Home > मॅक्स ब्लॉग्ज > BHIM App चा वापर कसा कराल ?

BHIM App चा वापर कसा कराल ?

BHIM App चा वापर कसा कराल ?
X

पूर्वी अनेक बँकाची डिजिटल व्यवहारांसाठी स्वतःची वेगवेगळे अ‍ॅप होते. पण मोदी सरकारने पुढाकार घेत सर्वांसाठी (All in one) एकच भीम नावाने app सुरू करून सर्वांची उत्तम सोय केली आहे. कॅशलेस भारत करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. यापूर्वी लोकप्रिय असलेल्या PayTM आणि नवख्या Chillar प्रमाणे मोबईल नंबर, QR कोड वापरून देवाणघेवाण करणे या बाबी या अ‍ॅपमध्ये समाविष्ट आहेतच. पण मुख्य म्हणजे आधार नंबर वापरूनही पैसे पाठवू शकतो ही या अ‍ॅपची जमेची बाब आहे. आपण या लेखात याच भीम अ‍ॅप बद्दल जाणून घेणार आहोत.

BHIM म्हणजे “Bharat Interface For Money” हे अॅप्लिकेशन National Payment Corporation of India (NPCI) या कंपनीने अतिशय secured बनवलेले आहे.

भीम app कसे वापराल? Step by step :

  • तुम्ही Google प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर भीम app प्रथम download करूनघ्या. अ‍ॅप इन्स्टॉल झालं की ते उघडा आणि आपली भाषा निवडा. भीम app साठी मराठीसह इतर काही भारतीय भाषा यात समाविष्ट आहेत. तुम्हाला हवी ती भाषा निवडा.
  • Lets get Started वर क्लिक करा.
  • फोन नं व्हेरीफाय करण्यासाठी तुमच्या मोबाईलवरून एसएमएस पाठवायची किंवा फोनकॉल करायची परवानगी मागण्यात येईल. Allow करा
  • आपोआपएसएमएस पाठवला जाईल किंवा call येईल. आणि "मोबाईल व्हेरिफिकेशन सक्सेसफुल" असं येईल. आता ४ अंकी पिन म्हणजे अ‍ॅपचा pass code टाका.
  • या पासवर्डची पुष्टीकरण्यासाठी पुन्हा confirm pass code येईल तो पुन्हा टाका. तो व्यवस्थित टाकल्यानंतर आतामोबाईल व्हेरिफाईड दिसेल.
  • ज्या बँकेत तुमचे खाते आहे ती बँक निवडा पण enter केलेला मोबाईल नंबर ज्या बँकेशी attach आहे तीच बँक निवडणे गरजेचे आहे.
  • आता तुमचा खाता नंबर दिसेल. त्यावर क्लिक करून तो निवडा.
  • आता तुम्हाला डेबिटकार्डचे तपशील वापरून एमपिन बनवता येईल. पण अगोदर UPI वापरून "एमपिन" सेट केला असेल तर तुम्हाला काहीही करायची गरज नाही. "एमपिन" सेट झाला असे समजा.
  • आता तुमचे अकाऊंट वापरासाठी तयार आहे.
  • अ‍ॅप इन्स्टॉल करताना जर एमपिन सेट नसेल तर तुम्हाला डेबिटकार्डची माहिती विचारली जाईल. ती भरा. एमपिन सेट करा.
  • आता अ‍ॅप उघडल्यानंतर त्यात बँक अकाऊंटवर क्लिक करा त्याखाली तिथे तुम्हाला वेगवेगळे पर्याय दिसतील. त्यात Transfer Money च्या सेक्शनमध्ये खालील बाबी दिसतील.

Send : याच्या २ पद्धती -

पद्धत १: आपण साधारण २ प्रकारे BHIM अॅप वापरून पैसे पाठवू शकता. फोन नंबर वापरुन, आधार नंबरचा वापर करून किंवा पेमेंट अॅड्रेस टाकून! यासाठी recipient (प्राप्तकर्ता) UPI सहनोंदणीकृत आहे याची खात्री करा.

(टिप : ज्यांच्याकडे भीम आहे. त्यांनाच यापद्धतीने व्यवहार करता येईल)

पद्धत : (recipient) प्राप्तकर्त्याचे नाव, खातेक्रमांक आणि बँक आयएफएससी कोड वापरून!

Request : दुसर्‍याच्या खात्यातून पैसे मागवा, वापरकर्ता दोन प्रक्रिया वापरणाऱ्या कोणाही मधून पैसे मागू शकतो. एक म्हणजे मोबाईल नंबर किंवा पेमेंट address टाकून!

Scan & Pay: BHIM अॅपच्या साहय्याने तुम्ही QR code स्कॅन करून दुसर्‍यांना पेमेंट करू शकता. त्यासाठी एक कोड दिसेल. तो तुम्हाला स्कॅन म्हणजे फोटोप्रमाणे capture करायचा आहे. त्यावेळी capture करताना कॅमेरा आपोआप सुरू होईल..

My Information मध्ये “Transaction, “Profile”, “Bank Accounts” इत्यादी ऑप्शन दिसतील.

  • Bank Accounts मध्ये गेल्यानंतर "SET UPI PIN" असे बटण दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतरडेबिटकार्डचे शेवटचे सहा अंक आणि वैधता महिना-वर्ष टाका आणि ok क्लिक करा.
  • तुम्हाला सहा अंकी OTP SMS स्वरुपात येईल. तो टाका. तुम्हाला जो एमपिन ठेवायचा आहे तो set upi pin मध्ये टाका आणि बरोबरच्या चिन्हावर क्लिक करा .पुन्हा confirm pin होईल आणि तुम्ही main page वर याल.

थोडक्यात काय:

  • भीम अ‍ॅप प्ले स्टोरमधून डाऊनलोड करा.
  • ते Open करा आपल्या आवडीची भाषा निवडा.
  • बँकेत दिलेला मोबाइल नंबर व्हेरीफाय करा.
  • चार अंकांचा passcode बनवा
  • आपली बॅँक निवडाअकाऊंट आणि युपीआय पिन बनवा
  • आता पैसे सहज पाठवू शकतायासाठी send च उपयोग करा.

भीम अॅपमध्ये आधार पेमेंट कसे करावे

  • BHIM अॅप लाँच करा
  • BHIM अॅपच्या मुख्य इंटरफेसमध्ये प्रवेश करण्यासाठी पासकोड टाका.
  • Send बटणावर टॅप करा.
  • Send Money पर्याय येईल mobile/Aadhar/Payment Address पर्याय येतील.
  • ज्यांना पैसे पाठवायचे आहेत त्यांचा आधार नं टाका.
  • Verifyवर टॅप करा. आधार क्रमांक हा कोणत्याही बँक खात्याशी जोडलेला आहे किंवा नाही हे भिमद्वारे verified होईल.
  • Verificationनंतर, BHIM आपल्याला पुढील स्क्रीनवर नेईल. येथे आपल्याला Amount आणि Remarkटाकणे आवश्यक आहे.त्यानंतर Pay वर क्लिक करा.
  • आपला ४ अंकी UPI Pinटाकून ok करा.
  • Money sent म्हणून msg येईल थोडक्यात प्रक्रिया पूर्ण!

कॅशलेस पेमेंटसाठी BHIM Appमध्ये कोणत्या बँका समाविष्ट आहेत?

अलाहाबाद बँक, आंध्रबँक, ऍक्सिसबँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, कॅथोलिक सिरियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, डीसीबी बँक, देना बँक, फेडरल बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, आयडीबीआय बँक , आयडीएफसी बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, इंडसइंड बँक, कर्नाटक बँक, करूरवैश्य बँक, कोटक महिंद्रा बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, पंजाब नॅशनल बँक, आरबीएल बँक, साऊथ इंडियन बँक, स्टँडर्ड चार्टर्ड बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, युनायटेड बॅंक ऑफ इंडिया, विजया बँक.

BHIM APP च्या व्यवहारमर्यादा काय आहेत?

एकावेळी जास्तीत जास्त रू. 10,000 प्रतिव्यवहार आणि आत 24 तासात 20,000 हजारांपर्यंत तुम्ही व्यवहार करू शकता. भविष्यात या मर्यादा वाढू शकतात.

स्मार्टफोन नसणार्‍यांनी भीम सारखी सेवा कशी मिळवावी?

अगदी BHIM अॅप प्रमाणे, आपण * 99 # बँकिंगचा वापर करून पैशाची विनंती करू शकता.

त्यासाठी registered मोबाइल नंबरवरून खालील नंबर dail करून offline सेवेचा कोणत्याही साध्या मोबाइलचा वापर करून लाभ घेऊ शकता. विविध भाषेतील सेवेचा लाभ घ्या.

  • इंग्रजी * 99 #
  • हिंदी * 99 * 22 #
  • तामिळ * 99 * 23 #
  • तेलगू * 99 * 24 #
  • मल्याळम * 99 * 25 #
  • कन्नड * 99 * 26 #
  • गुजराती * 99 * 27 #
  • मराठी * 99 * 28 #
  • बंगाली * 99 * 29 #
  • पंजाबी * 99 * 30 #
  • आसामी * 99 * 31 #
  • उड़िया * 99 * 32 #

भारत सरकार भीमचा वापर वाढवा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार करताना दिसत आहे आपणही नक्कीच या cashless प्रणालीचा वापर करणे काळाची गरज आहे. यासाठी आपण शक्य तेवढ्या लोकांना या appची माहिती देणे गरजेचे आहे. आणि त्यांना त्यात साक्षर करणे आवश्यक आहे. आणि हो misuse आणि फसवणूक टाळण्यासाठी password ची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. मी काही मोठा तज्ञ नाही तरीही BHIM वापरताना काही अडचण आल्यास थेट संपर्क करा. धन्यवाद!

Gopal Madane (IT Engineer )

Contact:७०२०५५४४८२

Twitter: @madanegopal

Updated : 12 May 2017 6:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top