Home > मॅक्स ब्लॉग्ज > पूर्वीच्या “कर्मविपाका”च्या सिद्धांताच्या जागी नवीन सिद्धांत मनात रुजवले जात आहेत

पूर्वीच्या “कर्मविपाका”च्या सिद्धांताच्या जागी नवीन सिद्धांत मनात रुजवले जात आहेत

पूर्वीच्या “कर्मविपाका”च्या सिद्धांताच्या जागी नवीन सिद्धांत मनात रुजवले जात आहेत
X

कर्मविपाकाचा वैदिक सिद्धांत काहीसा असा मांडता येईल

“तुम्ही आधीच्या जन्मी काहीतरी अयोग्य काम /पाप केलेलं असल्यामुळे तुम्हाला या जन्मी प्रचंड हाल अपेष्टा काढाव्या लागत आहेत. म्हणून तुमचा जन्म खालच्या जातीत झाला आहे. या जन्मात शिस्तीत वागा म्हणजे मेल्यावर स्वर्गात जाल”

ज्याचा पगडा कोट्यवधी लोकांवर हजारो वर्ष राहिला; अजूनही आहे

समाजातील वंचित जाती / घटकांनी त्यांच्या वाटेला आलेले आयुष्य विना तक्रार सहन करावे. स्वीकारावे. प्रस्थापितांकडून, राज्यकर्त्यांकडून काहीही अधिकचे मागू नये.

बंडाचा विचार देखील त्यांच्या मनाला शिवू नये अशी हि स्ट्रॅटेजी होती

औद्योगिकरण, शहरीकरण, कामासाठी स्थलांतरण, शिक्षणाचा प्रसार, मीडिया अशा नानाविध कारणांमुळे या तथाकथित सिद्धांताची लोकांच्या मनावरील पकड ढिली पडत चालत आहे.

__________

पण कर्मविपाकाच्या सिद्धांताने राज्यकर्त्यांची / प्रस्थापित वर्गाची जी गरज भागवली ती आज देखील संपलेली नाही.

मग त्यासाठी मनाला साखळदंड घालणारे नवीन सिद्धांत, नवीन विचार सतत प्रसृत केले जातात

उद्देश तोच शोषकांनी वाट्याला आलेले भोग स्वीकारावे, स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यावी, शासकांना बोल लावू नयेत, अपेक्षा करू नयेत,

बंडाचे विचार मनाला शिवू देखील देऊ नयेत

_____________

अनेक उदाहरणे देता येतील; इथे दोनच उदाहरण घेऊ या

(१) अतिशय हलाखीत, ग्रामीण व शहरी झोपडपट्टीत राहणारे काही विद्यार्थी एखाद्या परीक्षेत खूप मोठे यश मिळवतात. त्याचे कष्ट, चिकाटी, धैर्य याचे कौतुक झालेच पाहिजे.

पण सत्ताधारी वर्ग /मीडिया असे भासवतो कि बघा गरीब घरातील मुलं मुलींनी धमक दाखवली / भरपूर कष्ट घेतले तर त्यावर ते मात करू शकतात (तीच गोष्ट गरिबीतून वर आलेल्या उद्योजकाची !)

गरीब घरातील एका यशस्वी विद्यार्थ्यामागे किती लाख विद्यार्थी प्राथमिक शाळेपासून गळत गळत कायमचे गाळात रुततात याच्या आकडेवारीशी त्यांना काही देणे घेणे नसते

त्यातून अपयशी ठरणाऱ्या, जेमतेम पास होणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना हे न सांगता सांगितले जाते कि तुमच्यातच काहीतरी कमी आहे.

जर झोपडीत राहून एखादी मुलगी/मुलगा परीक्षेत वरच्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊ शकतो मग तू का नाहीस

(२) तीच गोष्ट साधी राहणी ठेवणारी, अतिशय साध्या घरात, कमीत कमी सामान, गॅजेट्स वापरून समाधानी राहणाऱ्या माणसांच्या बाबतीत.

त्यांचे मुख्यमंत्री / मंत्री व समाजातील श्रीमंत व्यक्तींच्या हस्ते सत्कार केले जातात.

सुख / समाधान या माणसाच्या मनाच्या अवस्था आहेत, भौतिक सुविधांचा पाया असला काय नसला काय तुम्ही ते समाधान मिळवू शकता. याचेच एक्शटेन्शन असते निरनिराळ्या बुवा /बाबा / प्रवचनकार / सत्संग यांच्या लेक्चरबाजी मध्ये.

ज्या गरिबांच्या मनात साध्या भौतिक सुखसोयीची इच्छा तयार होते, त्यांना गिल्टी वाटायला लागते. ते मिळवण्यासाठी झगडण्यासाठी जी आंतरिक शक्ती लागते तिचा लय होतो

__________

यातून इथल्या राज्यकर्त्या वर्गांना लोकसंख्येतील ८० टक्के सामान्य कष्टकरी नागरिकांना एक राजकीय मेसेज द्यायचा असतो. तो असा:

“सिस्टीम. प्रणाली, शासन असे काही नसते,

समाजात फक्त सुट्या सुट्या व्यक्ती असतात, त्या एकतर कमकुवत असतात किंवा सक्षम असतात,

व्यक्ती सुखाची हाव सुटलेल्या असतात किंवा आपल्याला जे मिळाले त्यात समाधानाने आयुष्य जगणाऱ्या असतात”

Updated : 19 May 2019 1:01 PM GMT
Next Story
Share it
Top