7 वर्षांची पायल चालवते कार

450

पायल दुसरीत शिकते. वय अवघं सात वर्ष. कायद्यानं ती कुठल्याही मोटार ट्रेनिंग स्कूलमध्ये जाऊ शकत नाही किंवा कार चालवू शकत नाही. पण, कुठलही ट्रेनिंग न घेतला फक्त निरिक्षणाच्या जोरावर पायल ड्रायव्हींग शिकली आहे. कोणाचीही मदत न घेता मोकळ्या मैदानावर ती निर्धास्तपणे कार चालवते.

बाबा आणि मामांच्या बरोबर कारमध्ये बसून तिनं हे निरिक्षण केलं. कार चालवण्यासाठी ती सतत हट्ट करायची अस तिचे वडील प्रमोद नागे सांगतात. साधारण महिनाभरापूर्वी तिला गंमत म्हणून ड्रायव्हींग सीटवर बसवलं तर तिनं चक्क गाडी सुरू करून ती चालवून सुद्धा दाखवली. मग आत्मविश्वास पाहून वडलांनी तिला आणखी प्रोत्साहन दिलं. पायल रत्नागिरीतल्या एसपीएम इंग्लिश मिडीअम स्कूलची विद्यार्थीनी आहे. तर तिचे वडील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयात क्लार्क आहेत.

राकेश गुडेकर, रत्नागिरी

महत्त्वाची सूचना  – पायलने गाडी तिच्या वडलांच्या देखरेखीत चालवली आहे. लहान मुलांनी याचे अनुकरण करू नये. तज्ज्ञांच्या देखरेखीत याचे प्रशिक्षण घ्यावे