Home > News Update > "भगतसिंग निर्दोष होते का?..."

"भगतसिंग निर्दोष होते का?..."

भगतसिंग निर्दोष होते का?...
X

फाशीची तारीख 24 मार्च ठरली असतानाही 11 तास आधी म्हणजेच 23 मार्च 1931 च्या रात्री शहिद आझम भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली. कारण फाशीची तारीख देशवासियांना कळताच देशामध्ये प्रचंड विरोध सुरु झाला. लोक रस्त्यावर उतरले, मोर्चे - आंदोलने सुरु झाली. शासकीय पातळीवर प्रचंड उलथापालथ सुरु झाली. फाशी रद्द व्हावी म्हणून इंग्रजी हुकूमतवर प्रचंड दडपण यायला सुरुवात झाली. कोणत्याही क्षणी फाशी रद्द होऊ शकते याची सरकारला जाणीव झाली होती. म्हणूनच भगतसिंग, राजगुरु व सुखदेवच्या माता- पित्यांना शेवटची भेटही न देता त्यांना फाशी देण्यात आली. आज त्यांची 89 वी पुण्यतिथी आहे.

शहिद भगतसिंग आणि पूर्व इतिहास :-

भगतसिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी पंजाबमधील लायलपुर प्रांतात शिख कुटुंबात झाला. (जे सध्या पाकिस्तानात आहे). लाहोरमधील नॅशनल कॉलेजमध्ये शिकत असताना 13 एप्रिल 1919 रोजी झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा आणि लाला लाजपतराय यांच्या मृत्यूचा मोठा परिणाम त्यांच्यावर झाला आणि त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेत "नौजवान भारत सभेची" स्थापना केली.

काकोरी कटामध्ये सहभागी असणाऱ्या राम प्रसाद बिस्मिल यांच्यासहीत चार क्रांतिकारकांना फाशी आणि 16 जणांना जन्मठेप ठोठावल्याने दुखावलेले भगतसिंग चंद्रशेखर आझाद यांच्याबरोबर "हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन" मध्ये सामिल झाले. ज्याचे पुढे "हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन" असे नामांतरण झाले.

भगतसिंगांनी राजगुरु, सुखदेव आणि चंद्रशेखर आझाद यांच्या मदतीने 17 डिसेंबर 1928 रोजी लाहोरचे सहाय्यक पोलिस अधिक्षक आणि जालियनवाला बाग हत्याकांडास जबाबदार असणाऱ्या जे. पी. सौंडर्स या अधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या केली आणि लाल लाजपतराय यांच्या खुनाचा बदला पूर्ण केला. त्यानंतर बटुकेश्वर दत्त यांच्या मदतीने 8 एप्रिल 1929 रोजी झोपलेल्या इंग्रजी सरकारला अन्यायकारक कायद्यांविरोधात जागे करण्यासाठी नवी दिल्लीस्थित ब्रिटिश सरकारच्या सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्बे फोडला. मात्र, ब्रिटिशांच्या अत्याचाराचा बुरखा फाडण्यासाठी पळून न जाता ब्रिटिश सरकारच्या स्वाधीन झाले. तोही नियोजनाचाच एक भाग होता.

#bhagatsingh, #indianarmy, #india, #rajguru, #chandrashekharazad, #jaihind, #sukhdev, #indian, #indianairforce, #indiannavy, #bhagatsinghji, #shifuji, #bhagatsinghfan, #punjabi, #bharatmatakijai, #shaheedbhagatsingh, #bhagatsinghlegend, #vandemataram, #inquilabzindabad, #bhagat, #fanbhagatsinghda, #shaheed, #indianbsf, #singh, #inqulabzindabad, #jaishreeram, #bharat, #bhagatsinghnagar, #hindustan, #bhfyp

भगतसिंग निर्दोष होते ?

पाकिस्तानात सौन्डर्स खुनाच्या खटल्याची “एफ़.आई.आर.” रिपोर्ट सापडली आहे. त्यात भगतसिंग आणि त्यांच्या साथीदाराच नाव नाही, म्हणून आता या क्रांतिकारकांना कोर्टात निर्दोष सिद्ध करण्याची खटपट चालली आहे. सरळ मुद्द्यावर येऊन दोन प्रश्नांची उत्तरे इतिहासाला विचारायला हवीत :

१) भगतसिंग आणि त्यांचे साथीदार यांनी सौन्डर्स या पोलिस अधिकाऱ्याची हत्या केली होती का?

२) त्यांचा खटला निष्पक्ष चालवला गेला होता का ?

पहिल्या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी आहे, हो !! याच नरवीरांनी लाला लाजपत राय यांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी गोळ्या झाडून सौन्डर्सला मारले. म्हणजे ते स्वतः निर्दोष नव्हते आणि निर्दोष असल्याचा त्यांनी कधी आव पण आणला नाही.

दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे, त्यांचा खटला ब्रिटीश सरकारने निष्पक्ष आणि न्याय्य मार्गाने चालवला नाही. उलट भगतसिंग अन त्याच्या साथीदारांना मारण्याची ब्रिटीश सरकारला घाईच झाली होती हे सिद्ध झालेलं आहे.

सविस्तरपणे या प्रकरणाकडे पहिला तर काही मुद्दे लक्षात घेण्यासारखे आहेत. जेव्हा भगतसिंग, राजगुरू आणि आझाद त्या सौन्डर्स ला गोळ्या घालून पसार झाले. तेव्हा त्यांना प्रत्यक्ष पाहणारा साक्षीदार कोणीच नव्हता. एक हवालदार छानन सिंग होता. ज्याने या सगळ्यांना गोळ्या घालताना पाहिले होते. त्याने पाठलाग ही केला पण तिथेच चंद्रशेखर आझादने त्याचा गोळ्या घालून मुर्दा पाडला. खटल्याचे सर्व साक्षीदार आजूबाजूला राहणारे लोक होते, कोणी आवाज ऐकला होता तर कोणी नंतर घटना स्थळावर आले होते.

ब्रिटीश सरकारने शेकडो साक्षीदार तयार केले होते, त्यातला एक खुन्यांना पाहिल्याचा दावा करीत होता, पण कोर्टामध्ये तोसुद्धा भगतसिंग अन इतरांना ओळखू शकला नाही. कदाचित ह्याच इसमाने “एफ़.आई.आर .” रिपोर्ट मध्ये खुन्याचे वर्णन केलेले होते, जिथे उंची ५ फूट ५ इंच लिहली होती. वस्तुत: भगतसिंगांची उंची ६ फुटाच्या वरती होती . दुर्गा भाभीचा मुलगा सचिन तर भगतसिंगास “लंबू चाचा ” म्हणत असे .

खटल्याकडे पहाण्याची भगतसिंगांची स्वतःची भूमिका :-

भगतसिंग जेव्हा असेम्ब्लीमध्ये बॉम्ब फेकण्यास गेले होते. त्यावेळी त्यांनी जाणून बुजून तीच पिस्तूल सोबत नेली. ज्या पिस्तुलीने त्याने सौन्डर्सला गोळ्या घातल्या होत्या. ही पिस्तुल नेण्यामागे त्यांचा स्वत:चा उद्देश होता की, सौन्डर्स मर्डर केस पुन्हा उगडली गेली पाहिजे. बॉम्ब फेकण्याच्या गुन्ह्यास जन्मठेपेपेक्षा अधिक शिक्षा होणार नाही. हे त्यांना माहित होते. कोर्ट, खटला लांबवून त्या कोर्टाला स्वतःचे विचार पसरविणारा मंच बनविण्यासाठी भगतसिंगांची ही योजना होती. दुसरा पुरावा, सौन्डर्सला मारल्यानंतर लाहौरमध्ये जे पत्रक लावण्यात आले होते. ते स्वतः भगतसिंगच्या हस्ताक्षरातील होते, आणि असेम्ब्लीमध्ये जी पत्रके उधळण्यात आली ती सुद्धा त्यांनी स्वतःच्या अक्षरात लिहिली होती.

#bhagatsingh, #indianarmy, #india, #rajguru, #chandrashekharazad, #jaihind, #sukhdev, #indian, #indianairforce, #indiannavy, #bhagatsinghji, #shifuji, #bhagatsinghfan, #punjabi, #bharatmatakijai, #shaheedbhagatsingh, #bhagatsinghlegend, #vandemataram, #inquilabzindabad, #bhagat, #fanbhagatsinghda, #shaheed, #indianbsf, #singh, #inqulabzindabad, #jaishreeram, #bharat, #bhagatsinghnagar, #hindustan, #bhfyp

भगतसिंग हे दोन पुरावे जाणून बुजून सोडतो. कारण त्यांना फाशीचा तख्त हा विचारांचा मंच बनवायचा होता, अन त्यांची योजना पूर्णपणे यशस्वी झाली .

कोर्टापाशी हे दोन पुरावे सोडले तर दूसरा एकही पुरावा नव्हता. म्हणून सरकारने शेवटी "स्पेशल ट्रिब्यूनल” बनवले. त्यांना लवकर निकाल लावण्यास सांगितले. इथे गवर्नरने स्वतःच्या विशेष हक्कांचा वापर केला. जे केवळ आणिबाणीच्या प्रसंगी वापर करणे अपेक्षित होते. मात्र, तेव्हा आणीबाणी सदृश परिस्थिती तर अजिबात नव्हती.

भगतसिंग हे विशेष ट्रायबुनल कसे असंवैधानिक आहे. हे त्याच न्यायाधीशांसमोर सिद्ध करून दाखवतात. पण त्याचे कोणी ऐकत नाही. साक्षीदारांची फेरतपासणी नाकारली जाते, भगतसिंग आणि साथीदारांना हातकड्या घालून कोर्टात उभे राहणे भाग पडले जाते. त्यांना स्वतःच म्हणणं मांडण्याचा हक्क दिला जात नाही. इथे भगतसिंग आणि त्यांचे साथीदार या खटल्याला "फार्स ट्रायल” म्हणजे नकली खटला म्हणून त्या कोर्टवर बहिष्कार टाकतात.

आम्ही कोर्टात येणार नाही असे निक्षून सांगतात . 'अगा हैदर' जे एकमेव भारतीय न्यायाधीश या ट्रिब्यूनलमध्ये नेमले गेले होते, त्यांनी हा अन्याय पाहून राजीनामा दिला होता. या पापामध्ये त्यांना भागिदार व्हायचं नव्हते. सरकारने तडकाफडकी निकाल लावला आणि वेळेच्या आधी फासावर लटकावले .

भगतसिंग म्हणायचे, "क्रांतीकारकांना मरावेच लागते, त्याशिवाय क्रांती येत नाही."

भगतसिंग ब्रिटीशांचा दोषी होते का? हो होते पण ते दोषीत्व त्यांना सिद्ध करता आले नाही. आणि आम्हा भारतीयांसाठी दोषी होते का? आपल्याला त्यांच्या निर्दोष असल्याची कधीपासून गरज पडायला लागली ? हा प्रश्न पडणे म्हणजे मूर्खपणा आहे, त्यांनी सौन्डर्सला कशासाठी मारले होते हा इतिहास पुन्हा सांगण्याची जरुरीच नाही. खरे दोषी तर आपण आहोत जे भगतसिंगचे विचार आणि त्यांचे बलिदान विसरलोत.

- अभिजीत भालेराव,

इतिहास संशोधक आणि अनुवादक "शहीद भगतसिंगांची जेल डायरी"

[email protected] (09969298076)

References –

Without fear – Kuldeep Nayar.

Trial of Justice – A.G.Noorani .

Bhagat singh and his selected writings (NBT) etc.

Updated : 23 March 2020 2:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top