Home > मॅक्स ब्लॉग्ज > करोनाची अँटीबॉडी टेस्ट

करोनाची अँटीबॉडी टेस्ट

करोनाची अँटीबॉडी टेस्ट
X

शरीरात शिरलेल्या व्हायरसविरुद्ध शरीर लगेच अशा प्रथिनांची निर्मिती सुरु करते, की ज्यांच्या योगे व्हायरसला अडवता, पकडता आणि नष्ट करता येईल. यांना इम्युनोग्लोब्युलिन असे नाव आहे. "Ig" असे त्याचे संक्षिप्त रूप करतात. करोनाच्या संदर्भात यातल्या दोन प्रकारच्या इम्युनोग्लोब्युलिनची टेस्ट केली जाते: "पंचमुखी" (म्हणजे व्हायरसबरोबर संयुक्त होऊ शकणाऱ्या पाच जागा, "मुखे" असणारी) “IgM” आणि " ट्विमुखी" (दोन जागा, "मुखे" असणारी) “IgG”. IgM याची निर्मिती लगेच सुरु होते, आठ दहा दिवसात "शिगेला" पोचते आणि त्यानंतर काही दिवसात ओसरू लागून दीड ते दोन महिन्यात जवळजवळ शून्यावर येते. याउलट IgG याची निर्मिती एक-दोन दिवस उशीराने सुरु होते, पण किमान दोन वर्षे टिकते. व्हॅक्सिन ("लस") देतानाही शरीराला IgG ही अँटीबॉडी बनविण्यास उद्युक्त केले जाते. मधून मधून “बूस्टर” डोस देऊन तिची निर्मिती कायम चालू ठेवली जाते.

अँटीबॉडी टेस्टिंगवरून आपण खालील निष्कर्ष काढू शकतो:

१. IgM सापडणे: इन्फेक्शन गेल्या एक महिन्यात झाले आहे. ज्यांनी आपले रहाण्याचे शहर किंवा देश बदलला आहे त्यांच्यासाठी उपयुक्त.

२. IgM आणि IgG , दोन्ही सापडणे: तुमच्या शरीरातर्फे इम्यून रिस्पॉन्स सुरु झाला आहे आणि वाढत आहे.

३. केवळ IgG सापडणे : तुम्हाला झालेले इन्फेक्शन सुमारे एक महिन्यापूर्वीचे किंवा त्याही आधीचे आहे. तुमच्या रक्तात जिवंत व्हायरस असण्याची शक्यता फारच कमी आहे, आणि त्यामुळे तुम्ही दुसऱ्यांना इन्फेक्ट करण्याचीही. अशा लोकांना कामावर जाऊ द्यावे असा विचार अमेरिकेत जोर धरत आहे.

४. IgM व IgG , दोन्ही न सापडणे.: तुमच्या शरीरात व्हायरस शिरलेला नाही. हे अर्थात तुमचे संपूर्ण चित्र बघून नक्की करावे लागेल: ताप, खोकला, धाप लागणे, छातीचा एक्स रे , RT-PCR तसेच ही प्रत्यक्ष व्हायरस मोजणारी टेस्ट करोनाव्हायरसविरुद्धच्या मानवी IgM आणि IgG या दोन अँटीबॉडीज साठी टेस्ट प्रोसिजर:

टेस्ट कार्डवर पुढील गोष्टींचे गोंदण केलेले असते:

१. करोना व्हायरसचा "अँटीजेन" (a protein on the virus)

२. IgM आणि IgG यांची एक एक 'डिटेक्शन" ("शोधक") लाईन . या अनुक्रमे IgM आणि IgG विरुद्धच्या अँटीबॉडीज असतात. (हे जरा गोंधळवणारे आहे. IgM आणि IgG विरुद्धच्या या अँटीबॉडीज हे केवळ "शोधक" रासायनिक "रिएजंट" आहेत, त्यांचा रोगाशी काही संबंध नाही हे लक्षात घेणे. )

३. एक क्वालिटी कंट्रोल लाईन.

टेस्ट कशी केली जाते ? :

A) किटमध्ये दिलेल्या सुईने बोटातून रक्ताचा बारीकसा थेम्ब काढला जातो.

B) तो थेम्ब सॅम्पलच्या जागी टाकल्यावर रक्त कॅपिलरी ऍक्शनने ("केशाकर्षण") कार्डवर पुढे सरकत राहते.

C ) रक्तात IgM किंवा IgG असल्यास करोनाचा अँटीजेन प्रथम त्यांना पकडतो. हा अँटीजेन-अँटीबॉडी कॉम्प्लेक्स मग पुढे सरकतो.

D) या कॉम्प्लेक्स मध्ये जर IgM किंवा IgG असेल तर ते त्यांच्याविरुद्धच्या रिएजंट अँटीबॉडीजने पकडले जातात आणि याची निर्देशक अशी लाल लाईन उमटते.

E) एक क्वालिटी कंट्रोल लाईन उमटते- जी रक्तात कोणतीही अँटीबॉडी असो किंवा नसो, टेस्ट योग्य प्रकारे झाली आहे याची निर्देशक असते. ते न उमटल्यास टेस्ट नव्याने करावी लागते.

टेस्ट केवळ दहा ते पंधरा मिनिटात पूर्ण होते. टेस्टला सुमारे रु. ३५० पाडावेत. पण भारत सरकार ही टेस्ट मोठ्या प्रमाणावर (५० कोटी लोक) मोफत करायला घेणार असल्याची बातमी आहे.

Updated : 8 April 2020 8:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top