Home > मॅक्स ब्लॉग्ज > दिल्लीची दादागिरी

दिल्लीची दादागिरी

दिल्लीची दादागिरी
X

"दक्षिणेची पातशाही आम्हा दक्षिणियांच्या हाती राहे ते करावे. आपली पातशाही जितकी वाढवू तितकी वाढवणे. पठाणाची नेस्तनाबूत करणे. पठाण बळावला म्हणजे एक उपरी एक दक्षिणियांची घरे बुडविल. कोण्हास तगो देणार नाही. आपल्या जातीच्या मराठिया लोकांचे बरे करावे हे आपणांस उचित होय."- छत्रपती शिवाजी महाराज,(Chhatrapati Shivaji Maharaj )मार्च १६७७,शिवचरित्र, दि.वि.काळे, पुणे,१९७१, पृ.२७१

हे ही वाचा :

‘राष्ट्रवादी कॉंग्रेसचा ब्लेम गेम सुरु’

न्याय द्या नाहीतर सहकुटुंब आत्महत्या करू! भार्गवीच्या आईवडिलांचा टाहो

शिवसेनेचा नवा अवतार

भारताचा राजकीय इतिहास हा अनेक शतके उत्तर भारताची जुलमी सत्ता विरूद्ध दक्षिण भारतातले राज्यकर्ते असा राहिलेला आहे. त्याबाबत ह्या पत्रात शिवाजी महाराजांनी लिहिलेले आहे.दक्षिणेची पातशाही म्हणजे कुतुबशहा [ गोवळकोंडा ], अदिलशहा [ विजापूर ] आणि छ. शिवराय या तिघांनी एकत्र येऊन उत्तरेच्या पठाणाविरूद्ध [ औरंगजेब ] मोगलाविरूद्ध लढण्याचा निर्धार केलेला होता, त्याचा हा संदर्भ आहे.दिल्लीची नशा म्हणजे तिचे मांडलिकत्व.दक्षिणेवर सत्ता दक्षिणीयांचीच हवी.दिल्लीच्या मुजोरांची नाही.

Updated : 12 Nov 2019 5:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top