Home > मॅक्स ब्लॉग्ज > सेल्फी रिपोर्टींग..आणि बदलणार मीडिया..

सेल्फी रिपोर्टींग..आणि बदलणार मीडिया..

सेल्फी रिपोर्टींग..आणि बदलणार मीडिया..
X

मोजो म्हणजेच मोबाईल सेल्फी रपोर्टींग आता काही नवीन नाही. पण एकंदर भारतीय मीडिया आणि खासकरून मराठी मीडियामध्ये याचा ट्रेन्ड ज्यांनी आणला ते मयांक भागवत स्वतः त्यांच्या या अनुभवाविषयी सांगत आहेत.

रिपोर्टर - सेल्फी वॉक-थ्रू पाठवलाय रे..वापरा तो..मोबाईलवर मारलाय..काम चलाऊ आहे..फीड पॉइंट नाही..अरे माठांनो इकडून कसा फीड करू..तो टीव्हीयू देत नाहीये..दिल्लीशी बोला..

ऑफिस - असे सेल्फी काय.. कसं चालवणार.. रिझोल्यूशन मिळणार नाही.. पिक्सलेट होईल.. तरी पाठव पाहू काही होतयं का.. पाठव-पाठव.. वॉट्स-एप कर...

मी, मी मराठी न्यूजमध्ये असतानाचा हा संवाद आहे.. हा संवाद शेअर करण्याचं कारण म्हणजे बदलणारा मिडीया.. काळाच्या ओघात टीव्ही पत्रकारीता बदलली.. टेक्नॉलॉजी अपग्रेड झाली.. मग आपण का नाही.. असा विचार करून या बदलत्या ट्रेंडला मी आत्मसात केलं. मोबाईल कॅमे-याचा फक्त फोटो काढण्यासाठी नाही, तर याचा वापर मी रिपोर्टिंगलाही करू शकतो हे मला ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडच्या टूरनं शिकवलं.

https://youtu.be/p5dtf9OfaXo

रविंद्र आंबेकर, तुळशीदास भोईटेंनी मला क्रिकेट वर्ल्डकप कव्हर करण्यासाठी जा असं सांगितलं. ऑस्ट्रेलियात माझा दिल्लीचा रिपोर्टर आणि कॅमेरामॅन होते. पण माझ्याकडे कॅमेरा नव्हता. दोन वेगवेगळे चॅनल्स. मग प्रायऑरीटीचा मुद्दा आलाच. तूतू-मैमैं ही आली. यात, दिल्लीवाले मराठीला नेहमीच दुय्यम स्थान देतात, त्यामुळे टीव्हीयू नहीं मिलेगा... हमारा लाइव्ह है.. तुम्हारा बादमे.. असं पहिला दिवस ऐकलं आणि ठरवलं, आता जरा यांना स्मार्ट काम करून दाखवूया. कॅमेरा नाहीतर काय आपलं काम थोडीना थांबतं. माझा स्मार्टफोन आहे ना. असा विचार केला आणि मोबाईल माझा कॅमेरा झाला, आणि मीच माझा कॅमेरामन...

मी सुरू केलं सेल्फी रिपोर्टींग.. भारतामध्ये तेव्हा सेल्फी रिपोर्टींग फारसं कोणी केलेलं पहायला मिळालं नव्हतं. मीही कधी केलं नव्हतं.. त्यामुळे काहीतरी नवं शिकतोय याची उत्सूकता होती. बरं कॅमेरा पकडायलाही कोणी नाही. त्यामुळे हातात मोबाईल पकडून सेल्फी व़ॉक-थ्रू करण्यात काही अडचणी आल्या.. कॅमेरा अॅंगल पहिल्यांदा मिळाला नाही.. पण, मग हात बसला..

कुठेही गेलो, की सेल्फी कॅमेरा ऑन करायचा आणि सुरू व्हायचं. दोन मिनिटांचा वॉक-थ्रू करायचा आणि वॉट्स-अॅपने ऑफिसला समीर, नीलेश, प्रवीणला पाठवायचा, हा दिनक्रम झाला.

मयांक पटकन पीटीसी दे...पटकन एक वॉक-थ्रू कर.. मी मुंबईत असल्यासारखा समीर मला फोन करायचा.. आणि मी आहे त्या ठिकाणी सेल्फी, प्रसंगी ऑस्ट्रेलियन नागरिकांना मोबाईल पकडण्याची विनंती करून वॉक-थ्रू करायचो..

बस, दस मिनीट का काम. वॉक-थ्रू झाला का वॉट्स-अॅप आणि समीर काही क्षणात तो डाऊनलोड करून बुलेटीनला वापरायचाही. एकदा समीरचा फोन आला, बुलेटीनच्या अॅंकरलिंक करून पाठवं. मी म्हटलं असे काय पागल आहे का.. तर म्हणाला, अरे कॅमे-यापेक्षा मस्त क्वॉलीटी आहे. का टेंन्शन घेतो, सेल्फी रिपोर्टींग मस्त चालू आहे. सर्वांना आवडतयं. मी, लगेच धडाधड अॅंकरलिंक करून पाठवली आणि ऑस्ट्रेलियाहून बुलेटीनही झालं. अगदी लाइव्ह... वर्ल्डकपच्या टूरमध्ये मी अर्ध्या तासाचे चार शो, तर अनेक वॉक-थ्रू आणि पीटीसी सेल्फी रिपोर्टींगने केले..

पुढे मग मी मराठी चॅनेलनं त्याचा ट्रेन्डच आणला. माझा सहकारी नीलेश धोत्रेनं घुमान साहित्य संमेलनाचा अख्खा प्रवास याच सेल्फी रिपोर्टींगनच कव्हर केला. हा अनुभव सांगण्याचं कारण असं, की आता मिडीया बदललाय.. कॅमे-याची गरज आहेच, पण सर्व ठिकाणी कॅमेरा पोहचू शकत नाही.. प्रत्येकाला मिळेलच असंही नाही.. त्यामुळे जुनिअर रिपोर्टर्सनी हे मोजो जर्नलिझम, म्हणजे मोबाईल जर्नलिझम शिकायलाच हवं. टेकच्या जगात रोज नवे आविष्कार होतायत, मिडीया फास्ट आणि खर्चीकही झालाय.. त्यामुळे आता वेळ आलीये प्रत्येक रिपोर्टरने टेक्नोसॅव्ही होण्याची.. ओबीवॅनची जागा लाइव्ह-यू किंवा टीव्हीयूने या पोर्टेबल डिव्हाइसनी घेतली आणि आता त्याची जागा मोबाईल घेणार हे नक्कीच. स्काईप, फेसबूक लाइव्ह, यासाठी आता कॅमेरा असणं गरजेचं राहीलेलं नाही. ऑफिसला रिपोर्टर आणि व्हिजुअल्स हवेत.. जमाना ब्रेकींगचा आहे. त्यामुळे जो यात सरस ठरला तो राजा.. म्हणून.. सर्व जुनिअर रिपोर्टर्सना एकच सांगेन.. गॅजेटच्या जमान्यासोबत चला.. मोजो व्हा..कारण बातमी कुठेही-कधीही घडू शकते आणि कॅमेरा नाही, म्हणून काम काही थांबत नाही..

- मयांक भागवत

Updated : 2 March 2017 6:40 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top