या मतलबी नेत्यानेहि त्यांना आशियाचा प्रकाश (लाईट ऑफ आशिया )म्हणून गौरवलं . युगोस्लाव्हियाचे नेते जोसिप ब्रॉझ टिटो यांनी १६ डिसेंबर १९५४ पासून भारताचा आठ दिवसांचा दौरा केला.त्यांच्या या भेटीतून भारताच्या परराष्ट्र धोरणाला निर्णायक सैद्धांतिक वळण मिळालं.अलिप्ततावाद या नावाने हा सिद्धांत प्रसिद्ध झाला.टिटो हे कम्युनिस्ट नेते होते..त्यांनी सोविएत संघराज्याला उघड विरोध केला होता आणि त्या वेळी जगाला विभागणाऱ्या त्या काळातील दोन्ही ताकदींपासून त्यांच्या देशांचं स्वातंत्र्य अबाधित राखलं होत.जवाहरलालांनी हातच न राखता टिटोना साथ दिली..नेहरू आणि टिटो यांनी जारी केलेल्या संयुक्त घोषणापत्रात पाच मूलभूत तत्त्वांचा उच्चार होता,जी पंचशील या नावाने ओळखली होती.जागतिक संबंधात या पाच तत्त्वांच अनुसरण व्हावं हि जवाहरलालांची इच्छा होती.सार्वभौमत्वाचा आदर,अनाक्रमण,अंतर्गत व्यवहारांमध्ये हस्तक्षेप न करण,समानता व शांततापूर्ण सहअस्तित्व ही ती पाच तत्त्व होती.

पंडित नेहरू १९५५ मधील बांडुंग आफ्रो -आशियाई परिषदेची प्रेरक शक्ती होते.पाश्चिमात्त्यांचा विरोध असतानाही नेहरूंच्या आग्रहावरून चीनला या परिषदेसाठी निमंत्रित केलं होत.बैठकीआधी नेहरूंनी संसदेत या परिषदेचं महत्व विशद करणार सत्तर मिनिटांचं भाषण केलं.त्यांच्याकरिता हा नव्या युगारंभाचा क्षण होता.दीर्घकाळ साम्राज्यवादी शक्तींच्या दडपणाखाली असलेलं जग अंतिमतः स्वबळावर उभं राहणार होत..चिनी मुत्सद्यांना बांडुंग येथे नेण्यासाठी त्यांनी एअर इंडियाच्या "काश्मीर प्रिन्सेस'या विमानाची व्यवस्था केली.आकाशातच या विमानाचा स्फोट झाला.तैवानी विध्वंसकानी या विमानात टाईमबॉम्ब बसवल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.चोऊ-एन-लाय हे त्यांचं लक्ष्य होते..पण ते विमानात नव्हते.हि परिषद प्रामुख्याने चोऊ-एन-लाय यांच्या उपस्थितीने लक्षात राहिली. बांडुंगनंतर जुलै १९५६ मध्ये ब्रिओनी इथे परिषद झाली.या परिषदेत अलिप्ततावादि त्रिमूर्ती नेहरू -नासर-टिटो जगासमोर आली.अलिप्त राष्ट्र चळवळीची बीज या परिषदेत पेरली गेली.

त्यानंतर सुएझ कालव्याचा वाद पुढे आला.इजिप्तच्या नासारणी सुएझ कालव्याचे राष्ट्रीयकरण केल्यानंतर इस्त्रायली व अँग्लो फ्रेंच फौजांनी इजिप्तच्या प्रदेशावर आक्रमण केलं.या पेचप्रसंगामध्ये जवाहरलालांमधील वसाहतवादाच्या विरुद्ध लढणारा योद्धा समोर आला. त्यांनी नासरला तार पाठवून हा प्रसंग इतिहासाची पुनरावृत्ती आह असे म्हटले.जी गोष्ट आपल्यापैकी कोणीही सहन करू शकत नाहीअसं जाहीर केलं.आक्रमकांनी माघार घ्यावी म्हणून नेहरूंनी प्रयत्न केले.संयुक्त राष्ट्रसंघाने स्थापित केलेल्या शांतीरक्षक दलामध्ये भारतीय जवानांना सहभागी करण्याचा निर्णय घेतला.इंग्रज फ्रेंच साम्राज्यवादी युतीला ठाम विरोधाच्या त्यांच्या पवित्र्यामुळे त्यांना मुस्लिम जगतात हि लोकप्रियता मिळाली.मूळचे पत्रकार असलेल्या अमेरिकी मुत्सद्दी फिलिप्स टाल्बोट यांनी इजिप्तच्या अनेक घरात नेहरूंच्या तसबिरी पहिल्याच नोंदवलं आहे.आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत त्यांनी पाश्चात्त्य जुलूमशाहीला उघड विरोध केल्याची अनेक उदाहरणे आहेत.लेखक बोरिस पास्तरनाक पहिल्या सोविएत रशियातील स्थानबद्धतेचा त्यांनी निषेध केला होता.युगोस्लाव्ही विरोधक मिलोवन जिलास यांची एकान्तवासातून मुक्तता करण्यात ते यशस्वी झाले..महत्वाचा शेजारी देश असलेल्या नेपाळच्या राजाबरोबरचे संबंध पणाला लावून त्यांनी नेपाळमध्ये डांबलेल्या लोकशाहीवाद्यांच्या बाजूने आवाज उठवला होता.ते जगात सर्वत्र स्वातंत्र्याच्या बाजूने उभे राहिले.

एकंदरीत १९५०च्या दशकात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला मिळालेल्या स्थानाने नेहरूंना सिद्ध केलं. १९५८ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या अध्यक्ष व लेबनान चे मुत्सद्दी नेते चार्ल्स मलिक यांनी नेहरूंच्या पाच पैलूंचा भाषणात गौरव केला होता . एक,मुक्त आणि लोकशाही संस्थांच्या द्वारे प्रातिनिधिक शासन व्यवस्थेचा स्वीकार आणि मशागत.दुसरा देशाच्या प्रचंड सामाजिक व आर्थिक समस्यांचा गंभीर अन जवाबदारपणे मुकाबला.तिसरा महान नेतृत्वाचे दर्शन घडवून नदेशाच्या ऐक्याचा रक्षण व मजबुतीकरण.चौथा मुद्दा भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेषतः संयुक्त राष्ट्रसंघात बजावलेली प्रमुख भूमिका आणि राजकीय प्रश्नांवर सैद्धांतिक प्रश्नांची स्थापना. आणि मानवतावादी सार्वभौमतेच्या भारताच्या हिताचा स्पष्ट उच्चार.मलिक यांच्या मते या साऱ्यामुळे नेहरूंच्या भारताला उंची आणि प्रतिष्ठा प्राप्त झाली.

पंतप्रधान पदाच्या पहिल्या दशकात १९५५ मध्ये राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते जवाहरलाल नेहरूंना देशाचा सरवोचच नागरी सन्मान "भारतरत्न"बहाल करण्यात आला. आशियाचा प्रकाश आता भारतरत्न बनला होता..त्या वेळेला देश आणि नेहरू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंचावर भक्कम उभे होते.

या सगळ्याची आठवण करून द्यायला कारण ५ तारखेला होणाऱ्या बांडुंग परिषदेची पार्शवभूमी.आज परराष्ट्र नीतीवर बोलताना परराष्ट्र मंत्र्यांनी नेहरूंचा उल्लेख टाळणं,राष्ट्रपती कोविंद यांनी या आधी तोच किस्सा गिरवण.हे सगळं कितीही केलंत तरीही तुम्ही पंडित जवाहरलाल नेहरूंचा आंतरराष्ट्रीय राजकारणातला योगदान आणि परराष्ट्र धोरणाला झुगारून पुढे जाऊ शकत नाही.तुम्ही नाव घ्या अथवा घेऊ नका,पण इतिहास या गोष्टी कधीच विसरत नाही ,त्यांने पंडितजींच्या या योगदानाची आधीच नोंद घेतलेली आहे.

पंडित नेहरूंनी अवलंबलेली परराष्ट्र नीती हीच ह्या देशाला अनेक युग मार्गदर्शक ठरणार आहेत कोणी हे सत्य नाकारु शकत नाही

ह्या महान मुत्सद्दी नेत्याला मानाचा मुजरा !

Updated : 14 Nov 2021 1:01 PM GMT
Next Story
Share it
Top